Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
व्यवस्था लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
व्यवस्था लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १९ जुलै, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ३ : समूहाची ओळख


  • समूहजीवी « मागील भाग समूहजीवी समाज, मूर्त ओळख केवळ सहजीवन आणि सहभोजन यांखेरीज आचार-विचारांत सामूहिकता आली ती सामायिक कर्मकांडातून. मानवी (किंबहुना सर्वच प्राणी, पक्षी व कीटकांच्या) आयुष्यातील जन्म नि मृत्यू या दोन घटना निश्चित आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम कर्मकांडे त्यांच्याभोवती उदयाला आली. जगभरातील सर्वच मानवटोळ्या नि समाज यांच्यामध्ये या दोन घटनांभोवती गुंफलेली कर्मकांडे आहेत. चित्रपटप्रेमींना डिस्नेच्या सुप्रसिद्ध ‘ द लायन किंग ’मधील सिंहराज सिम्बाच्या जन्माचा प्रसंग आठवत असेल. रफीकी हे माकड वनराज मुफासाच्या टोळीचा भगत वा पुरोहित आहे. मुफासा आणि सराबी यांच्या या पुत्राच्या– म्हणजे सिंबाच्या जन्मानंतर तो त्या ‘युवराजा’ला उचलतो नि गुहेतून बाहेर येतो. मुफासाचे जणू सिंहासनच असलेल्… पुढे वाचा »

सोमवार, १३ जुलै, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - २ : समूहजीवी


  • प्रस्तावना « मागील भाग सजीवांतील सहजीवन निसर्गामध्ये प्रगतीच्या वाटेवर सजीवांची वाटचाल संघर्ष नि सहकार या दोन साधनांच्या आधारे होत असते. या दोन्हींचा वापर करुन संरक्षण नि आक्रमकता या दोहोंसाठी आवश्यक विविध गुणकौशल्यांचा विकास होत असतो किंवा ज्यांच्याकडे ते अधिक विकसित असतात ते जगण्याच्या वाटेवर वेगाने पुढे जाऊ शकतात. संघर्षामध्ये सजातीय प्राण्यांशी होणारे संघर्ष आणि अन्य प्रजातींशी होणारे संघर्ष असे दोन प्रकार दिसतात. पैकी अन्न (आणि त्यासाठी हद्दीचा) संघर्ष हा सजातीय नि अन्य जातीय अशा दोनही प्रकारच्या जीवांशी होतो. पण त्याखेरीज नरांचा सजातीय प्राण्यांशी जुगण्याच्या हक्कासाठीही संघर्ष होत असतो. हा प्रत्यक्ष संघर्ष प्राणिकुलांत आणि कीटकांच्या काही प्रजातींमध्ये दिसतो. पक्ष्यांमध्ये स… पुढे वाचा »

सोमवार, ६ जुलै, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १ : प्रास्ताविक


  • भारतीय भाषांतील धंदेवाईक मनोरंजन माध्यमांना वावडे असणार्‍या ‘विज्ञान-काल्पनिका’ (science-fiction) अनुभवायच्या तर तुम्हाला इंग्रजीकडे वळावे लागते. त्यातही हॉलिवुडकरांच्या अंगणात गेलात, तर भूतकाळातील काही राजे-राज्यांच्या संघर्षाला भविष्यात नि अंतराळात नेऊन ठेवलेले तुम्हाला पाहावे लागते. किंवा वर्तमानातील कथा/चित्रपटांतील महानायकांचे (super-hero) अवतार तिकडे नेऊन त्याला कुण्या एलियन शत्रूशी दोन हात करायला लावलेले दिसतात. कुठलेसे ‘एम्पायर’ नि कुठलासा ‘रेझिस्टन्स’ यांच्या संघर्षाच्या कथा संगणकाच्या साहाय्याने चित्तथरारक चित्रचौकटींमधून सादर करुन ते तुमची मती गुंग करुन टाकतात. प्रत्येक वेळी आपण जणू नवेच काही कथानक पाहात आहोत अशा भ्रमात तुम्हाला ठेवून ही मंडळी आपले खिसे भरताना दिसतात. एखाद्या कथानकास विज्ञान-काल्पनिका म्हणवून घेण्यास त्यात वै… पुढे वाचा »

