-
‘गाणार्याला आधी गाणारं एक मन असावं लागतं, तरच गाणं संभवतं’ असं पुलंनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे एखादा काका/आजोबा किंवा मावशी/ताई (मी आजी म्हटलेले नाही, प्लीज नोट) मध्ये आपल्याप्रमाणे मूलपण दिसत असेल, तर बहुधा मुलांना परकाही आपला वाटत असावा. परक्याकडे मूल सहजपणे जाणं हे त्या परक्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलचे एक महत्त्वाचे स्टेटमेंट आहे असे मला वाटते. त्याबाबत मी सुदैवी आहे. बच्चे कंपनीचे नि माझे छान जमत असे. एखाद्या पिल्लाला ‘चल ये’ म्हटले नि ते माझ्याकडे आले नाही असे क्वचितच घडत असे. बहुधा माझ्यातही त्यांना त्यांचे प्रतिबिंब दिसत असावे. ‘असे’ आता म्हणावे लागते, कारण आता मी बराचसा एकांतवादी झाल्याने मोठ्यांचाच फारसा संपर्क येत नाही, नि त्यामुळे मुलांचाही. मध्यंतरी काही काळ मी मॉर्निंग वॉकला ब… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
अनुभव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
अनुभव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शुक्रवार, २३ मे, २०२५
सुजन गवसला जो
बुधवार, १६ एप्रिल, २०२५
स्वप्नात पाहिले जे...
-
‘स्वप्नं सत्यात उतरतात; पण ती उतरवावीही लागतात.’ राहीनं हे कुठं तरी वाचलं. कुठल्याशा प्रसिद्ध पुस्तकातलं वाक्य. ती विचारात पडली. त्यातून बुद्धिमत्ता असली की माणसाला प्रश्न पडतात; नसली की मग बरं असतं. ताप नाही- नि:स्वप्न निद्रा येते. इथं तसं नाही. आपण विचार करतो. प्रश्न विचारतो, स्वत:ला. आपल्याला स्वप्नं पडतात. मेंदूतल्या पेशी कशा ताणल्या जातात, एखाद्या तंबोर्याच्या तारेसारख्या- त्यावेळेस, स्वप्न पडत असताना. (म्हणजे हेही जाणवतं.) अंतस्थ रंग निळा-जांभळा असतो, मेंदूच्या आतल्या आत. मग ताणलेल्या पेशीपेशींमधून ते स्फुरतं- स्वप्न. एखादं गाणं स्फुरावं तसं. सहज आणि दु:खमय, अस्वस्थ. मग पडतं ते स्वप्नं वारंवार. एकच एक: आपण अथांग पोकळीत हरवून गेलो आहोत. पोकळीला अंत नाही, आरंभही नाही. म्हणजे पोकळीच कॅव्हिटी. आणि शोधतो आहोत काही तरी चाचपडत- तणावग… पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
जिज्ञासानंद,
भाष्य,
विश्लेषण,
साहित्य-कला
सोमवार, ७ एप्रिल, २०२५
दिशाभुलीचे गणित
-
अध्यक्षीय निवडणुकीतील प्रचारा-दरम्यान आणि निवडून आल्यानंतरही बर्याच देशांना ‘धडा शिकवण्या’चा मनसुभा ट्रम्प यांनी वारंवार बोलून दाखवला होता. ‘हे देश अमेरिकेकडून आयात होणार्या मालावर अवाच्या सवा कर आकारतात; त्या तुलनेत अमेरिकेत त्यांच्याकडून आयात मालावर बराच कमी कर आकारला जातो. यातून त्या देशांतील निर्यातदारांना अधिक फायदा होतो आहे आणि पर्यायाने अमेरिका नि त्या देशांत होणार्या व्यापारामध्ये अमेरिकेचे नुकसान होते आहे’ अशी त्यांची तक्रार होती. ‘मी यावर तोडगा काढेन, अमेरिकेवर अन्याय करणार्या या देशांना धडा शिकवेन’ असे आश्वासन ते देत होतो. सामान्य नागरिकांना ‘तुमच्यावर अन्याय होतो आहे’, ‘तुमचे हित धोक्यात आहे’, ‘याला बाहेरचे लोक जबाबदार आहेत’, ’मी हा अन्याय झटक्यात दूर करेन’ अशा घोषणा आवडतात. आपल्या दुरवस्थेला इतर कुणीतरी– विशेषत: आपल्य… पुढे वाचा »
