-
चलनातून पाचशे नि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बाद करत ‘कॅशलेस’ अर्थव्यवस्था हे आपले अंतिम उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच जाहीर केले आहे. अशा प्रकारच्या व्यवस्थेच्या नागरिकांच्या अर्थव्यवहारावर होऊ शकणार्या संभाव्य परिणामांबाबत चर्चाही सुरू झाल्या आहेत. परंतु अशा प्रकारची व्यवस्था सामाजिक पातळीवर काही बदल घडवू शकेल का, हे पाहणेही आवश्यक ठरेल. हा मुद्दा उपस्थित करण्याला ऐतिहासिक आधार आहेत, आणि इथे त्यातील एका पैलूचा वेध घेण्याचा प्रयत्न आहे. जगभरात मानवी संस्कृती जसजशी विकसीत होवू लागली तसतशी अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांपलिकडे माणसाच्या गरजांची संख्या वाढू लागली. आपल्या गरजेच्या सर्वच वस्तू आपापल्या निर्माण करण्याऐवजी, एकेका उत्पादनाची जबाबदारी एका व्यक्तीला वा समू… पुढे वाचा »
Vechit Marquee
‘वेचित चाललो...’ वर :   
उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...       अंतरीच्या या सुरांनी      
सोमवार, १९ डिसेंबर, २०१६
चलनमुक्त समाज आणि इतिहास (सहलेखक: अॅड. राज कुलकर्णी)
रविवार, ४ डिसेंबर, २०१६
सर्वेक्षणांचे गौडबंगाल
-
कार्ल मार्क्सचा सहाध्यायी फ्रेडरिक एंगल्सने एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर इंग्लंडमधील कामगार वर्गाच्या दारुण अवस्थेवर प्रकाशझोत टाकणारा अहवाल लिहून समाजनिर्मितीत सर्वेक्षणावर आधारित मूल्यमापन पद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले. आजची प्रस्थापित व्यवस्था संख्याशास्त्राचे नियम आणि मूल्यमापन पद्धती धुडकावत, जनमत स्वत:च्या बाजूने वळवण्याचे डावपेच रचत आहे. नोटाबंदीनंतर सर्वेक्षणांतून झालेले फसव्या जगाचे दर्शन हे त्याचेच द्योतक आहे... --- वृत्तपत्रे, चॅनेल्स, इन्टरनेट पोर्टल्स यांच्यामार्फत अनेक सर्व्हे घेण्यात येतात. उदा. ‘सलमान खान दोषी आहे असे तुम्हाला वाटते का?’ किंवा ‘अमीर खान असहिष्णुतेबद्दल जे म्हणाला त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का?’ वगैरे. त्याचे निकालही लगेच लाईव्ह दिसत असल्याने, आपले मत बहुसंख्येबरोबर गेले किंवा नाही हे ही लगेच तपासता येते… पुढे वाचा »
Labels:
दिव्य मराठी,
प्रासंगिक,
संख्याशास्त्र,
सर्वे
शनिवार, ३ डिसेंबर, २०१६
दक्षिणायन अनुभवताना
-
( मडगांव, गोवा इथे नुकत्याच पार पडलेल्या ‘दक्षिणायन’ अधिवेशनाला माझ्यासह काही मित्र हजर होते. त्यासंबंधी ‘आंदोलन’ मासिकासाठी लिहिलेला हा लहानसा वृत्तांत .) गेल्या तीन-साडेतीन वर्षांत विवेकवादाच्या, पुरोगामित्वाच्या तीन अध्वर्यूंची हत्या झाली, आणि भारतातील सामाजिक परिस्थिती ढवळून निघाली. परंपरेचा उद्घोष करत, शत्रूलक्ष्यी मांडणी करत अनेक गटांचा सामाजिक राजकीय क्षेत्रात नंगा नाच सुरू झाला. एफटीआयआयसारख्या संस्थांपासून मंत्रिमंडळापर्यंत सर्वत्र सुमारांची सद्दी सुरू झाली नि या उन्मादी गटांना बळ मिळत गेले. आम्ही सांगू तेच बोला, आमच्या विरोधात जाईल असे बोलू नका अन्यथा तुमचा ‘दाभोलकर करू’ किंवा ‘कलबुर्गी करू’ अशा उघड धमक्या सुरू झाल्या. विचारांचा लढा लढणारे पुरोगामी या हिंसक मार्यापुढे काहीसे हतबुद्ध झाल्यासारखे भासले. जरी नेते सावरले तरी कार… पुढे वाचा »
