-
वृद्धत्वाची जेथ प्रचिती... « मागील भाग --- मागील भागाच्या अखेरीस नेहरुंचा उल्लेख आला आहे, तोच धागा पकडून पुढे जाऊ. जिज्ञासा https://www.istockphoto.com/ येथून साभार. फेसबुकवर एके ठिकाणी कुरुंदकरांनी नेहरुंबाबत लिहिलेला एक उतारा पोस्ट केलेला होता. त्याखाली एका तरुणाने “लेखकाला टॅग करता येईल का? त्याच्या प्रोफाईलवर जाता येईल.” अशी कमेंट केलेली होती. समाजमाध्यमांवर बस्तान बसवून असलेल्या ट्रोलिंग मानसिकतेच्या कुणी एकाने त्याचा स्क्रीनशॉट पोस्ट म्हणून टाकला असता, त्यावर सुमारे शंभरेक जणांनी 'हा: हा:’ अशी प्रतिक्रिया दिलेली पाहिली. ( ‘नेहरु’ असा शब्द वाचूनच हा: हा: करणारे काही त्यात असतील. त्यांना वगळून ) इतक्या सार्यांना कुरुंदकर ठाऊक आहेत ही आनंदाचीच बाब आहे. कुरुंदकरांचे, त्य… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
तत्त्वविचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
तत्त्वविचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?
Labels:
आकलन,
इतिहास,
जिज्ञासानंद,
तत्त्वविचार,
भाष्य,
समाज
बुधवार, १८ जून, २०२५
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १ : वृद्धत्वाची जेथ प्रचिती...
-
१. वार्धक्याची वाट प्रत्येक माणसाच्या प्रगतीचा आलेख हा दोन टोके धरून थोडे ताणलेल्या इंग्रजी ‘एस’ अक्षरासारखा असतो. लहानपणी परावलंबी काळात ती मंद असते, पौगंडावस्थेपासून ती वेगाने होते आणि एका टप्प्यानंतर, मध्यमवयानंतर तिचा वेग कमी होतो नि माणूस चढण सोडून सपाट रस्त्यावरुन आडव्या दिशेने पुढे सरकत जातो. वृद्धपणी भौतिक नि मानसिक पातळीवर एक स्थैर्यावस्था आलेली असते. पण तरीही भवतालामध्ये, जगण्याच्या बहुतेक पैलूंमध्ये बदल होतच असतात. ते स्वीकारण्यासाठी लागणारी स्वतंत्र बुद्धी आता वृद्धांकडे राहिलेली नसते. त्यांच्याकडची शारीरिक, बौद्धिक पुंजी ही त्यांच्या उदयकाळातील बदलांशी झगडण्यात खर्च झालेली असते. त्यामुळे आता होणारे बदल स्वीकारण्यासाठी गुंतवणूक करावी अशी ऊर्जा त्यांच्याकडे शिल्लक नसते. प्रगतीच… पुढे वाचा »
Labels:
आकलन,
इतिहास,
जिज्ञासानंद,
तत्त्वविचार,
भाष्य,
समाज
गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२
सत्य-असत्याची कोण देई ग्वाही (उत्तरार्ध) : स्वरूप, दर्शन व आकलन
-
प्रचलित निकष « मागील भाग --- अमुक एक विधान, एखादी गोष्ट सत्य की असत्य याचा निवाडा करण्यासाठी ’ते पूर्णतः अनावृत, निर्लेप, अविकृत स्वरूपात आपल्यासमोर आले आहे याची आपल्याला खात्री देता येते का? ’ या प्रश्नाचे उत्तर बहुधा नकारार्थीच द्यावे लागते ते आपल्या समोर येते ते एखाद्या माध्यमातून; मग ते एखाद्या व्यक्तीचे भाष्य अथवा निवेदन असेल, छायाचित्र असेल, घटनेचे केलेले व्हिडीयो शूटिंग असेल, त्याबाबत वृत्तपत्रात किंवा चॅनेल्सवर आलेली बातमी असेल, एखाद्या अभ्यासपूर्ण पुस्तकातून आलेले वर्णन असेल की आणखी काही. त्या त्या माध्यमाच्या मर्यादा, त्यात सहेतुक वा अहेतुक झालेले बदल यामुळे त्याच्या मूळ स्वरूपाहून वेगळे असे एक अवगुंठित, विलेपित असे नवे ’तथ्य’ आपल्यासमोर येत असते. अशा अवगुंठित, विलेपित रूपालाच आपण सत्य मानून अन्वेषणाच्या कसोटीवर पारखत बसू तर… पुढे वाचा »
