Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
श्रद्धा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
श्रद्धा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १३ एप्रिल, २०२४

हे ही असेच होते... ते ही तसेच होते - २


  • << हे ही असेच होते... ते ही तसेच होते - १ --- (परस्परविरोधी विचारांचे(?) झेंडे घेतलेल्या दोघांचे अनुभव.) जय श्रीराम आमच्या सोसायटीमध्ये सलग तीन इमारती आहेत. पैकी आमच्या शेजारील इमारतीमध्ये एक उतारवयाकडे झुकलेले गृहस्थ राहतात. अयोध्येमधील राममंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशीच्या उन्मादात ते अक्षरश: लहान मुलांनी हंडीच्या वेळी अथवा गणेश-विसर्जन मिरवणुकीत नाचावे तसे नाचत होते. तिकडे प्रतिष्ठापना पुरी झाल्यावर हे सोसायटीतील घरोघरी जाऊन ‘पूजा केली का?’ विचारत होते नि देवघराचा फोटो काढत होते. मला विचारल्यावर मी ‘हो’ म्हणून वाटेला लावण्याचा प्रयत्न केला. त्यावर ‘फोटो काढायचे आहेत’ म्हणत घरात घुसू लागले. त्यांना थोपवत मी आडवळणाने कारणे सांगून वाटेला लावले. दाराशी आलेल्या प्रचारकांक… पुढे वाचा »

गुरुवार, २ जून, २०२२

हनुमान जन्मला गं सखे


  • अमेरिकेमध्ये जसे ’खटला जॉनी डेप जिंकेल, की त्याची भूतपूर्व पत्नी एम्बर हर्ड?’ हा सध्या राष्ट्रीय प्रश्न होऊन बसला आहे, तद्वत ’हनुमानाचे जन्मस्थान कोणते?’ हा विषय भरतभूमीमध्ये सांप्रतकाळी महत्वाचा होऊन बसला आहे. किष्किंधा, अंजनेरी यांच्या वादात आता सोलापुरातील कुगावनेही उडी घेतली आहे. तीनही ठिकाणी ’हनुमानाचा जन्म आमच्या गावी झाला’ अशी श्रद्धा असणारे अनेक लोक आहेत. ते तसे मान्य झाल्याने वाढलेल्या भक्ति-पर्यटनामध्ये त्यातील काहींचे आर्थिक हितसंबंधही गुंतलेले असतील, हे ही त्यांच्या ’श्रद्धे’चे कारण असू शकेल. पण अशा माणसांना वगळून आपण ज्यांची खरोखर तशी श्रद्धा आहे अशांचीच बाजू ध्यानात घेऊ. श्री भक्त-हनुमान मंदिर रम्बोदा, श्रीलंका. विषय एका धर्मांतर्गत असल्याने सध्या शास्त्रार्थावर न… पुढे वाचा »

मंगळवार, १७ मे, २०२२

उंदीर-श्रद्धा आणि इलेक्ट्रॉन-श्रद्धा


  • आपल्या घरातील एक बटण दाबले की दिवा प्रकाशित होतो किंवा पंखा सुरु होतो असा आपला अनुभव असतो. वारंवार अनुभवल्यानंतर कार्य-कारणभाव स्पष्ट होतो. आता त्यामागचे विज्ञान सांगितले तर इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रिसिटी, वगैरे बाबी येतील. पण श्रद्धावान मंडळी म्हणतील, ‘तुम्ही म्हणता देव दिसत नाही तसेच हा तुमचा इलेक्ट्रॉन, ती वीज तरी कुठे दिसते? न पाहता त्यांचे अस्तित्व कसे मान्य करतोस?’ हा मुद्दा बरोबर आहे. पण मी इलेक्ट्रॉनचे अस्तित्व मान्य करणे वा न करणे याचा माझ्या जगण्याशी थेट संबंध नसतो. पृथ्वी सपाट आहे असे म्हणणारे लोक भूगोलाच्या एका तुकड्यावर जगतच असतात. कारण ती सपाट आहे की दीर्घगोल याचा त्यांच्या जगण्याशी थेट संबंध येत नाही. त्याच धर्तीवर माझा इलेक्ट्रॉनशी कधी समोरासमोर सामना न होताही माझे जगणे त्या आधारे सिद्ध केलेल्या अनुभवावर बेतलेले असते. त्या सार… पुढे वाचा »

मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१९

हे ही असेच होते... ते ही तसेच होते - १


  • https://www.shutterstock.com/ येथून आभार. विचाराचे वावडे नि माणसांची ड्रांव ड्रांव कळत्या वयापासून मी कोणतेही कर्मकांड, उपासना करणे बंद केले. अर्थात घरच्यांनी ते करण्यास माझा विरोध नव्हता/नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असे मी मानतो. इतकेच काय त्याला लागणारे साहित्यही आणून देत असे. पण त्यामुळे आमचे तीर्थरूप आमच्यावर उखडून होते. म्हणजे ते स्वत: काही करत/करतात असे मुळीच नाही. अस्सल भारतीय मानसिकतेप्रमाणे जे काय करायचे ते काटेकोर करायचे नि ते इतरांनी - म्हणजे आईने - करायचे असा त्यांचा बाणा होता. आपण नाही का ज्ञानेश्वर जन्मावेत पण इतरांच्या घरी, तुकोबा जन्मावा पण तो आमचा जावई म्हणून नको, शिवाजी जन्मावा तो फार लांब नको म्हणून शेजारच्या घरी... अलीकडचे पाहिले तर ’हौं जौं द्या … पुढे वाचा »