-
ट्रॉयचे युद्ध « मागील भाग पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे वैज्ञानिक प्रयोगातून मिळालेली निरीक्षणे ज्याप्रमाणे आलेखावर नोंदवून पुढच्या— भाकिताच्या टप्प्याकडे सरकतो, त्याप्रमाणे ट्रॉयच्या, हेलनच्या कथेमधून काही निरीक्षणे, काही प्रश्न, काही तपशील आधी नोंदवून ठेवणार आहे. त्यानंतर त्याच्या आधारे काही निष्कर्षाकडे जाता येते का पाहाणार आहे. ट्रॉयचे हे युद्ध तब्बल दहा वर्षे चालले असे इलियड (आणि ओडिसी) सांगते. कोणत्याही कालखंडामध्ये हा कालावधी बराच मोठा आहे. सुरुवातीला म्हटले तसे २७-२८ ग्रीक राजे, सत्ताधीश हे एकत्रितरित्या ट्रॉयविरोधात लढत होते. त्यांनी केलेल्या नाकेबंदीमुळे ट्रॉयला अन्न-टंचाई सहन करावी लागत होती. असे असूनही तब्बल एक दशकभर ट्रॉयने ग्रीकांच्या संयुक्त सैन्याला दाद लागू दिलेली नाही . यावरून ट्रॉय हे लष्करीदृष्ट्या बलिष्ठ किंवा … पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
मालिका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मालिका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
बुधवार, १७ जून, २०२६
हेलन ऑफ ट्रॉय – एक आकलन: ५. काही बिंदू आणि एक आलेख
सोमवार, १५ जून, २०२६
हेलन ऑफ ट्रॉय – एक आकलन: ४. ट्रॉयचे युद्ध
-
पॅरिस आणि हेलन « मागील भाग अलेक्झांडर नावाचा एक तरुण मेंढपाळ माउंट आयडा येथे राहात होता. काही कामानिमित्ताने तो ट्रॉय शहरात आलेला असताना तिथे वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन केलेले त्याला दिसले. सहज म्हणून त्याने त्यात भाग घेतला नि राजपुत्र हेक्टर याला पराभूत करुन विजेताही ठरला. त्याचे कौशल्य पाहून राजा प्रायम नि राणी हेकुबा चांगलेच प्रभावित झाले. या विजेत्याला दत्तक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मेंढपाळपुत्र अलेक्झांडर पॅरिस या नावाने राजाचा पुत्र म्हणून राजकुलामध्ये समाविष्ट झाला. पॅरिसचे धार्ष्ट्य पॅरिस याच्या ‘हेसिओनी’ (Hesione) या आत्येच्या संदर्भात एक कथा सांगितली जाते, जिला काही ठिकाणी ‘ट्रॉयचे पहिले युद्ध’ असे म्हटले जाते. हेराक्लिस (१) याने ट्रॉयवर हल्ला करुन त्याचा राजा लीओमेडॉन (Leomedon) याची नि त्याच्या पुत्रांची हत… पुढे वाचा »
शुक्रवार, १२ जून, २०२६
हेलन ऑफ ट्रॉय – एक आकलन: ३. पॅरिस आणि हेलन
-
पूर्वरंग « मागील भाग सोनेरी सफरचंदाचा निवाडा सर्वात सुंदर कोण हे ठरवण्यासाठी या हेरा, अथीना आणि अफ्रोडाईटी या तिघीही आयडाच्या झर्यात सुस्नात होऊन नग्न स्थितीत पॅरिस ऊर्फ अलेक्झांडरसमोर आल्या. पण त्यांचे सौंदर्य पाहून दिपून गेलेल्या पॅरिसला त्यांच्यापैकी एकीला निवडणे जमेना. तिघींनीही ते सफरचंद आपल्याला दिल्यास त्याला काही देऊ करण्याची– सौदा करण्याची तयारी दाखवली. अथीनाने त्याला शहाणपण, युद्धकौशल्य आणि योद्ध्याचे स्थान देऊ केले. हेराने त्याला राजकीय सत्ता आणि आशियाचे अधिपत्य देऊ केले. तिसर्या अफ्रोडाईटीने त्याला ‘जगातील सर्वात सुंदर स्त्रीचे प्रेम’ देऊ केले. पॅरिसने सफरचंद अफ्रोडाईटीच्या पदरात टाकले. यातून देवांना ज्याची भीती होती तेच घडले. इतर दोघी नाराज झाल्या नि त्यांची ती नाराजी अनेक वाटांनी ट्रॉयकडे चालू लागली. पॅरिसने प्रे… पुढे वाचा »
सोमवार, ८ जून, २०२६
हेलन ऑफ ट्रॉय – एक आकलन: २. पूर्वरंग
-
