Vechit Marquee

सूची: अनुक्रमे ▶ वर्गीकरण ▶ लेखमाला ▶ लक्षवेधी ◼
क्रिकेट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
क्रिकेट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २२ मे, २०२५

क्रिकेटमधील उपेक्षितास दाद


  • क्रिकेटमध्ये पंच हा प्राणी तेवढाच लोकप्रिय आहे जेवढे निवडणूक प्रक्रियेमध्ये ईव्हीएम ! प्रातिनिधिक स्थिरचित्र. https://www.sportskeeda.com/ येथून साभार. आपण जिंकलो, तर ‘पंचाची कामगिरी नि:पक्ष होती’ असा गौरव करायचा किंवा ‘ते ही शेवटी माणूसच आहेत’ अशी मखलाशी करायची. जर हरलो, तर त्यांचा वापर हुकमी बळी म्हणून खापर फोडण्यास (म्हणजे हिंदुत्ववाद्यांसाठी मुस्लिम, पुरोगाम्यांसाठी मध्यमवर्ग वगैरे वगैरे) त्यांचा वापर करायचा हे ठरलेले असते. त्यातच DRS म्हणजे Digital Review System (त्यालाही मागास भारतीय मानसिकतेच्या बीसीसीआयने बराच काळ ‘बिनचूक नाही’ या बिनडोक तर्कास पुढे करुन रोखून धरले होते.) आल्यापासून पंच हे अधिकच दडपणाखाली काम करु लागले आहेत. त्यांना एखादा निर्णय मिलिसेकंदात घ्यायचा असतो, तर एसी केबिनमध्ये बसून डीआरएसचा निर्णय देणारा तिसरा पंच विविध कोनातून मिळणारे चित्रण, स्टंप माईक, रीअल टाईम सिन्क्रनायजेशन, अल्ट्रा-एज वगैरे संगणकीय तांत्रिक करामतींच्या साहाय्याने आरामात निर्णय घेत असतो. (तिथे बिचार्‍या राष्ट्रपती नि राज्यपालाल...

    पुढे वाचा »

गुरुवार, ६ जून, २०२४

आपले राष्ट्रीय खेळ


  • आयपीएल आणि निवडणुका हे आपले राष्ट्रीय खेळ आहेत... ! दोन्हीं प्रकारामध्ये नवा सीझन आला की ‘मोसम’ पाहून खेळाडू संघ बदलतात किंवा नवे मालकच त्यांना विकत घेतात. मालकांना आवडला नाही तर ते सीझन चालू असताना मध्येच कॅप्टन बदलतात. दोन्हींमध्ये गोलंदाज एकामागून एक चेंडू फेकत राहतात, फलंदाज ते मारत राहातात आणि ‘कमेंट्री बॉक्स’पासून (यात ‘X’-बॉक्सपण आला!) समाजमाध्यमांवरचे काही हजार, काही लाख लोक तो पकडायला धावाधाव करत असतात. प्रत्येक सामन्यातील एक डाव दिवसा नि एक रात्री खेळला जातो... क्वचित पहाटेसुद्धा! प्रत्येक सामन्यापूर्वी ‘प्रतिस्पर्धी कोण आहे’ याबरोबरच मैदानावरील ‘खेळपट्टी’ आणि ‘बाजूच्या हिरवळीची स्थिती’ आदि परिस्थितीजन्य घटकांचा विचार करून टीम निवडली जाते. चेन्नईमध्ये फिरकी गोलंदाजांना प्राधान्य असते, तर अहमदाबादमध्ये वेगवान गोलंदाजांची चलती असते. खेळ पाहण्यास बसलेल्या प्रेक्षकांना इच्छा नसूनही, समोरील जाहिरातींमध्ये काही तथ्य नाही हे ठाऊक असूनही, त्या पाहाव्याच लागतात. समोरची प्रसिद्ध व्यक्ती जे ग्यान देते ते निमूट ऐकून घ्यावेच लागते. पैसे खर्चणारे, एक टीम निवडून तिला प्रोत्स...

    पुढे वाचा »

सोमवार, २३ ऑक्टोबर, २०२३

शतक हुकलेल्या खेळाडूप्रत—


  • दिनांक: २२ ऑक्टोबर २०२३ भारताचा प्रमुख आधारस्तंभ फलंदाज विराट कोहली दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याच्या उंबरठ्यावर असताना बाद झाला. नव्वदीमध्ये रेंगाळलेला कोहली ९५ धावांवर खेळत असताना एकाच षटकाराने शतकाकडे उडी मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. मिडविकेटला एक सोपा झेल देऊन तो बाद झाला. तो नव्वदीत पोहोचल्यापासून उत्कंठेने श्वास रोखून सामना पाहात असलेल्या त्याच्या चाहत्यांची दारूण निराशा झाली. एकीकडे आपल्या आवडत्या खेळाडूचे शतक नि विक्रम हुकला याचे वैफल्य आणि असा बेजबाबदार फटका मारून बाद झाल्याबद्दलचा राग व वैताग या दोहोंतून व्यक्त झालेली ही संमिश्र भावना. --- ( कवि अनिल यांची क्षमा मागून ...) आज अचानक विकेट पडे ॥ ध्रु.॥ भलत्या वेळी भलत्या खेळी । असतां मन शतकाकडे ॥ बॅट फिरवितां तू मिडविकेटी । एकाएकी झेल पडे ॥ दचकुनि जागत जीव अचानक । क्षणभर हार्ट हे थंड पडे ॥ गूढ डिलिव्हरी तव नाकळुनि । अघटित असे हे आज घडे ॥ निसटुनि जाई संधीचा क्षण । सदा असा आवेश नडे ॥ - कवि तुंदिल - oOo -

