Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
जिज्ञासानंद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जिज्ञासानंद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १५ जून, २०२६

हेलन ऑफ ट्रॉय – एक आकलन: ४. ट्रॉयचे युद्ध


  • पॅरिस आणि हेलन « मागील भाग अलेक्झांडर नावाचा एक तरुण मेंढपाळ माउंट आयडा येथे राहात होता. काही कामानिमित्ताने तो ट्रॉय शहरात आलेला असताना तिथे वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन केलेले त्याला दिसले. सहज म्हणून त्याने त्यात भाग घेतला नि राजपुत्र हेक्टर याला पराभूत करुन विजेताही ठरला. त्याचे कौशल्य पाहून राजा प्रायम नि राणी हेकुबा चांगलेच प्रभावित झाले. या विजेत्याला दत्तक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मेंढपाळपुत्र अलेक्झांडर पॅरिस या नावाने राजाचा पुत्र म्हणून राजकुलामध्ये समाविष्ट झाला. पॅरिसचे धार्ष्ट्य मागील भागामध्ये पॅरिस याच्या ‘हेसिओनी’ (Hesione) या आत्येच्या अपहरणाचा उल्लेख केला आहे. टेलमॉनशी लग्नाला रुकार देताना तिने आपल्या एका भावाचा जीव वाचवला होता. हाच भाऊ प्रायम नावाने पुढे ट्रॉयचा राजा झाला. हेक्टर नि पॅरिस ही याचीच मुले… पुढे वाचा »

शुक्रवार, १२ जून, २०२६

हेलन ऑफ ट्रॉय – एक आकलन: ३. पॅरिस आणि हेलन


  • पूर्वरंग « मागील भाग सोनेरी सफरचंदाचा निवाडा सर्वात सुंदर कोण हे ठरवण्यासाठी या हेरा, अथीना आणि अफ्रोडाईटी या तिघीही आयडाच्या झर्‍यात सुस्नात होऊन नग्न स्थितीत पॅरिस ऊर्फ अलेक्झांडरसमोर आल्या. पण त्यांचे सौंदर्य पाहून दिपून गेलेल्या पॅरिसला त्यांच्यापैकी एकीला निवडणे जमेना. तिघींनीही ते सफरचंद आपल्याला दिल्यास त्याला काही देऊ करण्याची– सौदा करण्याची तयारी दाखवली. अथीनाने त्याला शहाणपण, युद्धकौशल्य आणि योद्ध्याचे स्थान देऊ केले. हेराने त्याला राजकीय सत्ता आणि आशियाचे अधिपत्य देऊ केले. तिसर्‍या अफ्रोडाईटीने त्याला ‘जगातील सर्वात सुंदर स्त्रीचे प्रेम’ देऊ केले. पॅरिसने सफरचंद अफ्रोडाईटीच्या पदरात टाकले. यातून देवांना ज्याची भीती होती तेच घडले. इतर दोघी नाराज झाल्या नि त्यांची ती नाराजी अनेक वाटांनी ट्रॉयकडे चालू लागली. पॅरिसने प्रे… पुढे वाचा »

सोमवार, ८ जून, २०२६

हेलन ऑफ ट्रॉय – एक आकलन: २. पूर्वरंग


  • आलेखाचा तिढा « मागील भाग भारतीय साहित्यामध्ये जे स्थान रामायण नि महाभारतासारख्या महाकाव्यांना आहे तेच स्थान ग्रीकांच्या इतिहासामध्ये होमर कवीच्या इलियड आणि ओडिसीला आहे. ट्रॉयचे ग्रीक नाव ‘इलियन’ (Ilion), म्हणून त्याची कथा ती ‘इलियड’ (Iliad). याचा लेखनकाळ इ.स.पूर्व ७ वे शतक मानला जातो. यामध्ये ट्रॉयच्या युद्धाच्या अखेरच्या पर्वातील काही दिवसांचे तपशील येतात. ‘ओडिसी’ मध्ये इथाका (Ithaca) या तत्कालीन ग्रीक (Mycenaean Greece) राज्याचा राजा ओडिसिअस (१) (Odysseus) याच्या जवळजवळ वीस वर्षांच्या काळातील संघर्षाचे कथानक उलगडले आहे. यातील पहिली दहा वर्षे ही सुप्रसिद्ध ‘ट्रॉयच्या युद्धा’ने (Trojan War) व्यापलेली आहेत. या कथानकामध्ये ट्रॉयच्या युद्धातील अनेक तपशील आठवणींच्या (flashback) रूपात आलेले आहेत. … पुढे वाचा »

