-
वृद्धत्वाची जेथ प्रचिती... « मागील भाग --- मागील भागाच्या अखेरीस नेहरुंचा उल्लेख आला आहे, तोच धागा पकडून पुढे जाऊ. जिज्ञासा https://www.istockphoto.com/ येथून साभार. फेसबुकवर एके ठिकाणी कुरुंदकरांनी नेहरुंबाबत लिहिलेला एक उतारा पोस्ट केलेला होता. त्याखाली एका तरुणाने “लेखकाला टॅग करता येईल का? त्याच्या प्रोफाईलवर जाता येईल.” अशी कमेंट केलेली होती. समाजमाध्यमांवर बस्तान बसवून असलेल्या ट्रोलिंग मानसिकतेच्या कुणी एकाने त्याचा स्क्रीनशॉट पोस्ट म्हणून टाकला असता, त्यावर सुमारे शंभरेक जणांनी 'हा: हा:’ अशी प्रतिक्रिया दिलेली पाहिली. ( ‘नेहरु’ असा शब्द वाचूनच हा: हा: करणारे काही त्यात असतील. त्यांना वगळून ) इतक्या सार्यांना कुरुंदकर ठाऊक आहेत ही आनंदाचीच बाब आहे. कुरुंदकरांचे, त्य… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
समाज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
समाज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?
Labels:
आकलन,
इतिहास,
जिज्ञासानंद,
तत्त्वविचार,
भाष्य,
समाज
गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५
पौरुषाचा कांगावा
-
महाराष्ट्र देशीचे उत्तर भारतीय जामात श्री. विवेक अग्निहोत्री यांनी मराठी वरणभाताला नाके मुरडताना ‘हे कसलं गरीबाचं खाणं. मी दिल्लीचा आहे. तेलाचा थर असणारं तिखट, मांसाहारी खाणं मला आवडतं’ अशी मुक्ताफळे उधळली आणि महाराष्ट्रदेशी संताप उसळला. तांबडा-पांढरा, अख्खा मसूर, वडा-भात, वांगे-भरीत, शेव-भाजी, चकोल्या वगैरेंनी आपले नेहमीचे वरणभाताशी असलेली ईर्षा तात्पुरती म्यान करुन त्यांस बाहेरून पाठिंबा देऊ केला. आम्हीही लोणच्यापासून पोह्यांपर्यंत सर्वत्र साखरेचा वर्षाव करणार्या जमातीशी तात्पुरते जुळवून घेतले. एकुण महाराष्ट्रदेशी दुर्मीळ असा एकोपा दृश्यमान झाला. मुळात अमुक खाणे हे फार शौर्याचे, तमुक खाणे दुय्यम अभिरुचीचे लक्षण वगैरे विनोदी समज नि त्यातून निर्माण झालेल्या अस्मिता हा केवळ महाराष्ट्रदेशीच नव… पुढे वाचा »
बुधवार, १८ जून, २०२५
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १ : वृद्धत्वाची जेथ प्रचिती...
