-
काही वर्षांपूर्वी कुणीतरी (बहुधा अण्णा हजारे, खात्री नाही) म्हणाले होते, ‘आपल्या लोकशाहीमध्ये पक्षीय लोकशाहीला स्थान नाही. सर्व उमेदवारांनी स्वबळावर लढावे. नंतर विजयी उमेदवारांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे.’ सध्या ‘जिकडे उमेदवारी तिकडे हरी हरी’ या उक्तीनुसार आपले बहुतेक राजकारणी वागताना दिसत आहेत. हे पाहता अशा पक्षातीत निवडणुकांची वेळ जवळ आलेली आहे असे वाटू लागले आहे. मग ‘उगाच अंदाजपंचे दाहोदरसे होण्यापेक्षा सारं काही नीट वैधानिक पातळीवरच का करु नये?’ असा विचार मी करत होतो. ‘आणि म्हणोन’, ‘या ठिकाणी’, ‘प्रभू श्रीरामांच्या कृपेने’ हा एक प्रस्ताव देतो आहे. पटतो का पाहा. नाही तर दुरुस्त्या सुचवा. सर्वप्रथम निवडणूक आयोग ही वैधानिक संस्थाच विसर्जित करुन टाकावी. तिच्या जागी नवी व्यवस्था असावी. आणि हा बदल नियोजन आयोगाकडून नीती आयोगाकडे— म्ह… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
क्रीडा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
क्रीडा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
बुधवार, ६ नोव्हेंबर, २०२४
I. P. L. (इंडियन पोलिटिकल लीग)
गुरुवार, ६ जून, २०२४
आपले राष्ट्रीय खेळ
-
आयपीएल आणि निवडणुका हे आपले राष्ट्रीय खेळ आहेत... ! दोन्हीं प्रकारामध्ये नवा सीझन आला की ‘मोसम’ पाहून खेळाडू संघ बदलतात किंवा नवे मालकच त्यांना विकत घेतात. मालकांना आवडला नाही तर ते सीझन चालू असताना मध्येच कॅप्टन बदलतात. दोन्हींमध्ये गोलंदाज एकामागून एक चेंडू फेकत राहतात, फलंदाज ते मारत राहातात आणि ‘कमेंट्री बॉक्स’पासून (यात ‘X’-बॉक्सपण आला!) समाजमाध्यमांवरचे काही हजार, काही लाख लोक तो पकडायला धावाधाव करत असतात. प्रत्येक सामन्यातील एक डाव दिवसा नि एक रात्री खेळला जातो... क्वचित पहाटेसुद्धा! प्रत्येक सामन्यापूर्वी ‘प्रतिस्पर्धी कोण आहे’ याबरोबरच मैदानावरील ‘खेळपट्टी’ आणि ‘बाजूच्या हिरवळीची स्थिती’ आदि परिस्थितीजन्य घटकांचा विचार करून टीम निवडली जाते. चेन्नईमध्ये फिरकी गोलंदाजांना प्राधान्य असते, तर अहमदाबादमध्ये वेगवान गोलंदाजांच… पुढे वाचा »
मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०२३
क्रिकेट आणि टीकाकार
-
निवडणुकीच्या आगेमागे ‘ईव्हीएम टॅम्परिंग’चा कोलाहल ऐकू येत असतो. हे जणू राजकीय वास्तव असल्याची एका राजकीयदृष्ट्या सजग गटाची श्रद्धा आहे. दुसरीकडे क्रिकेट सामन्यांच्या– विशेषत: कुठलाही वर्ल्ड-कप किंवा भारतीयांच्या दृष्टीने ताटा-पोटातील अन्नापेक्षाही महत्त्वाच्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी काही मंडळींकडून न चुकता घातला जाणारा ‘मॅच फिक्सिंग’चा रतीब ही दुसर्या श्रद्धेची किंवा सामान्यांपेक्षा आपल्या उच्च अभिरुचीची द्वाही आहे. या दोनही गोष्टी शक्यतेच्याच नव्हे तर संभाव्यतेच्या पातळीवरही आहेत हे मला मान्य आहे. पण संभाव्य आहे म्हणजे ते घडलेच किंवा घडतेच असा कांगावा करण्यात अर्थ नसतो. शक्यता ते घटित यात बराच प्रवास असतो. तो किती खडतर आहे यावर संभाव्यता ठरत असते. शक्यता नि खात्री यातील फरक करण्यास शिकले की आयुष्य सुसह्य होते असे माझे प्राम… पुढे वाचा »
मंगळवार, १० ऑक्टोबर, २०२३
बुद्धिबळाचा अंत निश्चित आहे?
