-
‘स्वप्नं सत्यात उतरतात; पण ती उतरवावीही लागतात.’ राहीनं हे कुठं तरी वाचलं. कुठल्याशा प्रसिद्ध पुस्तकातलं वाक्य. ती विचारात पडली. त्यातून बुद्धिमत्ता असली की माणसाला प्रश्न पडतात; नसली की मग बरं असतं. ताप नाही- नि:स्वप्न निद्रा येते. इथं तसं नाही. आपण विचार करतो. प्रश्न विचारतो, स्वत:ला. आपल्याला स्वप्नं पडतात. मेंदूतल्या पेशी कशा ताणल्या जातात, एखाद्या तंबोर्याच्या तारेसारख्या- त्यावेळेस, स्वप्न पडत असताना. (म्हणजे हेही जाणवतं.) अंतस्थ रंग निळा-जांभळा असतो, मेंदूच्या आतल्या आत. मग ताणलेल्या पेशीपेशींमधून ते स्फुरतं- स्वप्न. एखादं गाणं स्फुरावं तसं. सहज आणि दु:खमय, अस्वस्थ. मग पडतं ते स्वप्नं वारंवार. एकच एक: आपण अथांग पोकळीत हरवून गेलो आहोत. पोकळीला अंत नाही, आरंभही नाही. म्हणजे पोकळीच कॅव्हिटी. आणि शोधतो आहोत काही तरी चाचपडत- तणावग… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
विश्लेषण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
विश्लेषण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
बुधवार, १६ एप्रिल, २०२५
स्वप्नात पाहिले जे...
Labels:
अनुभव,
जिज्ञासानंद,
भाष्य,
विश्लेषण,
साहित्य-कला
गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५
परतुनि ये घरा... - ३ (अंतिम) : ययाती, बुधा आणि... माणूस
-
कांदिद, कालिदास, आणि आरती देवी « मागील भाग --- मागील भागात ज्यांचा उल्लेख केला तो कालिदास असो वा आरती देवी, त्यांच्या सामाजिक आयुष्यातील साध्ये सिद्ध करण्यासाठी आपल्या जिवाभावाच्या जोडीदारांना विरह-वेदनेला सामोरे जाण्यास भाग पाडले आहे. हवे ते साध्य करण्यासाठी मूळ स्थानापासून दूर जाताना, जिवाभावाच्या व्यक्तीपासूनही दूर जाणे अपरिहार्य नव्हते. कालिदासाला मल्लिकेशी विवाह करून तिलाही सोबत नेणे शक्य होते. विलोमने– त्यांच्या सामायिक मित्राने– त्याला त्यावर पुन्हा पुन्हा डिवचलेही आहे. परंतु जोडीदाराला अर्ध्या वाटेत सोडणे हा सर्वस्वी स्वार्थी निर्णय म्हणता येणार नाही, कारण त्या निर्णयप्रक्रियेत त्या दोघांचीही बाजू येतेच. त्यामुळे कुठल्याही कौटुंबिक निर्णयात तो त्यांना अनुकूल घेतला जाण्याची एक शक्यता असतेच. परंतु परतुनि जाण्याच्या असोशीने, इत… पुढे वाचा »
Labels:
आकलन,
कथा,
चित्रपट,
जिज्ञासानंद,
मिथ्यकथा,
विश्लेषण,
साहित्य-कला
रविवार, ९ फेब्रुवारी, २०२५
परतुनि ये घरा... - २ : कांदिद, कालिदास, आणि आरती देवी
-
पेराल्टा, ऑर्फियस आणि नचिकेता « मागील भाग --- तुरुंगवारी अथवा मृत्युदर्शन हे टोकाचे नि वेदनादायक वळण आहे. आयुष्यात अपरिहार्यपणे अथवा अनाहुतपणे येणार्या इतर काही प्रमाथी नि आवेगी वळणांनाही, माणसे आपल्या इच्छाशक्ती, कुवत, कौशल्य नि चिकाटीने वळशामध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करतात. जगण्याची गाडी पुन्हा मूळ स्थानी नेऊन प्रवास सुरू करण्याचा अट्टाहास, आटापिटा करताना दिसतात. त्यांचा तो आटापिटा अनेकदा 'You can never go back home' या उक्तीचा अनुभव देऊन जात असतो. कांदिद: प्रसिद्ध विचारवंत वोल्तेअरच्या ‘ कांदिद ’ची कथा काहीशी मागील भागात सांगितलेल्या ऑर्फियस-युरिडिसीच्या वळणाची. पण त्याचे संघर्ष कैकपट व्यापक. त्याचे त्याच्या देखण्या आतेबहिणीवर– Cunégonde– प्रेम आहे. परंतु तिचे वडील बॅरन (१) म्हणजे उमराव घराण्यातील आहेत. आपल्… पुढे वाचा »
