Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
तत्रैव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तत्रैव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

‘ग्लॅड फॉर ग्लाड?’ : ग्लाड, वीरभूषण आणि मी


  • (‘थँक यू, मि. ग्लाड’ या अनिल बर्वे लिखित कादंबरी/नाटक यांबाबत विवेचन करणारे दोन लेख ‘वेचित चाललो’ वर लिहिले होते. विषयसंगतीनुसार काही तपशील वगळून हा मजकूर एकत्रितरित्या ‘तत्रैव’ नियतकालिकाच्या नोव्हेंबर-डिसेंबर-२०२४ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.) पुस्तक : ‘थॅंक यू, मिस्टर ग्लाड’ लेखक : अनिल बर्वे प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन आवृत्ती सहावी, दुसरे पुनर्मुद्रण (२०२०) —काही झाले तरी ग्लाडसाहेबांची राजनिष्ठा मोठी कडवी होती हे खरे. प्राण गेला तरी साहेब खाल्ल्या मिठाला जागल्याशिवाय राहिला नसता. बेचाळीसच्या चळवळीत हाती सापडलेल्या सत्याग्रह्यांना कारणे शोधून शोधून ग्लाडसाहेबाने गुरासारखे बडवून काढले होते. पण युनियन जॅक उतरून तिरंगा वर चढला, तेव्हा ग्लाडसाहेबाने दु:ख आवरून एक कडक सॅल्… पुढे वाचा »

गुरुवार, ६ एप्रिल, २०२३

भाषा: राष्ट्र... आणि हत्यार!


  • (प्रसिद्ध उर्दू शायर नि कवी जावेद अख़्तर यांनी २०१५ मध्ये ‘जश्न-ए-रेख़्ता' या वार्षिक ऊर्दू संमेलनामध्ये केलेल्या भाष्याचा व्हिडिओ यापूर्वी ‘वेचित चाललो...’ वर शेअर केला होता. त्या अनुषंगाने भाषा, राष्ट्र ही संकल्पना आणि तदनुषंगिक विद्वेषाचे राजकारण यावर काही भाष्य केले होते. अख़्तर यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांना खडे बोल सुनावल्याच्या पार्श्वभूमीवर त्या लेखातील बहुसंख्य मुद्दे घेऊन ‘तत्रैव’ नियतकालिकाच्या जाने-फेब्रु २०२३ च्या अंकासाठी लिहिलेला लेख.) पु. ल. देशपांडे यांनी एका दंगलीच्या काळातील एक गंमतीशीर किस्सा सांगितला आहे. त्या काळात संघाचे स्वयंसेवक गस्त वगैरे घालत असत. एकदा पुलं नि त्यांचे काही मित्र रात्री उशीरा घरी परतत असताना एका अंधाऱ्या बोळातून आवाज आला, ‘थांबा. कोण आहे, मित्र की… पुढे वाचा »

रविवार, १४ ऑगस्ट, २०२२

तीन भूमिका (उत्तरार्ध) : वस्तुनिष्ठता - तीन उदाहरणे


  • बाजूबद्धता, तटस्थता आणि वस्तुनिष्ठता « मागील भाग --- एखादा प्रश्न किती लोकांच्या मनात निर्माण झाला याला तसे फारसे महत्त्व नाही. उलट एकाच वेळी अनेकांच्या मनात जर एखादा प्रश्न निर्माण झाला, तर तो तितकासा महत्त्वाचा नसण्याची शक्यता अधिक. कारण मोलाचा प्रश्न एखाद्याच्याच मनात निर्माण होऊ शकतो. आता तू म्हणतोस त्याप्रमाणे हा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण होऊनही त्यांनी त्याचा उच्चार केला नाही, याचा अर्थ असा की त्या प्रश्नाचं उत्तर जन्माला घालण्याचं स्वातंत्र्यही त्यांनी स्वतःजवळ सुरक्षित ठेवलं आहे. (गौतमीपुत्र कांबळे यांच्या 'परिव्राजक' या कथेमधून) तटस्थता म्हणजे काय हे बहुसंख्येला समजते. बाजूबद्धता वा गट-बांधिलकी तर इतकी महामूर आहे की त्याबाबत अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही. परंतु 'वस्तुनिष्ठता म्हणजे काय?' याबाबत अन… पुढे वाचा »

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

तीन भूमिका (पूर्वार्ध) : बाजूबद्धता, तटस्थता आणि वस्तुनिष्ठता


  • ( वस्तुनिष्ठता हा खरंतर objective इंग्रजी शब्दाचा अपुरा अनुवाद आहे. पण आता प्रचलित झाला आहे, मराठी नि हिंदीतही. त्यामुळे इथे मी तोच वापरला आहे. ) आदिम काळात माणूस टोळ्यांच्या वा कळपांच्या स्वरूपात राहात होता. त्या काळातील मानसिकतेचा पगडा माणसाच्या मनावर अजून शिल्लक राहिलेला आहे. त्या काळी ’टोळी नसलेला माणूस’ ही संकल्पनाच माणसाला मानवत नव्हती . तसेच आजही बाजू नसलेली, तटस्थ वा वस्तुनिष्ठ विचाराची, स्वतंत्र भूमिकेची व्यक्ती अस्तित्वात असते यावर बहुसंख्येचा विश्वास नसतो. ’ती कोण आहे?’ यापेक्षा ’ती कोणत्या गटाची आहे?’ या प्रश्नाच्या उत्तराचा मागोवा घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ’त्या व्यक्तीची वैय्यक्तिक ओळख काय?’ हा प्रश्नच त्यांच्यासमोर नसतो. ती कोणत्या गावाची, घराण्याची, जातीची, धर्माची आहे या प्रश्नांच्या उत्तरांतूनच समोरच्या व्यक्त… पुढे वाचा »