    पुढे वाचा »

मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०२३

क्रिकेट आणि टीकाकार


  • निवडणुकीच्या आगेमागे ‘ईव्हीएम टॅम्परिंग’चा कोलाहल ऐकू येत असतो. हे जणू राजकीय वास्तव असल्याची एका राजकीयदृष्ट्या सजग गटाची श्रद्धा आहे. दुसरीकडे क्रिकेट सामन्यांच्या– विशेषत: कुठलाही वर्ल्ड-कप किंवा भारतीयांच्या दृष्टीने ताटा-पोटातील अन्नापेक्षाही महत्त्वाच्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी काही मंडळींकडून न चुकता घातला जाणारा ‘मॅच फिक्सिंग’चा रतीब ही दुसर्‍या श्रद्धेची किंवा सामान्यांपेक्षा आपल्या उच्च अभिरुचीची द्वाही आहे. या दोनही गोष्टी शक्यतेच्याच नव्हे तर संभाव्यतेच्या पातळीवरही आहेत हे मला मान्य आहे. पण संभाव्य आहे म्हणजे ते घडलेच किंवा घडतेच असा कांगावा करण्यात अर्थ नसतो. शक्यता ते घटित यात बराच प्रवास असतो. तो किती खडतर आहे यावर संभाव्यता ठरत असते. शक्यता नि खात्री यातील फरक करण्यास शिकले की आयुष्य सुसह्य होते असे माझे प्रामाणिक मत आहे. ईव्हीएम हॅकिंग अथवा टॅम्परिंगला लागणारे कुशल(!) मनुष्यबळ, गुप्ततेची खडतर वाट आदि गोष्टींचा विचार करता कोणताही पक्ष त्याची व्याप्ती पुरी निवडणूक फिरवावी इतकी व्यापक ठेवू शकणार नाही. अत्यंत मर्यादित प्रमाणात हे साध्य होऊ शकेल. पण तरीही ईव...

    पुढे वाचा »

सोमवार, ३१ जुलै, २०२३

बा कपिल देवा,


  • बा कपिल देवा, तुम्हांसि नव्या पिढीतील खेळाडूंचे पैसे पाहून पोटात दुखते हे बरे नव्हे. उठसूठ आयपीएलच्या नावे खडे फोडताना या प्रकारच्या बाजारू खेळाचे उद्गाते आपणच आहोत हे विसरु नये. आयपीएलपूर्वी ’झी’च्या सुभाष चंद्रा यांनी चालू केलेल्या ’इंडियन क्रिकेट लीग’चे (ICL) पहिले सूत्रधार आपणच होतात हे लोक विसरले असतील असे समजू नये. आयपीएल वा पैशाच्या मागे लागणारे खेळाडू ही वाईट गोष्ट असेल तर त्याची पायाभरणी दस्तुरखुद्द आपणच केलेली आहे. वृथा नैतिकतेचा आव आणू नये. याच आयपीएलमधून उभ्या केलेल्या पैशातून बीसीसीआयने घसघशीत पैशांची थैली आपल्या ओटीत घातली होती, तेव्हा दर्जेदार क्रिकेटचे रक्त आपल्या हाती लागले आहे असे तुम्हाला वाटले नसावे. २००७ साली ICL चे विजेतेपद मिळवणार्‍या चेन्नई सुपरस्टार्सचा कर्णधार स्टुअर्ट लॉ. सोबत ICLचे अध्यक्ष कपिल देव. espn.com येथून साभार. मुळात पैसे मिळवणे हे अनैतिक आहे या बाष्कळ भारतीय समजातून बाहेर यावे. किंवा पैशापुढे खेळ दुय्यम मानतात असे समजणेही हास्यास्पद आहे. ज्या खेळाने त्यांना ओळख दिली, त्यातून त्यांच्याकडे ...