रविवार, २७ नोव्हेंबर, २०१६
... कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे
-
ताई, तुम्ही धरण बांधायला काढलं. म्हटला आमचं गाव बुडणार. मग आमचं घरदार, जमिनी बुडवल्या नि एका गावच्या पाच पन्नास लोकांना अनोळखी उंबर्यांच्या पाच-पन्नास गावांत विखरून टाकलेत. तुटपुंज्या मोबदल्यासाठी आणि सुपीक जमिनीच्या बदल्यात मिळणारा वांझ जमिनीचा तुकडा पदरी पाडून घेण्यासाठी आयुष्यभराची वणवण पाठी लावली. धरणाच्या पाठीमागच्या टेकाडावार फार्म हाऊस बांधून काढणारे नक्की कुठून उगवले, आम्हाला कळलंही नाही. आम्ही विचारलं, ‘असं का?’ तुम्ही म्हणालातः देशाचा विकास व्हायचा तर कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे. दादा, तुम्ही गावात कारखाना काढू म्हटला. पुन्हा आमच्या जमिनी घेतल्यात. म्हटलात आमच्या पोराबाळांना नोकरी देऊ. कास्तगारी करून स्वाभिमानाने जगणारी आमची पोरं, हातात दंडुका घेऊन दारात टाकलेल्या खुर… पुढे वाचा »
शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६
कास्त्रो
-
( क्यूबाचा हुकूमशहा फिडेल कास्त्रो याचे काल निधन झाले, त्या निमित्ताने मनात उमटलेले विचार ) ‘कल्याणकारी हुकूमशहा’ (benevolent dictator) अशी एक संज्ञा अधूनमधून कानावर पडत असते. उच्च-मध्यमवर्गीय आणि नव-मध्यमवर्गीयांना ती आकर्षक वाटते. लोकशाही म्हणजे भोंगळ, हुकूमशाही कशी ‘रिझल्ट ओरिएंटेड’ असते वगैरे दावे एरवी निर्णयप्रक्रियेवर फारसा प्रभाव राखू न शकणारे करत असतात. असा ‘बायपास’ आपल्याला हवे ते घडवेल, अशी त्यांना आशा असते. परंतु याचा अर्थ योग्य काय नि अयोग्य काय याबाबत ते फारसे चिकित्सक असतात असे समजायचे कारण नाही. आपण सोडून अन्य गटांचे फाजील लाड या लोकशाहीमुळे होत आहेत, गुणवत्तेला किंमत राहिलेली नाही इ. तक्रारी ते वारंवार करत असतात. आणि याचे खापर बहुमताच्या लोकशाहीवर ते फोडत असतात … पुढे वाचा »
मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०१६
मराठी साहित्यातले नेहरु
-
राजकारण असो की साहित्यकारण, आपल्या नि आपल्या गटाची प्रगती व्हायची असेल त्याला एकसंघ ठेवायचा असेल, तर दुर्योधनाने जसा सतत पांडवांचा बागुलबुवा उभा करून आपल्या शंभरांची एकजूट राखली, तसे एक बाह्य शत्रू, एक बाह्य विरोधक सतत जिवंत ठेवावा लागतो. ही शत्रूलक्ष्यी मांडणी आदिम माणूस जेव्हा टोळ्या करून राहात होता तेव्हापासून रक्तात भिनलेली आहे. माणसाला जसजशा प्रगतीच्या वाटा सापडत गेल्या तसतशी ही गरजही बदलत गेली असली, तरी पुरी नष्ट झालेली नाही. सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय असो की धार्मिक; कोणत्याच क्षेत्रात, कुण्याही मोठ्या झालेल्या व्यक्तीला अथवा संघटनेला समाजाची जमीन राब घातल्यासारखी स्वच्छ नि बीजरोपणायोग्य अशी आयती मिळालेली नाही. जुन्या, प्रस्थापित व्यक्तींच्या आणि विचारव्यूहांच्या मर्यादा दाखवून देत असतानाच त्यांचे ऋण मनमोकळेपणे आणि डोळसपणे मान… पुढे वाचा »
