Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
भाषा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भाषा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ६ एप्रिल, २०२३

भाषा: राष्ट्र... आणि हत्यार!


  • (प्रसिद्ध उर्दू शायर नि कवी जावेद अख़्तर यांनी २०१५ मध्ये ‘जश्न-ए-रेख़्ता' या वार्षिक ऊर्दू संमेलनामध्ये केलेल्या भाष्याचा व्हिडिओ यापूर्वी ‘वेचित चाललो...’ वर शेअर केला होता. त्या अनुषंगाने भाषा, राष्ट्र ही संकल्पना आणि तदनुषंगिक विद्वेषाचे राजकारण यावर काही भाष्य केले होते. अख़्तर यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांना खडे बोल सुनावल्याच्या पार्श्वभूमीवर त्या लेखातील बहुसंख्य मुद्दे घेऊन ‘तत्रैव’ नियतकालिकाच्या जाने-फेब्रु २०२३ च्या अंकासाठी लिहिलेला लेख.) पु. ल. देशपांडे यांनी एका दंगलीच्या काळातील एक गंमतीशीर किस्सा सांगितला आहे. त्या काळात संघाचे स्वयंसेवक गस्त वगैरे घालत असत. एकदा पुलं नि त्यांचे काही मित्र रात्री उशीरा घरी परतत असताना एका अंधाऱ्या बोळातून आवाज आला, ‘थांबा. कोण आहे, मित्र की… पुढे वाचा »

बुधवार, २० एप्रिल, २०२२

कुराणाच्या संस्कृत अनुवादाच्या निमित्ताने


  • बातमी: कुराणाचा प्रथमच संस्कृतमध्ये भावानुवाद ; दिवंगत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या ग्रंथाचे शुक्रवारी प्रकाशन --- काही काळापूर्वी जावेद अख्तर यांचे रेख़्ता या वार्षिक उर्दू संमेलनातील भाषण ऐकले होते, त्यावर ’वेचित चाललो...’ वर (’ भाषा: राष्ट्र, धर्म... आणि हत्यार ’) लिहिलेही होते. त्या भाषणादरम्यान त्यांनी केलेला एक उल्लेख मला रोचक वाटला होता. ते असं सांगतात की, १७९८ मध्ये कुराण प्रथम उर्दूमध्ये अनुवादित केले गेले. त्यावेळी ’असल्या अमंगळ भाषेत आमचे पवित्र पुस्तक लिहिले’ म्हणून तो अनुवाद करणार्‍याविरोधात मौलवींनी फतवा काढला होता. त्याचवेळी ’असल्या अमंगळ भाषेला ’देव’नागरी नावाने ओळखळी जाणारी आमची पवित्र लिपी वापरल्याने ती विटाळेल’ असा विरोध हिंदू समाजातील संभावितांनी केला होता. ’अमंगळतेच्या कल्पना अमंगळ मनातूनच येतात’ हे माझे … पुढे वाचा »