-
१. वार्धक्याची वाट प्रत्येक माणसाच्या प्रगतीचा आलेख हा दोन टोके धरून थोडे ताणलेल्या इंग्रजी ‘एस’ अक्षरासारखा असतो. लहानपणी परावलंबी काळात ती मंद असते, पौगंडावस्थेपासून ती वेगाने होते आणि एका टप्प्यानंतर, मध्यमवयानंतर तिचा वेग कमी होतो नि माणूस चढण सोडून सपाट रस्त्यावरुन आडव्या दिशेने पुढे सरकत जातो. वृद्धपणी भौतिक नि मानसिक पातळीवर एक स्थैर्यावस्था आलेली असते. पण तरीही भवतालामध्ये, जगण्याच्या बहुतेक पैलूंमध्ये बदल होतच असतात. ते स्वीकारण्यासाठी लागणारी स्वतंत्र बुद्धी आता वृद्धांकडे राहिलेली नसते. त्यांच्याकडची शारीरिक, बौद्धिक पुंजी ही त्यांच्या उदयकाळातील बदलांशी झगडण्यात खर्च झालेली असते. त्यामुळे आता होणारे बदल स्वीकारण्यासाठी गुंतवणूक करावी अशी ऊर्जा त्यांच्याकडे शिल्लक नसते. प्रगतीच… पुढे वाचा »
Labels:
आकलन,
इतिहास,
जिज्ञासानंद,
तत्त्वविचार,
भाष्य,
समाज
गुरुवार, २९ मे, २०२५
मूषकान्योक्ती
-
१. सारी धुमश्चक्री संपली. सारे आवाज शांत झाले. थोडा वेळ गेला नि मूषकराज न्हाणीघराच्या बिळातून बाहेर डोकावता झाला. त्याने कानोसा घेतला. घरात शांतता असल्याची खात्री झाल्यावर तो बाहेर आला. तेथून तो माजघरात प्रवेश करता झाला. कानोसा घेऊन घरची स्त्री तिथे नसल्याची खात्री करुन घेतली. मग तो ओट्यावर चढला. त्याच्यासमोरील खिडकीतून बाहेर डोकावला. घरात नि घराबाहेर मघाशी झालेल्या हाणामारीतील जखमी मंडळी परसात नि मागच्या वाडीमध्ये दिसत होती. त्यांची तावातावाने काही चर्चा चालू होती. इतक्या दूरवरुन त्यातील तपशील ऐकू येत नव्हता. मूषकराज वैतागला. त्याने मागचे दार आतून बंद असल्याची खात्री करुन घेतली नि मग तो खिडकीच्या एका गजावर उभा राहिला. त्या सार्यांना दरडावणारे एक जोरदार भाषण त्याने ठोकले. पण ख… पुढे वाचा »
शुक्रवार, २३ मे, २०२५
सुजन गवसला जो
-
‘गाणार्याला आधी गाणारं एक मन असावं लागतं, तरच गाणं संभवतं’ असं पुलंनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे एखादा काका/आजोबा किंवा मावशी/ताई (मी आजी म्हटलेले नाही, प्लीज नोट) मध्ये आपल्याप्रमाणे मूलपण दिसत असेल, तर बहुधा मुलांना परकाही आपला वाटत असावा. परक्याकडे मूल सहजपणे जाणं हे त्या परक्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलचे एक महत्त्वाचे स्टेटमेंट आहे असे मला वाटते. त्याबाबत मी सुदैवी आहे. बच्चे कंपनीचे नि माझे छान जमत असे. एखाद्या पिल्लाला ‘चल ये’ म्हटले नि ते माझ्याकडे आले नाही असे क्वचितच घडत असे. बहुधा माझ्यातही त्यांना त्यांचे प्रतिबिंब दिसत असावे. ‘असे’ आता म्हणावे लागते, कारण आता मी बराचसा एकांतवादी झाल्याने मोठ्यांचाच फारसा संपर्क येत नाही, नि त्यामुळे मुलांचाही. मध्यंतरी काही काळ मी मॉर्निंग वॉकला ब… पुढे वाचा »
रविवार, १८ मे, २०२५
बाबेलचा दुसरा मनोरा
-