Labels:
पं. नेहरु,
पु. ल. देशपांडे,
प्रासंगिक,
व्यक्तिमत्व,
साहित्य-कला
मंगळवार, १ नोव्हेंबर, २०१६
‘विकसित’ भारतातील वाघ
-
नव्या बातम्या ‘विकसनशील’ नव्हे विकसित भारतातल्या... हे meme कायप्पामार्फत मिळाले असल्याने याचा चतुर कर्ता मात्र ठाऊक नाही. १. वाघांच्या एकादशीच्या उपासासाठी साबुदाणा आणि शेंगदाणे यांच्यासाठी टेंडर मागवण्यात येत आहे. विहित नमुन्यात अर्ज पाठवावेत. २. ‘करवा चौथ’च्या वेळी चाळण्या उपलब्ध करून न दिल्याबद्दल समस्त वाघिणींनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले, आणि सायंकाळी पंचगव्य सेवनाने सोडले. ३. कालच्या काकडीच्या कोशिंबीरीत खडे होते म्हणून वाघांनी जेवण आणून देणार्या मदतनीसाला चारही बाजूंनी घेरुन कोपर्यात घेतले आणि..... दहा उठाबशा काढायला लावूनच सोडले. ४. आठवड्याचा मेन्यू ठरवण्याचा लोकशाही हक्क वाघांना मिळाल्यापासून त्यांच्यात रोज भांडणे होताना दिसू लागली आहेत. काल ‘तांदळाची… पुढे वाचा »
गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६
आपला देश महान आहे.
-
१. ‘कट्यार...’ गाजू लागला की त्याच्याशी संबंधित नसलेला कुणीतरी ‘हे फक्त ब्राह्मणानेच करावे, इतरांचे ते काम नोहे’ असे म्हणतो, आणि अचानक तो चित्रपट ब्राह्मणी ठरून जातो . ब्राह्मण ‘मस्ट वॉच हं’ चे मेसेज एकमेकाला फॉरवर्ड करू लागतात, तर ब्राह्मण आणि ब्राह्मण्यविरोधक त्याच्यावर आगपाखड करू लागतात. ‘अरे हा केवळ चित्रपट आहे, त्यात जातीचे काय?’ म्हणणार्याला ‘तुम्हाला काय कळणार शतकाशतकांच्या शोषणाचे दु:ख’ म्हणून कानाखाली वाजवली जाते. (गाल चोळताना कट्यार आणि शतकाशतकांच्या शोषणाचा नक्की संबंध काय यावर तो विचार करून थकतो .) २. ‘सैराट’ गाजू लागला की, ‘फँड्री’ पाठोपाठ दुसरा यशस्वी चित्रपट देणार्या या दिग्दर्शकाचे त्याच्या कौशल्याचे कौतुक सुरू होते. आता त्याला दलित आयकॉन बनवणारे मेसेजेस नि पोस्टसचा पूर… पुढे वाचा »
शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६
मी अजून जहाज सोडलेले नाही! - बाबा आमटे
-
कालचा दिवस म्हणजे पर्वणी. बाबा आमटेंचे लेखन आणि अभिवाचक म्हणून चंद्रकांत काळे आणि सचिन खेडेकर हे अभिवाचन गुरु, आमचे आदर्श, एकाच व्यासपीठावर. म्हणजे हल्लीच्या भाषेत काय म्हणतात तसा डब्बल धमाका. ऐंशी मिनिटांचा कार्यक्रम संपला तेव्हा असं वाटलं ‘असा कसा अर्ध्या तासात उरकला यांनी’, पण घड्याळ योग्य वेळ दाखवत होते. एका गोष्टीची गंमत वाटली. ती म्हणजे प्रेक्षकांची उपस्थिती. जेमतेम चाळीस-पन्नास प्रेक्षक. निर्माती असलेल्या सोनाली कुलकर्णीला इवेंट मॅनेजमेंट शिकवायला हवे. आमचे साहित्यिकही गर्दी जमवायला अमिताभ सारखे, अमीर खानसारखे ‘विशेष आकर्षण’ घेऊन येतात, दहीहंडीच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण ‘सनी लिओन’ असते तेव्हा लाखभराचा समुदाय उपस्थित होतो.... हे आपले उगाचच हो, आमचे आपले नेहमीसारखे. पण बाबांच्या कविता ऐकायला पन्नास माणसे जमतात हेच खरंतर खूप … पुढे वाचा »
शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६
तो कलकलाट होता...