शुक्रवार, ५ जून, २०२६

हेलन ऑफ ट्रॉय – एक आकलन: १. आलेखाचा तिढा


  • हेलन ऑफ ट्रॉय अलिकडेच मी बीबीसीने ८ भागांत प्रसारित केलेली Troy: Fall of a City (2018) ही मालिका पाहिली. होमर या ग्रीक कवीच्या ‘इलियड’ आणि ‘ओडिसी’ या दोन महाकाव्यांतून साकार झालेली ही कथा अशी: स्पार्टाची राणी पॅरिस या ट्रॉयच्या राजपुत्राच्या प्रेमात पडते नि त्याच्याबरोबर पळून जाते. आता स्पार्टासारख्या प्रमुख ग्रीक राज्याची राणी एका य:कश्चित आशियाई राजपुत्राने पळवून नेणे म्हणजे ग्रीकांची ‘खानदान की इज़्जत खतरे में’च की. सारी ग्रीक राज्ये मिळून एजिअन समुद्र ओलांडून ट्रॉयवर हल्ला करतात. दहा वर्षे झुंज देऊनही अपयशी होतात. अखेर छद्माचा– फसवणुकीचा आधार घेतात. एक लाकडी घोडा ट्रॉयच्या सीमेवर सोडून ग्रीक जहाजे परतू लागतात. आपल्या विजयाचे प्रतीक म्हणून की अन्नाच्या तुटवड्यामध्ये आधार म्हणून धान्य भरलेला हा घोडा ट्रॉयचे लोक शहरात नेतात. रात्री… पुढे वाचा »

बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?


  • वृद्धत्वाची जेथ प्रचिती... « मागील भाग --- मागील भागाच्या अखेरीस नेहरुंचा उल्लेख आला आहे, तोच धागा पकडून पुढे जाऊ. जिज्ञासा https://www.istockphoto.com/ येथून साभार. फेसबुकवर एके ठिकाणी कुरुंदकरांनी नेहरुंबाबत लिहिलेला एक उतारा पोस्ट केलेला होता. त्याखाली एका तरुणाने “लेखकाला टॅग करता येईल का? त्याच्या प्रोफाईलवर जाता येईल.” अशी कमेंट केलेली होती. समाजमाध्यमांवर बस्तान बसवून असलेल्या ट्रोलिंग मानसिकतेच्या कुणी एकाने त्याचा स्क्रीनशॉट पोस्ट म्हणून टाकला असता, त्यावर सुमारे शंभरेक जणांनी 'हा: हा:’ अशी प्रतिक्रिया दिलेली पाहिली. ( ‘नेहरु’ असा शब्द वाचूनच हा: हा: करणारे काही त्यात असतील. त्यांना वगळून ) इतक्या सार्‍यांना कुरुंदकर ठाऊक आहेत ही आनंदाचीच बाब आहे. कुरुंदकरांचे, त्य… पुढे वाचा »

बुधवार, १८ जून, २०२५

वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १ : वृद्धत्वाची जेथ प्रचिती...


  • १. वार्धक्याची वाट प्रत्येक माणसाच्या प्रगतीचा आलेख हा दोन टोके धरून थोडे ताणलेल्या इंग्रजी ‘एस’ अक्षरासारखा असतो. लहानपणी परावलंबी काळात ती मंद असते, पौगंडावस्थेपासून ती वेगाने होते आणि एका टप्प्यानंतर, मध्यमवयानंतर तिचा वेग कमी होतो नि माणूस चढण सोडून सपाट रस्त्यावरुन आडव्या दिशेने पुढे सरकत जातो. वृद्धपणी भौतिक नि मानसिक पातळीवर एक स्थैर्यावस्था आलेली असते. पण तरीही भवतालामध्ये, जगण्याच्या बहुतेक पैलूंमध्ये बदल होतच असतात. ते स्वीकारण्यासाठी लागणारी स्वतंत्र बुद्धी आता वृद्धांकडे राहिलेली नसते. त्यांच्याकडची शारीरिक, बौद्धिक पुंजी ही त्यांच्या उदयकाळातील बदलांशी झगडण्यात खर्च झालेली असते. त्यामुळे आता होणारे बदल स्वीकारण्यासाठी गुंतवणूक करावी अशी ऊर्जा त्यांच्याकडे शिल्लक नसते. प्रगतीच… पुढे वाचा »

शुक्रवार, २३ मे, २०२५

सुजन गवसला जो


  • ‘गाणार्‍याला आधी गाणारं एक मन असावं लागतं, तरच गाणं संभवतं’ असं पुलंनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे एखादा काका/आजोबा किंवा मावशी/ताई (मी आजी म्हटलेले नाही, प्लीज नोट) मध्ये आपल्याप्रमाणे मूलपण दिसत असेल, तर बहुधा मुलांना परकाही आपला वाटत असावा. परक्याकडे मूल सहजपणे जाणं हे त्या परक्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलचे एक महत्त्वाचे स्टेटमेंट आहे असे मला वाटते. त्याबाबत मी सुदैवी आहे. बच्चे कंपनीचे नि माझे छान जमत असे. एखाद्या पिल्लाला ‘चल ये’ म्हटले नि ते माझ्याकडे आले नाही असे क्वचितच घडत असे. बहुधा माझ्यातही त्यांना त्यांचे प्रतिबिंब दिसत असावे. ‘असे’ आता म्हणावे लागते, कारण आता मी बराचसा एकांतवादी झाल्याने मोठ्यांचाच फारसा संपर्क येत नाही, नि त्यामुळे मुलांचाही. मध्यंतरी काही काळ मी मॉर्निंग वॉकला ब… पुढे वाचा »