मंगळवार, १७ मे, २०२२

उंदीर-श्रद्धा आणि इलेक्ट्रॉन-श्रद्धा


  • आपल्या घरातील एक बटण दाबले की दिवा प्रकाशित होतो किंवा पंखा सुरु होतो असा आपला अनुभव असतो. वारंवार अनुभवल्यानंतर कार्य-कारणभाव स्पष्ट होतो. आता त्यामागचे विज्ञान सांगितले तर इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रिसिटी, वगैरे बाबी येतील. पण श्रद्धावान मंडळी म्हणतील, ‘तुम्ही म्हणता देव दिसत नाही तसेच हा तुमचा इलेक्ट्रॉन, ती वीज तरी कुठे दिसते? न पाहता त्यांचे अस्तित्व कसे मान्य करतोस?’ हा मुद्दा बरोबर आहे. पण मी इलेक्ट्रॉनचे अस्तित्व मान्य करणे वा न करणे याचा माझ्या जगण्याशी थेट संबंध नसतो. पृथ्वी सपाट आहे असे म्हणणारे लोक भूगोलाच्या एका तुकड्यावर जगतच असतात. कारण ती सपाट आहे की दीर्घगोल याचा त्यांच्या जगण्याशी थेट संबंध येत नाही. त्याच धर्तीवर माझा इलेक्ट्रॉनशी कधी समोरासमोर सामना न होताही माझे जगणे त्या आधारे सिद्ध केलेल्या अनुभवावर बेतलेले असते. त्या सार… पुढे वाचा »

सोमवार, २ मे, २०२२

प्रकाश नावाची प्रत्येक व्यक्ती वैज्ञानिक असते


  • मी महाविद्यालयात शिकत असताना एका मित्राने एक गंमतशीर सिद्धांत मांडून त्याची सिद्धताही दिली होती. ही गंमत महाविद्यालयीन प्रवृत्तीला अनुसरुनच होती. परंतु काळ जातो तसे आपली दृष्टी नि विचार व्यापक होत जातात आणि ’साध्याही विषयात आशय मोठा किती आढळे’ असा अनुभव येतो. या सिद्धांताबाबतही मला असाच काहीसा अनुभव आला. --- त्याचा सिद्धांत असा होता: प्रकाश नावाची प्रत्येक व्यक्ती वैज्ञानिक असते. www.thealternativedaily.com येथून साभार. त्याची सिद्धता त्याने अशी दिली होती: प्रकाश म्हणजे पक्या, पक्या म्हणजे क्याप, क्याप म्हणजे टोपी, टोपी म्हणजे पीटो, पीटो म्हणजे मारा, मारा म्हणजे रामा, रामा म्हणजे देव, देव म्हणजे वदे, वदे म्हणजे बोले, बोले म्हणजे लेबो... आणि लेबो हा एक वैज्ञानिक होता म्ह… पुढे वाचा »

सोमवार, १४ मार्च, २०२२

आनंदे न्हाती त्यात तृणांची पाती


  • चांगल्या/श्रेष्ठ कवितेचा एक गुण असा की निव्वळ शब्दांपलीकडे जाऊन न लिहिलेल्या, कदाचित अजून न घडलेल्या घटनेवरही ती समर्पक भाष्य करते. कालाच्या, भूगोलाच्या, सामाजिक पार्श्वभूमीच्या सीमा ओलांडून ती व्यापक होते... त्याच वेळी विशिष्ट व्यक्ती, घटना, गट, स्थितीशी सुसंगतही होते तेव्हा ती श्रेष्ठ कविता ठरते. कुसुमाग्रजांची अहि-नकुल या शीर्षकाची कविता आहे. अहि म्हणजे सर्प आणि नकुल म्हणजे मुंगूस या दोन हाडवैर्‍यांच्या संग्रामाचे चित्रमय शैलीत केलेले वर्णन आहे. शालेय अभ्यासक्रमातही ही कविता शिकविली जात असे, कदाचित अजूनही असेल. त्याच्या अखेरीस सर्पाचे निर्दालन करुन नकुल चालता होतो तेव्हा आम्हा शालेय विद्यार्थ्यांना आनंद होत असे. सर्प म्हणजे वाईट, दुष्ट प्रवृत्तींचे प्रतीक. त्यातच ‘शत्रू मानलेल्या देशातील, धर्मातील अर्भकालाही ठार मारावे, अन्यथा ते मोठे… पुढे वाचा »