-
काही काळापूर्वी मराठी संस्थळांवर असताना मी आपले लेखन दर्जेदार असल्याचे कसे ठसवावे यावर एक लेख लिहिला होता. ( जिथे लिहिला, त्या संस्थळाबरोबरच तो शहीद झाला .) त्यात एक मुख्य धागा होता, तो असा की अनेक ठिकाणी आपणच वेगवेगळ्या अवतारांनी असावे; नि इथले तिथे, तिथले आणखी कुठे असे संदर्भ देत ते लेखन अनेक ठिकाणी उल्लेखनीय मानले गेल्याचे, एक प्रकारे मान्य झाल्याचे ठसवावे असा होता. निवडणुकांच्या काळात नीती सेन्ट्रल आणि त्यासारख्या अनेक वेबसाईट अचानक निर्माण झाल्या, नि परस्परांच्या हवाल्याने बातम्या पसरवू लागल्या. नीती... च्या अवतारसमाप्तीनंतर स्क्रोलने लिहिलेल्या लेखात यांची एक लहानशी यादीच दिली होती. खोटे अनेक तोंडांनी वदवून खर्याचा आभास निर्माण करणे, हा आता भारतात प्रस्थापित होऊन बसलेला प्रकार … पुढे वाचा »
गुरुवार, २ जून, २०१६
आपलं आपलं दु:ख
-
गालव हा विश्वामित्र ऋषींचा लाडका शिष्य. शिक्षण समाप्तीनंतर कोणतीही गुरुदक्षिणा न मागता गुरुंनी त्याला घरी परत जाण्यास अनुमती दिली. पण गुरुदक्षिणा देण्यास गालव हटून बसला. संतापलेल्या गुरुंनी मग ‘ज्यांचा एकच कान काळा आहे, असे आठशे पांढरेशुभ्र घोडे’ गुरुदक्षिणा म्हणून मागितले. असली विचित्र गुरुदक्षिणा ऐकून गालव स्तंभित झाला नि त्याने विपुल शोक केला. मग असे घोडे मिळवण्यासाठी मदत मागायला तो सम्राट ययातीकडे आला. त्याच्याकडे असे घोडे नव्हते, पण आलेल्या अतिथीला विन्मुख पाठवणे हे त्याच्या राजेपणाला न शोभणारे. मग तो आपल्या राजेपणाला शोभेसा(?) तोडगा त्यावर काढला. ‘रुपगुणाची खाण’ अशी ख्याती असलेली आपली कन्या ‘माधवी’ त्याने गालवाला दिली नि ‘तिच्या सहाय्याने तू घोडे मिळवू शकशील’ असा सल्ला त्याला दिला. पण हे करतानाच ययातीने अशी अट घातली होती की, ‘ति… पुढे वाचा »
गुरुवार, २६ मे, २०१६
वादे वादे जायते वादंग:
-
( एका – बहुधा तथाकथित सवर्ण वर्गात मोडणार्या – फेसबुक-मित्राने एका पोस्टमध्ये असा मुद्दा मांडला होता, की ‘सवर्ण असलेल्या माणसांना आपण आंबेडकरांचे विचार मानतो किंवा घटनेला प्रमाण मानतो किंवा आंबेडकरवादी आहोत हे पटवून द्याव लागतं, तेही वारंवार.’ एरवी जात या विषयावर न लिहिण्याचा माझा दंडक मोडून त्यावर दिलेली ही प्रतिक्रिया आहे. ) --- अगदी नेमका मुद्दा मांडला आहेस. पण अलिकडे याबाबत मी काहीसा हताश आहे. याबाबत सांगून काही होत नसतं. ‘इतकी वर्ष आम्ही सहन कसं केलं असेल’ हे उत्तर देऊन तोंड बंद केलं जात आहे. एक महत्त्वाचं ध्यानात घेतलं पाहिजे की प्रत्येक समाजात, जातीत, भाषिक गटात, धर्मात असेही लोक आहेत, तसेही लोक आहेत. त्यातल्या टीकेच्या सोयीचे प्रकारचे लोक हे ‘प्रातिनिधिक’ समजून वागत गेलो तर धागे जुळणारच नाही. एक नक्की की, द्वेषाचे पेरणी अ… पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