-
दहा-एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ऑफिसमध्ये चहापान करता-करता गप्पा चालू होत्या. विषय बुद्धिबळाचा होता. स्वत: उत्तम बुद्धिबळ खेळणारा आमचा बॉस म्हणाला,‘एक ना एक दिवस बुद्धिबळ हा खेळ बाद होऊन जाईल!’ त्याचा मुद्दा असा होता की बुद्धिबळातील प्रत्येक खेळीनंतर प्रतिस्पर्ध्याला उपलब्ध असणार्या खेळींची संख्या ही मर्यादित (finite) असते. त्या सार्यांची सूची बनवणे शक्य आहे. आता पहिल्या खेळाडूला या प्रत्येक खेळीसाठी प्रतिवाद करायचा आहे. पण त्या प्रत्येक खेळीनंतर पहिल्या खेळाडूलाही मर्यादित खेळ्या उपलब्ध आहेत. त्यांचीही सूची करता येईल... मुद्दा अगदी वाजवी होता. कारण आता या सार्या खेळींची ’ख्रिसमस ट्री’सदृश एक उतरती भाजणी तयार करता येईल. प्रत्येकी खेळी ही त्या वृक्षासाठी फांदीचा-फुटवा असेल. आणि या प्रत्येक फुटव्यापासून तयार झालेली फांदी हा– एक फांद… पुढे वाचा »
सोमवार, ३१ जुलै, २०२३
बा कपिल देवा,
-
बा कपिल देवा, तुम्हांसि नव्या पिढीतील खेळाडूंचे पैसे पाहून पोटात दुखते हे बरे नव्हे. उठसूठ आयपीएलच्या नावे खडे फोडताना या प्रकारच्या बाजारू खेळाचे उद्गाते आपणच आहोत हे विसरु नये. आयपीएलपूर्वी ’झी’च्या सुभाष चंद्रा यांनी चालू केलेल्या ’इंडियन क्रिकेट लीग’चे (ICL) पहिले सूत्रधार आपणच होतात हे लोक विसरले असतील असे समजू नये. आयपीएल वा पैशाच्या मागे लागणारे खेळाडू ही वाईट गोष्ट असेल तर त्याची पायाभरणी दस्तुरखुद्द आपणच केलेली आहे. वृथा नैतिकतेचा आव आणू नये. याच आयपीएलमधून उभ्या केलेल्या पैशातून बीसीसीआयने घसघशीत पैशांची थैली आपल्या ओटीत घातली होती, तेव्हा दर्जेदार क्रिकेटचे रक्त आपल्या हाती लागले आहे असे तुम्हाला वाटले नसावे. २००७ साली ICL चे विजेतेपद मिळवणार्या चेन्नई सुपरस्टार्सचा कर्णधार स्टुअर्ट लॉ. सोब… पुढे वाचा »
बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२
डकवर्थ-लुईस नियमावली आणि वृत्त-माध्यमे
-
१९९२ मध्ये झालेल्या विश्वचषक मालिकेमध्ये उपान्त्य सामन्यामध्ये द. आफ्रिका इंग्लंडशी खेळत होती. वंशभेदी धोरणांमुळे सुमारे बावीस वर्षे क्रिकेट जगतातून बाहेर ठेवल्यानंतर १९९१ मध्ये त्यांना पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात सामावून घेतले गेले होते. उपान्त्य सामन्यामध्ये पोचण्यापूर्वी त्यांनी पाच सामने जिंकून– त्यातही माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन– आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. ही विश्वचषक स्पर्धा– त्याकाळात ज्याला एकदिवसीय सामना म्हटले जाई तशा सामन्यांची असे. यात दोन्ही संघांना प्रत्येकी ५० षटकांचा एक डाव खेळायला मिळे आणि जो संघ अधिक धावा करेल, तो विजयी होत असे. परंतु या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे मध्यांतराच्या वेळेपर्यंत इंग्लंडला ४५ षटकेच खेळायला मिळाली. त्यांत त्यांनी २५२ धावा केल्या. उत्तरादाखल दुसरा डाव खेळताना द… पुढे वाचा »
Labels:
‘अक्षरनामा’,
क्रिकेट,
क्रीडा,
जिज्ञासानंद,
माध्यमे,
शक्यताविज्ञान
रविवार, ११ जुलै, २०२१
