Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
विज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २२ जुलै, २०२२

आता घरीच तयार करा एक किलो सोने


  • भारतीयांच्या मनात सोने या धातूच्या हव्यासाबाबत 'Why Indians are obsessed with the yellow metal' या शीर्षकाचा एक लेख मध्यंतरी पाहण्यात आला होता. (इंग्रजी भाषेत असल्याने नुसताच पाहिला, वाचू शकलो नाही.). नोटाबंदी काळात मायबाप सरकारने सोने खरेदीसाठी जुन्या नोटा वापरण्याची परवानगी दिल्यावर जणू काही सोनेच स्वस्त झाले असे समजून ज्यांच्याकडे बदलून घेण्यासाठी जुन्या नोटा नव्हत्या ते लोकही चेकबुक नि क्रेडिट कार्ड घेऊन सोने घेण्यास धावले होते. अशा माणसांच्या अडाणीपणाचे मला वाईट वाटले होते. थोडेसे पैसे खर्च करुन हवे तितके सोने ते घरच्या घरीच तयार करु शकत असताना बाजारातून विकत आणण्याचा गाढवपणा का करावा हे मला उमगले नव्हते. तेव्हाच मला विचारले असते तर ही रेसिपी त्यांना देऊन टाकली असती. असो. निदान आता ही सर्वांसाठी खुली करुन भरपूर सोने निर्माण … पुढे वाचा »

मंगळवार, १७ मे, २०२२

उंदीर-श्रद्धा आणि इलेक्ट्रॉन-श्रद्धा


  • आपल्या घरातील एक बटण दाबले की दिवा प्रकाशित होतो किंवा पंखा सुरु होतो असा आपला अनुभव असतो. वारंवार अनुभवल्यानंतर कार्य-कारणभाव स्पष्ट होतो. आता त्यामागचे विज्ञान सांगितले तर इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रिसिटी, वगैरे बाबी येतील. पण श्रद्धावान मंडळी म्हणतील, ‘तुम्ही म्हणता देव दिसत नाही तसेच हा तुमचा इलेक्ट्रॉन, ती वीज तरी कुठे दिसते? न पाहता त्यांचे अस्तित्व कसे मान्य करतोस?’ हा मुद्दा बरोबर आहे. पण मी इलेक्ट्रॉनचे अस्तित्व मान्य करणे वा न करणे याचा माझ्या जगण्याशी थेट संबंध नसतो. पृथ्वी सपाट आहे असे म्हणणारे लोक भूगोलाच्या एका तुकड्यावर जगतच असतात. कारण ती सपाट आहे की दीर्घगोल याचा त्यांच्या जगण्याशी थेट संबंध येत नाही. त्याच धर्तीवर माझा इलेक्ट्रॉनशी कधी समोरासमोर सामना न होताही माझे जगणे त्या आधारे सिद्ध केलेल्या अनुभवावर बेतलेले असते. त्या सार… पुढे वाचा »

सोमवार, २ मे, २०२२

प्रकाश नावाची प्रत्येक व्यक्ती वैज्ञानिक असते


  • मी महाविद्यालयात शिकत असताना एका मित्राने एक गंमतशीर सिद्धांत मांडून त्याची सिद्धताही दिली होती. ही गंमत महाविद्यालयीन प्रवृत्तीला अनुसरुनच होती. परंतु काळ जातो तसे आपली दृष्टी नि विचार व्यापक होत जातात आणि ’साध्याही विषयात आशय मोठा किती आढळे’ असा अनुभव येतो. या सिद्धांताबाबतही मला असाच काहीसा अनुभव आला. --- त्याचा सिद्धांत असा होता: प्रकाश नावाची प्रत्येक व्यक्ती वैज्ञानिक असते. www.thealternativedaily.com येथून साभार. त्याची सिद्धता त्याने अशी दिली होती: प्रकाश म्हणजे पक्या, पक्या म्हणजे क्याप, क्याप म्हणजे टोपी, टोपी म्हणजे पीटो, पीटो म्हणजे मारा, मारा म्हणजे रामा, रामा म्हणजे देव, देव म्हणजे वदे, वदे म्हणजे बोले, बोले म्हणजे लेबो... आणि लेबो हा एक वैज्ञानिक होता म्ह… पुढे वाचा »