शनिवार, २९ मार्च, २०२५
अमेझिंग अॅमेझॉन
-
(कथा, प्रसंग नि एक पात्र काल्पनिक असले तरी अनुभव वास्तव आहे.) काल घरातील ‘धुलाई निर्जंतुकीकरण द्रव्य’ (laundry disinfectant) संपले होते. ते आणायचा होते. इतरही लहान-सहान गोष्टी आणायच्या होत्या म्हणून सकाळी-सकाळी अॅमेझॉनच्या दुकानात शिरलो. आत शिरताक्षणीच तेथील प्रतिनिधीने धडाधड माझ्या मागच्या खरेदी सूचीतल्या वस्तू समोर टाकायला सुरुवात केली. मी म्हटलं, “राजा थांब जरा. मला काय हवे ते मी पाहातो.” तर तो पुन्हा आतल्या दिशेन धावला बरीचशी माहितीपत्रके घेऊन परतला नि डिस्काउंट, एकावर-एक फ्री वगैरे स्कीम्सची माहिती देऊ लागला. मी म्हटलं, “मला फक्त लॉण्ड्री डिसइन्फेक्टन्ट हवा आहे. बाकी किरकोळ गोष्टी माझ्या मी घेईन.” “ओ: शोअर सर,” दोन्ही हात कमरेजवळ एकावर एक असे ठेवत तो अदबीने म्हणाला, कंबरेत किंचित झुकून त्याने एक पाऊल मागे घेतले नि धावत जाऊन (… पुढे वाचा »
बुधवार, १७ एप्रिल, २०२४
गजरा मोहोब्बतवाला
-
सिंहगड रस्ता हा पुण्यातील काही प्रमुख रस्त्यांपैकी एक. पुण्याच्या दक्षिण भागाकडे जाणारा एकमेव मोठा नि म्हणून वर्दळीचा रस्ता. एका अस्मिताजीवी कोथरूडकर मैत्रिणीच्या मते ’ईं ऽऽऽऽ सिंहंगंडं रोंडं कांऽऽयं...’ असा प्रश्न विचारण्याजोगा असला, तरी रस्त्याचा आकार नि वर्दळीच्या गुणोत्तराच्या दृष्टीने पाहिले तर रस्त्यांमधला उच्चवर्गीय (उ.र.) . माझ्या घराकडे यायचे तर या मुख्य रस्त्यावरून एका चौकात आत वळावे लागते. याच्या आजूबाजूला मोठी वस्ती पसरल्याने मुख्य रस्त्याच्या इतका नाही पण अगदी गल्लीही नाही असा– मध्यमवर्गीय रस्ता (म. र.). या रस्त्यावरूनही आमच्या सहनिवासाकडे (सोसायटी) यायचे तर एका गल्लीत वळण घ्यावे लागते. ही गल्ली अर्थातच निम्नवर्गीय रस्ता (नि.र.), जेमतेम एक लेनइतकी रुंद. आता मी सांगणार आहे तो किस्सा या म.र.कडून आमच्या नि.र.च्या वळणार घडलेला … पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
अर्थव्यवस्था,
आकलन,
जिज्ञासानंद,
समाज
शनिवार, १३ एप्रिल, २०२४
हे ही असेच होते... ते ही तसेच होते - २
-
<< हे ही असेच होते... ते ही तसेच होते - १ --- (परस्परविरोधी विचारांचे(?) झेंडे घेतलेल्या दोघांचे अनुभव.) जय श्रीराम आमच्या सोसायटीमध्ये सलग तीन इमारती आहेत. पैकी आमच्या शेजारील इमारतीमध्ये एक उतारवयाकडे झुकलेले गृहस्थ राहतात. अयोध्येमधील राममंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशीच्या उन्मादात ते अक्षरश: लहान मुलांनी हंडीच्या वेळी अथवा गणेश-विसर्जन मिरवणुकीत नाचावे तसे नाचत होते. तिकडे प्रतिष्ठापना पुरी झाल्यावर हे सोसायटीतील घरोघरी जाऊन ‘पूजा केली का?’ विचारत होते नि देवघराचा फोटो काढत होते. मला विचारल्यावर मी ‘हो’ म्हणून वाटेला लावण्याचा प्रयत्न केला. त्यावर ‘फोटो काढायचे आहेत’ म्हणत घरात घुसू लागले. त्यांना थोपवत मी आडवळणाने कारणे सांगून वाटेला लावले. दाराशी आलेल्या प्रचारकांक… पुढे वाचा »
रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४