आलेखाचा तिढा « मागील भाग भारतीय साहित्यामध्ये जे स्थान रामायण नि महाभारतासारख्या महाकाव्यांना आहे तेच स्थान ग्रीकांच्या इतिहासामध्ये होमर कवीच्या इलियड आणि ओडिसीला आहे. ट्रॉयचे ग्रीक नाव ‘इलियन’ (Ilion), म्हणून त्याची कथा ती ‘इलियड’ (Iliad). याचा लेखनकाळ इ.स.पूर्व ७ वे शतक मानला जातो. यामध्ये ट्रॉयच्या युद्धाच्या अखेरच्या पर्वातील काही दिवसांचे तपशील येतात. ‘ओडिसी’ मध्ये इथाका (Ithaca) या तत्कालीन ग्रीक (Mycenaean Greece) राज्याचा राजा ओडिसिअस (१) (Odysseus) याच्या जवळजवळ वीस वर्षांच्या काळातील संघर्षाचे कथानक उलगडले आहे. यातील पहिली दहा वर्षे ही सुप्रसिद्ध ‘ट्रॉयच्या युद्धा’ने (Trojan War) व्यापलेली आहेत. या कथानकामध्ये ट्रॉयच्या युद्धातील अनेक तपशील आठवणींच्या (flashback) रूपात आलेले आहेत. … पुढे वाचा »
शुक्रवार, ५ जून, २०२६
हेलन ऑफ ट्रॉय – एक आकलन: १. आलेखाचा तिढा
-
हेलन ऑफ ट्रॉय अलिकडेच मी बीबीसीने ८ भागांत प्रसारित केलेली Troy: Fall of a City (2018) ही मालिका पाहिली. होमर या ग्रीक कवीच्या ‘इलियड’ आणि ‘ओडिसी’ या दोन महाकाव्यांतून साकार झालेली ही कथा अशी: स्पार्टाची राणी पॅरिस या ट्रॉयच्या राजपुत्राच्या प्रेमात पडते नि त्याच्याबरोबर पळून जाते. आता स्पार्टासारख्या प्रमुख ग्रीक राज्याची राणी एका य:कश्चित आशियाई राजपुत्राने पळवून नेणे म्हणजे ग्रीकांची ‘खानदान की इज़्जत खतरे में’च की. सारी ग्रीक राज्ये मिळून एजिअन समुद्र ओलांडून ट्रॉयवर हल्ला करतात. दहा वर्षे झुंज देऊनही अपयशी होतात. अखेर छद्माचा– फसवणुकीचा आधार घेतात. एक लाकडी घोडा ट्रॉयच्या सीमेवर सोडून ग्रीक जहाजे परतू लागतात. आपल्या विजयाचे प्रतीक म्हणून की अन्नाच्या तुटवड्यामध्ये आधार म्हणून धान्य भरलेला हा घोडा ट्रॉयचे लोक शहरात नेतात. रात्री… पुढे वाचा »
गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२५
परतुनि ये घरा... - १ : पेराल्टा, ऑर्फियस आणि नचिकेता
-
जेक पेराल्टा: काही काळापूर्वी Brooklyn Nine-Nine ही मालिका पाहात होतो. मालिकेची पार्श्वभूमी एका पोलिस ठाण्याची. पण मालिका पोलिसकथा असूनही थरारपटांच्या वर्गात न मोडणारी. कथानकांचे पेड तपासकथांपेक्षा व्यक्ति त्यांच्या नातेसंबंधांच्या विविध पैलूंभोवती विणलेले. मुख्य पात्र असलेला जेक पेराल्टा हा धडाडीचा तपास-अधिकारी ऊर्फ डिटेक्टिव्ह. एका केसच्या संदर्भात, आधीच तुरुंगात असलेल्या एका गुन्हेगाराकडून काही माहिती काढून घेण्यासाठी, तो गुन्हेगार असल्याची बतावणी करून त्याला तुरुंगात डांबले जाते. आपण ज्या गुन्हेगारांना त्यांच्या कर्माचे फळ भोगायला पाठवतो, त्यांचे ते जग त्याला आतून पाहण्याची संधी मिळते. न्यायव्यवस्थेचा(!) एक तुकडा म्हणता येईल, अशी ती ‘व्यवस्था’ वास्तवात किती अव्यवस्थित, भोंगळ, शोषक, दाहक आहे, याचा अनुभव तो घेतो. व्यवस्थेच्या ठेकेदा… पुढे वाचा »
Labels:
आकलन,
कथा,
जिज्ञासानंद,
मालिका,
मिथ्यकथा,
विश्लेषण,
साहित्य-कला
मंगळवार, २१ जून, २०२२
व्हाय गुड गर्ल्स लाईक बॅड गाइज?
-
’व्हाय गुड गर्ल्स लाईक बॅड गाइज?’ हा प्रश्न अनेकांकडून- विशेषत: हवी ती मुलगी भाव देत नसल्यामुळे व्यथित झाल्यामुळे स्वत:ला गुड बॉईज समणार्यांकडून, विचारला जात असतो. परवा फेसबुकवरच कुणाच्या तरी प्रतिसादात वाचला आणि काही काळापूर्वी पाहिलेल्या एका मालिकेची आठवण झाली. www.shutterstock.com येथून साभार. स्टार्स हॉलो नावाचे एक लहानसे शहर. अशा ठिकाणी असते तसे साधारण कम्युनिटी लाईफ, शहरीकरणातून आलेल्या व्यक्तिकेंद्रित आयुष्याचा प्रवाह तितकासा बलवान झालेला नाही. इथे लोरलाय नावाची एक स्त्री आपल्या मुलीसह राहते आहे. ही रोरी १६ वर्षांची अतिशय गोड मुलगी, आसपासच्या सर्वांची आवडती. अमुक बाबतीत, अमुक व्यक्तीबाबत इतके सहानुभूतीने वागण्याची वा सक्रीय मदतीची काय गरज होती?’ या प्रश्नावर ’यू नो, इट्स र… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)