Labels:
‘मुक्त-संवाद’,
जिज्ञासानंद,
तत्त्वविचार,
समाज
सत्य-असत्याची कोण देई ग्वाही (पूर्वार्ध) : प्रचलित निकष
-
प्रास्ताविक: एका वास्तवात अनेक सत्ये दडलेली असतात. प्रत्येकाच्या नजरेला दिसणारे, आकलनात येणारे सत्य निराळे. जीएंच्या कथा असोत वा कुरोसावाचा राशोमान हा सिनेमा, सत्याचे पापुद्रे संपता संपत नाहीत. म्हणूनच ओशोंसारखा एखादा योगी सत्याच्या पडताळणीचा जोरकस आग्रह लावून धरतो, तर जे. कृष्णमूर्ती ‘Truth is a pathless land’ असे म्हणून आपल्याला हतबुद्ध करतात. अशात सत्य नेमके कशाला म्हणायचे, कसे ते जाणायचे हा सनातन पेच काळागणिक अधिक गुंतागुंतीचा होत जातो. त्यावरचे हे विवेचन... --- "हा घे भंडारा नि जा आपल्या वाटेने" असं म्हणत भुत्याने एका मळक्या तेलकट पिशवीतून काळसर रंगाची पूड काढली आणि रामण्णापुढे धरली. त्याच्या लबाडीचा रामण्णाला राग आला. "माझे डोळे काही अजून परट्यांची भोकं झालेली नाहीत! भंडारा कधी काळा, राखेसारखा असतो होय? तो असतो हळ… पुढे वाचा »
रविवार, १४ ऑगस्ट, २०२२
तीन भूमिका (उत्तरार्ध) : वस्तुनिष्ठता - तीन उदाहरणे
-
बाजूबद्धता, तटस्थता आणि वस्तुनिष्ठता « मागील भाग --- एखादा प्रश्न किती लोकांच्या मनात निर्माण झाला याला तसे फारसे महत्त्व नाही. उलट एकाच वेळी अनेकांच्या मनात जर एखादा प्रश्न निर्माण झाला, तर तो तितकासा महत्त्वाचा नसण्याची शक्यता अधिक. कारण मोलाचा प्रश्न एखाद्याच्याच मनात निर्माण होऊ शकतो. आता तू म्हणतोस त्याप्रमाणे हा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण होऊनही त्यांनी त्याचा उच्चार केला नाही, याचा अर्थ असा की त्या प्रश्नाचं उत्तर जन्माला घालण्याचं स्वातंत्र्यही त्यांनी स्वतःजवळ सुरक्षित ठेवलं आहे. (गौतमीपुत्र कांबळे यांच्या 'परिव्राजक' या कथेमधून) तटस्थता म्हणजे काय हे बहुसंख्येला समजते. बाजूबद्धता वा गट-बांधिलकी तर इतकी महामूर आहे की त्याबाबत अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही. परंतु 'वस्तुनिष्ठता म्हणजे काय?' याबाबत अन… पुढे वाचा »
Labels:
आकलन,
जिज्ञासानंद,
तत्त्वविचार,
तत्रैव,
भाष्य,
भूमिका,
संस्कृती,
समाज
शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२
तीन भूमिका (पूर्वार्ध) : बाजूबद्धता, तटस्थता आणि वस्तुनिष्ठता
-