मंगळवार, १९ मार्च, २०२४

प्रोफाईल फोटो, आधार कार्ड आणि गणित


  • ( स्वसोयीचा ) इतिहास-भोगी, पाठांतरप्रधान अशा समाजामध्ये गणित हा विश्लेषणप्रधान विषय नावडता असणे ओघाने आलेच. गणिताची भाषा ही देश-कालाच्या सीमा उल्लंघून जाणारी असल्याने तिच्या व्याप्तीशी इमान राखायचे, तर तिचे व्याकरण स्थल-काल-समाज निरपेक्ष असावे लागते. जन्माला आल्याबरोबर अनायासे मिळालेल्या वंश, जात, धर्म, देश, समाज आदि गटांनी दिलेल्या खुंट्यांना वटवाघळासारखे उलटे लटकून जगणार्‍यांना ते परके वाटते हे ओघाने आलेच. याशिवाय त्याच्या या सर्वसमावेशकतेमुळे त्याच्याबाबत वा त्याच्या साहाय्याने - भाषा, इतिहास, भूगोलाआधारे पेटवले जातात तसे- अस्मितेचे टेंभे वा पलिते पेटवणे शक्य नसते. त्यामुळे सदैव न्यूनगंडांच्या, भावनिक हिंदोळ्यांवर झुलणारा भारतीय समाज त्याच्याकडे पाहून नाके मुरडताना दिसतो. आणि कदाचित त्यामुळेच आजच्या वैज्ञानिक पाया असलेल्या विकासाच्या … पुढे वाचा »

रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

हिजाब, मेंदी आणि व्यवस्थांची वेटोळी


  • सुमारे पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका कॉन्व्हेंट संचालित शाळेत मुलींनी मेंदी लावली म्हणून त्यांना शाळेतून घरी पाठवण्यात आले होते. (त्याहीपूर्वी अशा घटना घडत होत्याच. स्मरणात असलेली ही शेवटची. ) शाळेच्या नियमांत कोणतीही सौंदर्यप्रसाधने (लिपस्टिक, नेलपॉलिश वगैरेंसह) लावण्यास मनाई असल्याने हा शिस्तभंग आहे असे शाळेचे म्हणणे होते. शाळा कॉन्व्हेन्ट संचालित असल्याने लगेचच त्याला धार्मिक वळण मिळाले. मेंदी लावणे ही आमची हिंदू रीत आहे असे म्हणत काही संघटनांनी वादात उडी घेतली. थोडा वाद होताच शाळॆने मुलींवरची निलंबनाची कारवाई रद्द केली... गंमत अशी की तेव्हा आमच्या धार्मिक रीतींना शाळेच्या नियमाहून वरचढ मानावे म्हणणारे आज नेमकी उलट भूमिका घेत आहेत. कारण आता मुद्दा आमच्या नव्हे ’त्यांच्या… पुढे वाचा »

रविवार, ७ जून, २०२०

रंगार्‍याचा ब्रश


  • रंग लावण्याचा ब्रश हा परावलंबी असतो. भिंती(!)वर रंग लावण्याचे काम त्याचे असते खरे, पण रंग कोणता लावायचा ते डब्यात कोणता रंग आहे यावरुन ठरते. ’जा मी हा केशरी रंग लावणार नाही. लाल किंवा हिरवा आणलास तरच लावेन’ असे ब्रश कधी रंगार्‍याला सांगू शकत नाही. रंगार्‍याने निवडलेला रंग भिंतभर पसरवण्याचे काम तो इमानेइतबारे करत असतो. रंगार्‍याने आज लाल रंगाशी सलगी केली की ब्रश त्याचे फटकारे भिंतीवर मारतो. तो ओतून देऊन रंगार्‍याने ’केसरिया बालम’ निवडला की ब्रश त्या रंगाने भिंत रंगवून काढतो. थोडक्यात रंगार्‍याचा रंग बदलला की ब्रशचा रंग बदलतो, आणि त्याच्या "भिंती"चाही! ब्रशचा मालक असलेल्या रंगार्‍याच्या निष्ठा मात्र ब्रशइतक्या घनतेच्या नसतात, त्या तरल असतात. रोख पैसे मोजणार्‍या कुणाही घरमालकाच्या भिं… पुढे वाचा »