दूध देणारे ईव्हीएम आणि बेकन खाणारा मित्र
-
आज सकाळी फिरुन येताना एक परिचित काका भेटले. हे काका वयानं नसले तरी मनाने अजूनही ‘सालं ब्रिटिशांचं राज्य बरं होतं. आपल्या लोकांच्या पाठीवर हंटरच हवा.’च्या वयाचे. काकांच्या हातात दांडी असलेली स्टीलची बरणी होती. माझं ‘राम राम’ त्यांचा ‘जय श्रीराम’ झाल्यावर मी औपचारिकपणे विचारलं, “फिरायला का?” “नाही...” काका छाती एक से.मी. पुढे काढून म्हणाले– जणू ‘सकाळी फिरायला जाणे हे मेकॉलेच्या शिक्षणातून आलेले खूळ आहे’ हे वाक्य न बोलता माझ्या तोंडावर फेकत आहेत. “... दूध आणायला आलो होतो.” हातातील बरणी उंचावत ते म्हणाले. “काय काका, पिशव्यांमध्ये घरपोच दूध येत असताना हा आटापिटा कशाला?” मी कळ काढली नि काका ‘हर हर महादेव...’ म्हणत माझ्यावर तुटून पडले. संतापाच्या भरात ‘जऽऽऽऽऽऽय श्रीऽराऽऽऽम.’ ही नवी रणघोषणा असल्याचा फतवा ते विसरले. … पुढे वाचा »
मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३
पांचामुखी परमेश्वर ?
-
“इतक्या लोकांनी धर्म स्वीकारला तर तो खरा, नाहीतर खोटा, हे कसले तर्कशास्त्र आहे? ... एखाद्या धर्माचे अनुयायी असणे ही डोळसपणे स्वीकारलेली कृती नसून ती एक अंगवळणी पडलेली केवळ सवय झालेली असते. आणि अशांच्या संख्येच्या आधारे तुम्ही तुमच्या ज्ञानाची पारख करता, हे सगळे विचित्रच नाही का?” (जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘यात्रिक’ या कथेमधून) एखाद्या दाव्याच्या पाठीमागे उपस्थितांचे बहुमत उभे करून तो दावा वास्तव असल्याशी मखलाशी करण्याला बराच प्राचीन इतिहास आहे. बहुतेक धार्मिकांनी आपले संख्याबळ वाढवत नेत आपल्या धारणा इतरांवर लादण्याचा मार्ग अनुसरला आहे. धर्म नि त्यावर आधारित समाजव्यवस्था ही ‘वरून खाली’ स्वरूपाची आहे. व्यवस्थेचे नीतिनियम नि अवलोकन हे मूठभर श्रेष्ठींकडून निर्माण नि नियंत्रित केले जात असते. उलट प्रातिनिधिक लोकशाही ही ‘खालून वर’ म्हणजे समाजगटा… पुढे वाचा »
शनिवार, ८ जुलै, २०२३
बॉटासुराचा उदयास्त
-
दर महिन्याच्या अखेरीस मी ब्लॉगचा आढावा घेत असतो. पोस्ट, ड्राफ्ट्स वगैरेसह मी तिथे वाचक-राबता कसा आहे हे ही पाहात असतो. मागील महिन्यात माझ्या ‘वेचित चाललो...’( vechitchaalalo.blogspot.com ) या ब्लॉगवर वाचक-राबता प्रचंड वाढला आहे असे दिसून आले. पहिली प्रतिक्रिया ‘व्वा: आपला ब्लॉग बरेच लोक वाचू लागलेले दिसतात.’ अशी होती. पण नंतर असे दिसले की एरवी सरासरी मासिक वाचनांच्या जवळजवळ दहापट वाचने झाली आहेत. हे अजिबात संभाव्य नाही असे माझे मत आहे. कारण एकतर ब्लॉग मराठीमधून, त्यात जेमतेम दीड-एकशे पोस्ट्स. इतक्या वेगाने वाचायचे म्हणजे काही हजारात लोक इकडे वळायला हवेत. हे अशक्यच आहे. थोडे खणल्यावर लक्षात आले अगदी दर तीन ते पाच मिनिटाला एक या वेगाने हिट्स मिळत आहेत. मग डोक्यात प्रकाश पडला, की कुणीतरी बॉट(BOT) लावून ठेवलेला दिसतो. … पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
जिज्ञासानंद,
ब्लॉग,
माहिती तंत्रज्ञान
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)