विम्बल्डनचा पावित्र्यभंग
-
टेनिसच्या चाहत्यांच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन ही चारी धाम यात्रा. प्रत्येक धामी तयार केलेल्या कोर्टनुसार कुठे कुठल्या प्रकारचा खेळ पाहायला जावे याचा अंदाज त्यांना असतो. फ्रेंच स्पर्धेसाठी मातीची कोर्ट वापरली जात असल्याने वेगापेक्षा चौफेर खेळाला (territorial play) अधिक महत्व असते. खेळणारी खेळाडू चतुरस्र नसेल तर तिचीची डाळ तिथे शिजत नाही. त्याच्या उलट विम्बल्डनचे. इथे हिरवळीची कोर्ट असतात. त्यामुळे इथे सर्व्ह अॅंड व्हॉली प्रकारचा खेळ अधिक होतो. यात चौफेर खेळापेक्षा अनेकदा बिनतोड (Ace) सर्व्हिस करणारी खेळाडू अधिक प्रभाव पाडत असते. त्याचबरोबर फ्रेंचमध्ये बेसलाईन (म्हणजे कोर्टाची कड) अधिक महत्वाची तर विम्बल्डनमध्ये नेटजवळ वर्चस्व गाजवू शकणार्या खेळाडूच्याला यशाची शक्यता अधिक असते. अमेरिकन स्पर्धेत कृत्रिम हार्डको… पुढे वाचा »
शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०
बुद्धिबळातील मार्शल-आर्ट
-
विषयसंगतीमुळे हा लेख ’ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »
मंगळवार, १६ जुलै, २०१९
सुरेख सामन्याचे विध्वंसक कवित्व
-
क्रिकेटचा अंतिम सामना पार पडला आणि त्याचे कवित्व अजून चालू आहे. क्रिकेट जणू जबरदस्तीने यांच्या खिशातून पैसे काढून नेते अशा आविर्भावात आणि सरकार क्रिकेटला पैसे देत या अडाणी समजात बुडलेले ’गावंढे’ असोत की क्रिकेटचे अट्टल फॅन असोत, चर्चा थांबवायचे नाव घेत नाहीत. मग ते धर्मसेना कसा चुकला, टोफेल म्हणतात तसे सहा ऐवजी पाच धावा दिल्या असत्या तर काय झाले असते, स्टोक्सने चेंडू ढकलून चीटिंग केले का? सर्वाधिक बिचारा कोण, केन की बेन? इतर खेळाडू शँपेन उधळत असताना आपली बाटली घेऊन हळूच सटकलेल्या जोफ्रा आर्चरने ती एकट्याने गट्टम केली की कुणाला प्रेजेंट दिली? इऑन (की ऑयन) मॉर्गनने ’अल्ला आमच्या बाजूला होता’ म्हटले म्हणून त्याला इथे बसून देशद्रोही ठरवता येईल का? चौकारांच्या संख्येऐवजी षटकारांची, बळींची, वाचवलेल… पुढे वाचा »
रविवार, २० फेब्रुवारी, २०११
क्रिकेट हा पक्षपाती खेळ आहे काय?
-
सध्या क्रिकेट विश्वचषकाचे वारे वाहत आहेत. त्या निमित्ताने त्यासंबंधी विविध चर्चा, कार्यक्रम झडताहेत. सगळेच हात धुवून घेताहेत. मग आपणच का मागे रहा. म्हणून आम्हीही काहीतरी लिहू म्हटले. बरेच दिवस आमच्या डोक्यात हा विषय ठिय्या देऊन बसला आहे. आम्हाला नेहमी असं वाटतं की ‘क्रिकेट हा पक्षपाती खेळ आहे का?’ थांबा थांबा, थोडंसं इस्कटून सांगतो. क्रिकेटमधे तीन प्रकारचे खेळाडू असतात– खरंतर यातले खेळाडू तीन प्रकारच्या जबाबदार्या पार पाडतात. ते फलंदाजी करतात, क्षेत्ररक्षण करतात किंवा गोलंदाजी करतात. यातले क्षेत्ररक्षक हे मैदानावर बहुसंख्येने असले, तरी ते तुलनेने दुय्यम असतात. मूळ लढाई ही गोलंदाज नि फलंदाजात असते. पण प्रश्न असा आहे की ‘हा खेळ या दोघांना समान संधी देतो की नाही?’ आम्ही जरा पटापट आठवतील तशा नोंदी केल्या. त्या इथे लिहितो आहे. एखादा फलं… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)









