Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १८ मे, २०२५

बाबेलचा दुसरा मनोरा


  • फार फार... फार्फारच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा वर्षाला वर्षही म्हणत नसावेत. तेव्हाची भाषाच वेगळी होती. पृथ्वीवर मोजकीच मनुष्यजात वावरत होती. सारे गुण्यागोविंदाने राहात होते, एकच भाषा बोलत होते. ही जमात अर्थातच भूस्थिर, नागर नव्हती. अन्नापाठी फिरत फिरत ते आजच्या इराकमधील भूभागात पोहोचले. खाणं, जुगणं नि क्वचित यांच्यासाठी लढणं या पलिकडचा विचार करणार्‍या त्यांच्यातील काही सुज्ञांनी नुकताच विटेची यशस्वी चाचणी घेतली होती. तिचा वापर करुन आपण पक्क्या गुहा बांधू शकतो असा त्यांचा दावा होता. The Tower of Babel. पण त्यांचा नेता महत्त्वाकांक्षी होता. त्याला केवळ घर बांधायची नव्हती, त्याला महासत्तेची द्वाही फिरवायची होती. त्याने केवळ जमिनीवरची नव्हे तर एकावर एक अशी चळत स्वरूपात घरे बांधून एक मन… पुढे वाचा »

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५

परतुनि ये घरा... - ३ (अंतिम) : ययाती, बुधा आणि... माणूस


  • कांदिद, कालिदास, आणि आरती देवी « मागील भाग --- मागील भागात ज्यांचा उल्लेख केला तो कालिदास असो वा आरती देवी, त्यांच्या सामाजिक आयुष्यातील साध्ये सिद्ध करण्यासाठी आपल्या जिवाभावाच्या जोडीदारांना विरह-वेदनेला सामोरे जाण्यास भाग पाडले आहे. हवे ते साध्य करण्यासाठी मूळ स्थानापासून दूर जाताना, जिवाभावाच्या व्यक्तीपासूनही दूर जाणे अपरिहार्य नव्हते. कालिदासाला मल्लिकेशी विवाह करून तिलाही सोबत नेणे शक्य होते. विलोमने– त्यांच्या सामायिक मित्राने– त्याला त्यावर पुन्हा पुन्हा डिवचलेही आहे. परंतु जोडीदाराला अर्ध्या वाटेत सोडणे हा सर्वस्वी स्वार्थी निर्णय म्हणता येणार नाही, कारण त्या निर्णयप्रक्रियेत त्या दोघांचीही बाजू येतेच. त्यामुळे कुठल्याही कौटुंबिक निर्णयात तो त्यांना अनुकूल घेतला जाण्याची एक शक्यता असतेच. परंतु परतुनि जाण्याच्या असोशीने, इत… पुढे वाचा »

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२५

परतुनि ये घरा... - २ : कांदिद, कालिदास, आणि आरती देवी


  • पेराल्टा, ऑर्फियस आणि नचिकेता « मागील भाग --- तुरुंगवारी अथवा मृत्युदर्शन हे टोकाचे नि वेदनादायक वळण आहे. आयुष्यात अपरिहार्यपणे अथवा अनाहुतपणे येणार्‍या इतर काही प्रमाथी नि आवेगी वळणांनाही, माणसे आपल्या इच्छाशक्ती, कुवत, कौशल्य नि चिकाटीने वळशामध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करतात. जगण्याची गाडी पुन्हा मूळ स्थानी नेऊन प्रवास सुरू करण्याचा अट्टाहास, आटापिटा करताना दिसतात. त्यांचा तो आटापिटा अनेकदा 'You can never go back home' या उक्तीचा अनुभव देऊन जात असतो. कांदिद: प्रसिद्ध विचारवंत वोल्तेअरच्या ‘ कांदिद ’ची कथा काहीशी मागील भागात सांगितलेल्या ऑर्फियस-युरिडिसीच्या वळणाची. पण त्याचे संघर्ष कैकपट व्यापक. त्याचे त्याच्या देखण्या आतेबहिणीवर– Cunégonde– प्रेम आहे. परंतु तिचे वडील बॅरन (१) म्हणजे उमराव घराण्यातील आहेत. आपल्… पुढे वाचा »

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२५

परतुनि ये घरा... - १ : पेराल्टा, ऑर्फियस आणि नचिकेता


  • जेक पेराल्टा: काही काळापूर्वी Brooklyn Nine-Nine ही मालिका पाहात होतो. मालिकेची पार्श्वभूमी एका पोलिस ठाण्याची. पण मालिका पोलिसकथा असूनही थरारपटांच्या वर्गात न मोडणारी. कथानकांचे पेड तपासकथांपेक्षा व्यक्ति त्यांच्या नातेसंबंधांच्या विविध पैलूंभोवती विणलेले. मुख्य पात्र असलेला जेक पेराल्टा हा धडाडीचा तपास-अधिकारी ऊर्फ डिटेक्टिव्ह. एका केसच्या संदर्भात, आधीच तुरुंगात असलेल्या एका गुन्हेगाराकडून काही माहिती काढून घेण्यासाठी, तो गुन्हेगार असल्याची बतावणी करून त्याला तुरुंगात डांबले जाते. आपण ज्या गुन्हेगारांना त्यांच्या कर्माचे फळ भोगायला पाठवतो, त्यांचे ते जग त्याला आतून पाहण्याची संधी मिळते. न्यायव्यवस्थेचा(!) एक तुकडा म्हणता येईल, अशी ती ‘व्यवस्था’ वास्तवात किती अव्यवस्थित, भोंगळ, शोषक, दाहक आहे, याचा अनुभव तो घेतो. व्यवस्थेच्या ठेकेदा… पुढे वाचा »

शनिवार, ७ डिसेंबर, २०२४

दोन बोक्यांनी...