( वस्तुनिष्ठता हा खरंतर objective इंग्रजी शब्दाचा अपुरा अनुवाद आहे. पण आता प्रचलित झाला आहे, मराठी नि हिंदीतही. त्यामुळे इथे मी तोच वापरला आहे. ) आदिम काळात माणूस टोळ्यांच्या वा कळपांच्या स्वरूपात राहात होता. त्या काळातील मानसिकतेचा पगडा माणसाच्या मनावर अजून शिल्लक राहिलेला आहे. त्या काळी ’टोळी नसलेला माणूस’ ही संकल्पनाच माणसाला मानवत नव्हती . तसेच आजही बाजू नसलेली, तटस्थ वा वस्तुनिष्ठ विचाराची, स्वतंत्र भूमिकेची व्यक्ती अस्तित्वात असते यावर बहुसंख्येचा विश्वास नसतो. ’ती कोण आहे?’ यापेक्षा ’ती कोणत्या गटाची आहे?’ या प्रश्नाच्या उत्तराचा मागोवा घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ’त्या व्यक्तीची वैय्यक्तिक ओळख काय?’ हा प्रश्नच त्यांच्यासमोर नसतो. ती कोणत्या गावाची, घराण्याची, जातीची, धर्माची आहे या प्रश्नांच्या उत्तरांतूनच समोरच्या व्यक्त… पुढे वाचा »
Labels:
आकलन,
जिज्ञासानंद,
तत्त्वविचार,
तत्रैव,
भाष्य,
भूमिका,
संस्कृती,
समाज
मंगळवार, १७ मे, २०२२
उंदीर-श्रद्धा आणि इलेक्ट्रॉन-श्रद्धा
-
आपल्या घरातील एक बटण दाबले की दिवा प्रकाशित होतो किंवा पंखा सुरु होतो असा आपला अनुभव असतो. वारंवार अनुभवल्यानंतर कार्य-कारणभाव स्पष्ट होतो. आता त्यामागचे विज्ञान सांगितले तर इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रिसिटी, वगैरे बाबी येतील. पण श्रद्धावान मंडळी म्हणतील, ‘तुम्ही म्हणता देव दिसत नाही तसेच हा तुमचा इलेक्ट्रॉन, ती वीज तरी कुठे दिसते? न पाहता त्यांचे अस्तित्व कसे मान्य करतोस?’ हा मुद्दा बरोबर आहे. पण मी इलेक्ट्रॉनचे अस्तित्व मान्य करणे वा न करणे याचा माझ्या जगण्याशी थेट संबंध नसतो. पृथ्वी सपाट आहे असे म्हणणारे लोक भूगोलाच्या एका तुकड्यावर जगतच असतात. कारण ती सपाट आहे की दीर्घगोल याचा त्यांच्या जगण्याशी थेट संबंध येत नाही. त्याच धर्तीवर माझा इलेक्ट्रॉनशी कधी समोरासमोर सामना न होताही माझे जगणे त्या आधारे सिद्ध केलेल्या अनुभवावर बेतलेले असते. त्या सार… पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
जिज्ञासानंद,
तत्त्वविचार,
तत्रैव,
विज्ञान,
श्रद्धा
सोमवार, २ मे, २०२२
प्रकाश नावाची प्रत्येक व्यक्ती वैज्ञानिक असते
-
मी महाविद्यालयात शिकत असताना एका मित्राने एक गंमतशीर सिद्धांत मांडून त्याची सिद्धताही दिली होती. ही गंमत महाविद्यालयीन प्रवृत्तीला अनुसरुनच होती. परंतु काळ जातो तसे आपली दृष्टी नि विचार व्यापक होत जातात आणि ’साध्याही विषयात आशय मोठा किती आढळे’ असा अनुभव येतो. या सिद्धांताबाबतही मला असाच काहीसा अनुभव आला. --- त्याचा सिद्धांत असा होता: प्रकाश नावाची प्रत्येक व्यक्ती वैज्ञानिक असते. www.thealternativedaily.com येथून साभार. त्याची सिद्धता त्याने अशी दिली होती: प्रकाश म्हणजे पक्या, पक्या म्हणजे क्याप, क्याप म्हणजे टोपी, टोपी म्हणजे पीटो, पीटो म्हणजे मारा, मारा म्हणजे रामा, रामा म्हणजे देव, देव म्हणजे वदे, वदे म्हणजे बोले, बोले म्हणजे लेबो... आणि लेबो हा एक वैज्ञानिक होता म्ह… पुढे वाचा »
Labels:
गणित,
जिज्ञासानंद,
तत्त्वविचार,
तत्रैव,
विज्ञान,
समाज
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)