आंबेडकरवादी,
इझम,
चर्चा,
छद्मविचार,
पुरोगामित्व,
भूमिका,
संघटन,
समाज
शुक्रवार, ८ एप्रिल, २०१६
ऐलपैल - ४ : जमिनीलगतची उंच माणसे
-
रानिया - एक मॉडर्न आणि मॉडेल राज्ञी << मागील भाग दरवर्षी ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा झाली की वार्षिक वादंगांचे फड रंगतात. कुणाला शासनाची हांजी हांजी करण्याबद्दल पुरस्कार मिळाला, कुणाची लायकीच नव्हती, दुसरेच कुणी लायक कसे होते, याची हिरिरीने चर्चा सुरू होते. माध्यमांतून दिसणार्या लोकांभोवती ही चर्चा बहुधा फिरत राहते. पण या यादीत दरवर्षी काही अपरिचित नावेही दिसतात. ते कोण याचा शोध घेण्याची तसदी आपण बहुधा घेत नाही. विशेष म्हणजे ही नावे बहुधा पर्यावरण, जलसंधारण, मूलभूत वा शाश्वत विकास या सर्वसामान्य माणसाच्या जगण्याला पायाभूत असूनही, तुम्हा आम्हाला काडीचा रस नसलेल्या क्षेत्रातील असतात असा अनुभव आहे. यांच्याकडे फारसे लक्ष द्यावे असे माध्यमांना वाटत नाही याचे कारण म्हणजे यात ‘ब्रेकिंग न्यूज’ नसते; सर्वसामान्यांना वाटत नाही कारण आ… पुढे वाचा »
Labels:
ऐलपैल,
पुरोगामी जनगर्जना,
प्रासंगिक,
व्यक्तिमत्व,
समाज
सोमवार, २१ मार्च, २०१६
एवरीबडी लव्ज् रेमंड...
-
विषयसंगती ध्यानात घेऊन ही पोस्ट विस्तारासह ‘ बोर्डचाट्याच्या शोधात ’ या शीर्षकाखाली ‘ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवली आहे. - oOo - पुढे वाचा »
शुक्रवार, १८ मार्च, २०१६
ते काहीच म्हणाले नाहीत...
-
काल ‘ते म्हणाले’ , आज ‘ ’ते काहीच म्हणाले नाहीत‘ ’. त्यांना फारच डिवचलं तेव्हा म्हणाले, ‘There I spoke, here I remain silent’ त्यांचे आडगल्लीतले उपाध्यक्ष म्हणाले ‘याची जीभ कापा, पाच लाख देतो’ ... ते काहीच म्हणाले नाहीत... त्यांचे लोकनियुक्त खासदार म्हणाले ‘याची तंगडी मोडा, अकरा लाख देतो’ ... ते काहीच म्हणाले नाहीत... यांच्या ‘संन्यासी’ नेत्या म्हणाल्या ‘त्यांना’ पुरे निखंदून काढा ... ते काहीच म्हणाले नाहीत त्यांची चिल्लीपिल्ली म्हणाली ‘त्या’ लोकांना गो़ळ्या घाला ... ते काहीच म्हणाले नाहीत... त्यांचा ओसाडवाडीचा नेता म्हणाला ‘ते’ सगळे देशद्रोही आहेत, ठार मारा ... ते काहीच म्हणाले नाहीत... त्यांची वानरसेना म्हणाली सगळ्या पुरोगाम्यांना फाशी द्या ... ते काहीच म्हणाले नाह… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)