    पुढे वाचा »

बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२

डकवर्थ-लुईस नियमावली आणि वृत्त-माध्यमे


  • १९९२ मध्ये झालेल्या विश्वचषक मालिकेमध्ये उपान्त्य सामन्यामध्ये द. आफ्रिका इंग्लंडशी खेळत होती. वंशभेदी धोरणांमुळे सुमारे बावीस वर्षे क्रिकेट जगतातून बाहेर ठेवल्यानंतर १९९१ मध्ये त्यांना पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात सामावून घेतले गेले होते. उपान्त्य सामन्यामध्ये पोचण्यापूर्वी त्यांनी पाच सामने जिंकून– त्यातही माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन– आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. ही विश्वचषक स्पर्धा– त्याकाळात ज्याला एकदिवसीय सामना म्हटले जाई तशा सामन्यांची असे. यात दोन्ही संघांना प्रत्येकी ५० षटकांचा एक डाव खेळायला मिळे आणि जो संघ अधिक धावा करेल, तो विजयी होत असे. परंतु या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे मध्यांतराच्या वेळेपर्यंत इंग्लंडला ४५ षटकेच खेळायला मिळाली. त्यांत त्यांनी २५२ धावा केल्या. उत्तरादाखल दुसरा डाव खेळताना द. आफ्रिकेने अगदी सहज खेळ केला. पण ४२ षटके आणि पाच चेंडूंचा खेळ झालेला असताना पुन्हा पावसाचा व्यत्यय आला. वाया गेलेला नि खेळासाठी शिल्लक राहिलेला वेळ विचारात घेता या डावातील षटकांची संख्या कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागला... ...पुढे जाण्यापूर्वी क्रि...

    पुढे वाचा »

मंगळवार, १६ जुलै, २०१९

सुरेख सामन्याचे विध्वंसक कवित्व


  • क्रिकेटचा अंतिम सामना पार पडला आणि त्याचे कवित्व अजून चालू आहे. क्रिकेट जणू जबरदस्तीने यांच्या खिशातून पैसे काढून नेते अशा आविर्भावात आणि सरकार क्रिकेटला पैसे देत या अडाणी समजात बुडलेले ’गावंढे’ असोत की क्रिकेटचे अट्टल फॅन असोत, चर्चा थांबवायचे नाव घेत नाहीत. मग ते धर्मसेना कसा चुकला, टोफेल म्हणतात तसे सहा ऐवजी पाच धावा दिल्या असत्या तर काय झाले असते, स्टोक्सने चेंडू ढकलून चीटिंग केले का? सर्वाधिक बिचारा कोण, केन की बेन? इतर खेळाडू शँपेन उधळत असताना आपली बाटली घेऊन हळूच सटकलेल्या जोफ्रा आर्चरने ती एकट्याने गट्टम केली की कुणाला प्रेजेंट दिली? इऑन (की ऑयन) मॉर्गनने ’अल्ला आमच्या बाजूला होता’ म्हटले म्हणून त्याला इथे बसून देशद्रोही ठरवता येईल का? चौकारांच्या संख्येऐवजी षटकारांची, बळींची, वाचवलेल्या धावांची, सोडलेल्या झेलांची संख्या किंवा हेल्मेटशिवाय बॅटिंग केलेला किंवा राखीव खेळाडू मैदानावर असलेला वेळ ... यापैकी कोणते पर्यायी निकष वापरावेत यावर गल्लीतल्या गण्यापासून दिल्लीतल्या काण्यापर्यंत सारे बोल बोल बोलत आहेत. इतका थरारक सामना झाला, ...

    पुढे वाचा »

रविवार, २० फेब्रुवारी, २०११

क्रिकेट हा पक्षपाती खेळ आहे काय?


  • सध्या क्रिकेट विश्वचषकाचे वारे वाहत आहेत. त्या निमित्ताने त्यासंबंधी विविध चर्चा, कार्यक्रम झडताहेत. सगळेच हात धुवून घेताहेत. मग आपणच का मागे रहा. म्हणून आम्हीही काहीतरी लिहू म्हटले. बरेच दिवस आमच्या डोक्यात हा विषय ठिय्या देऊन बसला आहे. आम्हाला नेहमी असं वाटतं की ‘क्रिकेट हा पक्षपाती खेळ आहे का?’ थांबा थांबा, थोडंसं इस्कटून सांगतो. क्रिकेटमधे तीन प्रकारचे खेळाडू असतात– खरंतर यातले खेळाडू तीन प्रकारच्या जबाबदार्‍या पार पाडतात. ते फलंदाजी करतात, क्षेत्ररक्षण करतात किंवा गोलंदाजी करतात. यातले क्षेत्ररक्षक हे मैदानावर बहुसंख्येने असले, तरी ते तुलनेने दुय्यम असतात. मूळ लढाई ही गोलंदाज नि फलंदाजात असते. पण प्रश्न असा आहे की ‘हा खेळ या दोघांना समान संधी देतो की नाही?’ आम्ही जरा पटापट आठवतील तशा नोंदी केल्या. त्या इथे लिहितो आहे. एखादा फलंदाज ‘बाद आहे’ असे अपील झाले असता, पंचांना जर निश्चित निर्णय करता येत नसेल, तर ‘संशयाचा फायदा’ फलंदाजाला दिला जातो. (चला ठीक आहे, तो एकदा बाहेर गेला की त्याला दुसरी संधी मिळत नाही म्हणून हे योग्य म्हणू या.) हल्ली एकदिवसीय नि वीस-वीसच्या जमान्यात गोलं...

    पुढे वाचा »