  • AI-Generated Image for this article (Courtesy: deepai.org) फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे... एक लहानसं गाव होतं. गावाचं नाव होतं... पण ते नावाचं जाऊ द्या. ते महत्त्वाचं नाही, कुठल्याही गावासारखं ते एक गाव होतं. गावात शेत कसणारे कुणबी होते, नांगर ओतणारे लोहार होते, चपला बांधणारे चांभार होते, मडकी घडवणारे कुंभार होते, घाणा चालवणारे तेली होते... या सार्‍यांवर राज्य करणारे पाटील होते, त्यांच्या मदतीला कुलकर्णी होते. शाळा चुकवणारी पोरे होती, पारावरची पाले होती; नदीवरची धुणी होती, चोरट्या प्रेमाची कहाणी होती. कुठे कुणाचे दाजी होते, कुठे कुणाचे ‘माजी’ होते; काही काही पाजी होते, बाकी उडदामाजि होते... गावाच्या गरजा मर्यादित होत्या. अन्नाची गरज शेती व गावालगतचे जंगल यांतून भागत असे. इतर किरक… पुढे वाचा »

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९

ड्रायविंग सीट


  • निवडणुका संपल्या होत्या... सरकार-स्थापनेची दंगल सुरु होण्यापूर्वी, निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपाने निर्माण झालेली कटुता पुसून काढावी, भाषणे करुन आणि प्रचारातील दगदगीतून थोडा विसावा मिळावा, म्हणून काही सर्वपक्षीय नेते एका एअर-कंडिशन्ड मिनी-बसने के.डी. शिवकुमार यांच्या रिसॉर्टकडे निघाले होते. मुंबईहून पुणे, सातारा, कोल्हापूर, मग वळून कोकण असे करत एक एक नेत्याला घेत हा ’गरीब-रथ’ पुढे चालला होता. तेवढ्यात या ’श्रमपरिहार-यात्रे’त सहभागी होऊ न शकलेल्या विदर्भ नि मराठवाड्यातल्या एक-दोन नेत्यांचे, ’तुम्ही पुण्या-मुंबईवाल्यांचे नेहमी असेच असते. आम्हाला मुंबईला यायला लावता. आम्हाला डावलता.’ अशा तक्रारी करणारे फोन आले होते. उजवीकडील सर्वात पुढच्या बाकावर भाजपच्या नेत्याशेजारी सेनेचा नेता बसला हो… पुढे वाचा »

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

नॉर्मा आणि कम्मो


  • ’हे जीवघेणं गाणं आहे!... हो ना?" "हो!" "हे ऐकलं की एका मिनिटानं आयुष्य कमी होतं आणि अर्ध्या मिनिटानं वाढतं!" जगण्यात काही क्षण असे सापडतात की तिथे अचानक स्तिमित होऊन माणूस स्तब्ध होतो. ’कल और आएंगे नग्मोंकी खिलती कलियाँ चुननेवाले । मुझसे बेहतर कहनेवाले, तुमसे बेहतर सुननेवाले ॥’ म्हणत साहिरने माझ्यातल्या बुतशिकनला बुत बनवून ठेवला होता. वरची दोनच वाक्ये समोर ठेवून सासणेंनी मला पुतळाच बनवून ठेवले. काही वर्षांपूर्वी ’सनसेट बुलेवार्ड’ नावाचा एक चित्रपट पाहिला होता. सायलेंट मूवीजच्या जमान्यातील कुणी प्रसिद्ध नटी, नॉर्मा. बोलपटाच्या आगमनानंतर झालेल्या तंत्रबदलातून जी वावटळ निर्माण झाली, त्यातून चंदेरी दुनियेतून पाचोळ्यासारखी बाहेर फेकल्या गेलेल्यांपैकी एक. अत्यंत आत्मकेंद्रित, आपल्याच विश्वात जगणारी नॉर्मा, वास्… पुढे वाचा »

मंगळवार, २८ मे, २०१९

एका किंग-स्लेअरची गोष्ट (एक राजकीय रूपककथा)


  • एक आटपाट नगर होतं. तिथं एक पाटलाची गढी होती. पाटील अगदी पाटलासारखा होता. कधी रयतेची काळजी घेई, कधी त्यांचं शोषण करी. पाटलाचे सगे-सोयरे, सोयरे-धायरे, जातवाले-गाववाले पाटलाच्या अधिक मर्जीतले होते, हे तर ओघानं आलंच. गावात एक तेजतर्रार फायरब्रँड तरुण तालमीत नित्य नेमानं मेहनत करत असे. त्याला पाटलाचं हे वर्चस्व मान्य नव्हतं. पाटीलकी ही शोषक व्यवस्था आहे, असं त्याचं म्हणणं होतं. त्यानं गावातच अ‍ॅंटी-पाटीलिझमची मुहूर्तमेढ रोवली. ग्रामपंचायतीची निवडणूक असो, पंचायत राजमधून मिळणारे लहान-सहान ठेके असोत की, कुठल्या-कुठल्या सरकारी योजनांमार्फत येणारी मदत असो. प्रत्येक पातळीवर तो पाटलाला नडू लागला. कालचं पोरगं आहे म्हणून पाटीलही दुर्लक्ष करत असे. गावातील लोकांना पाटलाचं वर्चस्व डाचत असलं तरी एक अपरिहार्यता म्हणून किंवा शेवटी अडीनडीला तोच कामात येतो म… पुढे वाचा »