Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

बुधवार, १३ मे, २०२६

सत्ताकारण: बंगाल, भारत आणि त्यापलिकडे


  • नुकत्याच पार पडलेल्या बंगाल निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगाने मनोज अगरवाल यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक केली होती. तर त्यापूर्वी भाजपची बीजे पेरण्यासाठी आवश्यक नांगरट म्हणून पार पडलेल्या Special Intensive Revision ऊर्फ SIR साठी विशेष निरीक्षक म्हणून सुब्रतो गुप्ता यांची नेमणूक केली होती. या दोघांनीही आयोगाने नि भाजपने दिलेली कामे चोख पार पाडली नि भाजपचे सरकार आणण्यात आपला वाटा उचलला. निवडणूक आयोगाच्या या हस्तकांना आज नव्या भाजप सरकारने भरघोस बक्षीस दिले आहे. मनोज अगरवाल यांची बंगालचे मुख्य सचिव (Chief Secretary) म्हणून, तर सुब्रतो गुप्ता यांची मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे मुख्य सल्लागार म्हणून नेमणूक झाली आहे. गुजरात मॉडेल हे साधारणपणे असे आहे. जोरदार भाषणबाजीने जनतेला गार करुन सोडणारा बुवा म्हणून म्हणून मिरवले जात… पुढे वाचा »

शनिवार, २५ एप्रिल, २०२६

‘नारबाची वाडी’ , ‘माय ओल्ड लेडी’ आणि हयातहक्काची संकल्पना


  • दहा-बारा वर्षांपूर्वी ‘ नारबाची वाडी ’ नावाचा एक मराठी चित्रपट प्रकाशित झाला होता. ‘लोभाहाती माती’ या बाळबोध संस्काराचे हलकेफुलके चित्रपटीय रूप असलेल्या या चित्रपटाची कथा अगदी सरळसोट. एक लहान नातू सोडून कुणीही नसलेल्या नारबा नावाच्या कुण्या एकाची देखणी वाडी पाहून लोभावलेला जमीनदार(खोत) ती बळकावण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्या हयातीमध्ये त्याची ती इच्छा फलद्रूप होत नाही. मग काही वर्षांनी त्याचा मुलगा आपल्या वडिलांची इच्छा पुरी करण्यासाठी नारबाच्या मागे लागतो. नारबा एव्हाना आणखी वयस्कर झाला आहे. ‘आपल्याला जगण्यात काही रस उरलेला नाही. लवकरच वरचे बोलावणे येईल.’ असे तो सतत बोलत असतो. हे ऐकून या धाकल्या जमीनदाराच्या तोंडाला पाणी सुटते. झाडावरुन पिकले फळ टपकन पडावे तसा हा पिकला म्हातारा पडेल, तेव्हा त्याची वाडीही तशीच अलगदपणे आपल्या हाती पडावी… पुढे वाचा »

मंगळवार, १३ जानेवारी, २०२६

आली माझ्या घरी ही...


  • ...संक्रांत! का? नेहमी दिवाळी आली म्हणूनच गाणं म्हणावं की काय? की गोड बोलायला सांगणारी अलिकडे आवडेनाशी झाली आहे ज्वलज्जहाल, कडवट हिंदूंना? पण गंमत अशी, की यावेळी खुद्द संक्रांतच गोड बोलेना झाली होती. सांगतो ना काय झालं ते. “तुमची नाटकं फार झाली...” संक्रांत आज फारच वैतागली होती. दाते पंचांगवाले काका तिला पुढच्या वर्षीच्या एन्ट्रीचे डीटेल्स समजावून सांगत होते, पण ती त्यांचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हती. “जेव्हा पाहावं तेव्हा हे ‘आग्नेयेकडून येते आहे नि नैऋत्येकडे जाते आहे. जाताना पश्चिमेकडे पाहाते आहे.’ वगैरे फालतूपणा बास आता. साधंसोपं ‘पश्चिमेकडून येते आहे नि दक्षिणेकडे जाते आहे’ असं का नाही? “आणि ते मेंढ्यावर आरूढ झाली आहे न्‌ बैलावर आरूढ झाली आहे काय; एकजात गाढवं आहेत सारी. जरा चांगलं कन्फर्टेबल वाहन द्या. घाणेरडा… पुढे वाचा »

सोमवार, १२ जानेवारी, २०२६

me me me me meme(१), इलेक्शन वाले meme


  • साडेतीन-चार वर्षांपासून महाराष्ट्राने पक्षांतराच्या राजकारणात तळ गाठून आजवर हिणवलेल्या उत्तर भारतासमोर आपली लाज घालवली आहे. सध्या जवळजवळ नऊ वर्षांनी महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरु आहे. इतकी वर्षे तुंबलेली अनेकांची राजकीय लालसा फसफसून वाहू लागलेली आहे. निलाजर्‍या राजकारणाचा हा चिखल शरम येईल इतका चिवडला जातो आहे. याची ना राजकारण्यांना लाज आहे ना ‘आपला पक्ष जिंकला ना, मग बास’ या मानसिकतेच्या मतदारांनाही. या सार्‍या विषण्ण करणार्‍या परिस्थितीवर कडवट हसून पुढे सरकण्याखेरीज सुज्ञांच्या हाती काही उरलेले नाही. काही दिवसांपूर्वी संगणकावरील इमेजेस पाहाताना एक-दोन चित्रांत निवडणूक-भाष्य चमकून गेले. पाहाता पाहात चोवीस तासांत तीस-एक मीम्स तयार झाली. त्यांची संगतवार मांडणी करताना दिसलेली छिद्रे भरून काढणार्‍य… पुढे वाचा »