Labels:
आकलन,
कथा,
चित्रपट,
जिज्ञासानंद,
मिथ्यकथा,
विश्लेषण,
साहित्य-कला
गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२५
परतुनि ये घरा... - १ : पेराल्टा, ऑर्फियस आणि नचिकेता
-
जेक पेराल्टा: काही काळापूर्वी Brooklyn Nine-Nine ही मालिका पाहात होतो. मालिकेची पार्श्वभूमी एका पोलिस ठाण्याची. पण मालिका पोलिसकथा असूनही थरारपटांच्या वर्गात न मोडणारी. कथानकांचे पेड तपासकथांपेक्षा व्यक्ति त्यांच्या नातेसंबंधांच्या विविध पैलूंभोवती विणलेले. मुख्य पात्र असलेला जेक पेराल्टा हा धडाडीचा तपास-अधिकारी ऊर्फ डिटेक्टिव्ह. एका केसच्या संदर्भात, आधीच तुरुंगात असलेल्या एका गुन्हेगाराकडून काही माहिती काढून घेण्यासाठी, तो गुन्हेगार असल्याची बतावणी करून त्याला तुरुंगात डांबले जाते. आपण ज्या गुन्हेगारांना त्यांच्या कर्माचे फळ भोगायला पाठवतो, त्यांचे ते जग त्याला आतून पाहण्याची संधी मिळते. न्यायव्यवस्थेचा(!) एक तुकडा म्हणता येईल, अशी ती ‘व्यवस्था’ वास्तवात किती अव्यवस्थित, भोंगळ, शोषक, दाहक आहे, याचा अनुभव तो घेतो. व्यवस्थेच्या ठेकेदा… पुढे वाचा »
Labels:
आकलन,
कथा,
जिज्ञासानंद,
मालिका,
मिथ्यकथा,
विश्लेषण,
साहित्य-कला
मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३
पांचामुखी परमेश्वर ?
-
“इतक्या लोकांनी धर्म स्वीकारला तर तो खरा, नाहीतर खोटा, हे कसले तर्कशास्त्र आहे? ... एखाद्या धर्माचे अनुयायी असणे ही डोळसपणे स्वीकारलेली कृती नसून ती एक अंगवळणी पडलेली केवळ सवय झालेली असते. आणि अशांच्या संख्येच्या आधारे तुम्ही तुमच्या ज्ञानाची पारख करता, हे सगळे विचित्रच नाही का?” (जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘यात्रिक’ या कथेमधून) एखाद्या दाव्याच्या पाठीमागे उपस्थितांचे बहुमत उभे करून तो दावा वास्तव असल्याशी मखलाशी करण्याला बराच प्राचीन इतिहास आहे. बहुतेक धार्मिकांनी आपले संख्याबळ वाढवत नेत आपल्या धारणा इतरांवर लादण्याचा मार्ग अनुसरला आहे. धर्म नि त्यावर आधारित समाजव्यवस्था ही ‘वरून खाली’ स्वरूपाची आहे. व्यवस्थेचे नीतिनियम नि अवलोकन हे मूठभर श्रेष्ठींकडून निर्माण नि नियंत्रित केले जात असते. उलट प्रातिनिधिक लोकशाही ही ‘खालून वर’ म्हणजे समाजगटा… पुढे वाचा »
मंगळवार, १० ऑक्टोबर, २०२३
बुद्धिबळाचा अंत निश्चित आहे?
-
दहा-एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ऑफिसमध्ये चहापान करता-करता गप्पा चालू होत्या. विषय बुद्धिबळाचा होता. स्वत: उत्तम बुद्धिबळ खेळणारा आमचा बॉस म्हणाला,‘एक ना एक दिवस बुद्धिबळ हा खेळ बाद होऊन जाईल!’ त्याचा मुद्दा असा होता की बुद्धिबळातील प्रत्येक खेळीनंतर प्रतिस्पर्ध्याला उपलब्ध असणार्या खेळींची संख्या ही मर्यादित (finite) असते. त्या सार्यांची सूची बनवणे शक्य आहे. आता पहिल्या खेळाडूला या प्रत्येक खेळीसाठी प्रतिवाद करायचा आहे. पण त्या प्रत्येक खेळीनंतर पहिल्या खेळाडूलाही मर्यादित खेळ्या उपलब्ध आहेत. त्यांचीही सूची करता येईल... मुद्दा अगदी वाजवी होता. कारण आता या सार्या खेळींची ’ख्रिसमस ट्री’सदृश एक उतरती भाजणी तयार करता येईल. प्रत्येकी खेळी ही त्या वृक्षासाठी फांदीचा-फुटवा असेल. आणि या प्रत्येक फुटव्यापासून तयार झालेली फांदी हा– एक फांद… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)