फार फार... फार्फारच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा वर्षाला वर्षही म्हणत नसावेत. तेव्हाची भाषाच वेगळी होती. पृथ्वीवर मोजकीच मनुष्यजात वावरत होती. सारे गुण्यागोविंदाने राहात होते, एकच भाषा बोलत होते. ही जमात अर्थातच भूस्थिर, नागर नव्हती. अन्नापाठी फिरत फिरत ते आजच्या इराकमधील भूभागात पोहोचले. खाणं, जुगणं नि क्वचित यांच्यासाठी लढणं या पलिकडचा विचार करणार्या त्यांच्यातील काही सुज्ञांनी नुकताच विटेची यशस्वी चाचणी घेतली होती. तिचा वापर करुन आपण पक्क्या गुहा बांधू शकतो असा त्यांचा दावा होता. The Tower of Babel. पण त्यांचा नेता महत्त्वाकांक्षी होता. त्याला केवळ घर बांधायची नव्हती, त्याला महासत्तेची द्वाही फिरवायची होती. त्याने केवळ जमिनीवरची नव्हे तर एकावर एक अशी चळत स्वरूपात घरे बांधून एक मन… पुढे वाचा »
शनिवार, २६ एप्रिल, २०२५
To Dumbo, with Love
-
फेसबुक नि त्यासारखी समाजमाध्यमे ही बव्हंशी पेंढा भरलेल्या बुजगावण्यांना आधार देऊन उभी करणारी काठी असते. नसलेल्या गुणांची जाहिरात करुन आपल्याला अपेक्षित अशी आपली ओळख वा व्यक्तिमत्त्व कृत्रिमरित्या उभे करण्यास साहाय्यभूत होणारे हे मंच. पण क्वचित हरवलेल्या संवाद नि संवेदनांच्या अभिव्यक्तीसाठी काही सुज्ञ मंडळी याचा वापर करतात तेव्हा सुखद धक्का बसतो. खाली दिलेली पोस्ट हा असाच एक सुखद धक्का होता. When Do We Lose Our Compassion? I was thinking about Dumbo the other day—the scene where they lock up Dumbo’s mom, calling her a “mad” animal just because she wanted to protect her baby. They tore them apart, and little Dumbo just wanted his mother. I remember how much t… पुढे वाचा »
बुधवार, २३ एप्रिल, २०२५
पहलगाम आणि आपण
-
काल पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जीव गमावलेल्या देशवासियांच्या कुटुंबियांसोबत सहवेदना, संवेदना व्यक्त करण्याऐवजी, समाजमाध्यमांवर मोदी-धार्जिण्या नि मोदी-विरोधक गटांतील अनेक नीच मंडळींनी एकमेकांबद्दलच्या फसफसणार्या द्वेषाचे दर्शन घडवले. मोदी-धार्जिण्या मंडळींनी ‘मणिपूरवाले’ आता बोलत नाहीत असे एकतर्फी जाहीर करत त्या दंगलींच्या वेळी जो तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला होता त्याचे उट्टे काढले. तर यांच्या विरोधी गटातील अनेकांनी या निमित्ताने मोदींवर शरसंधान करण्याची संधी साधली; ‘मग मोदी नाही का अशा गोष्टींचं राजकारण करत?’ असा प्रश्न विचारुन एकप्रकारे मोदी-धार्जिण्यांचाच तर्क वापरला. जेणेकरुन आपल्या विरोधी गटाची नि आपली मानसिकता वेगळी नाही, केवळ बाजू वेगळी आहे हेच सिद्ध केले. अशा घटनांबाबत झालेल्या चुका, त्रुटी या… पुढे वाचा »
मंगळवार, १८ मार्च, २०२५
वांझ राहा रे
-
(कालच्या नागपूर दंगलीच्या निमित्ताने...) हे जे काही भयंकर घडते आहे ते ‘त्यांच्यामुळे’ यावर समस्तांचे एकमत झाले... . . ... प्रत्येकाच्या मनात ‘ते’ कोण याची व्याख्या वेगळी होती इतकंच. कुणी म्हणाले हे मुस्लिमांचे पाप (आणि रमताराम अर्बन नक्षल आहेत) कुणी म्हणाले हे हिंदुत्ववाद्यांचे पाप (आणि रमताराम छुपे संघी आहेत) कुणी म्हणाले हे बामणांचे पाप (आणि रमताराम मनुवादी आहेत) कुणी म्हणाले हे फ्रस्ट्रेटेड बहुजनांचे पाप (आणि रमताराम ब्रिगेडी आहेत) कुणी म्हणाले हे पुरोगाम्यांचे पाप (आणि रमताराम अंधभक्त आहेत) कुणी म्हणाले, हे मध्यमवर्गीयांचे पाप (आणि रमताराम वर्गद्रोही आहेत) --- रमताराम म्हणाले: Photo by Maan Limburg on Unsplash तुमच्या बीजातच विष आहे! वांझ राहा रे, वांझ रा… पुढे वाचा »
बुधवार, १८ डिसेंबर, २०२४
‘ग्लॅड फॉर ग्लाड?’ : ग्लाड, वीरभूषण आणि मी
-
(‘थँक यू, मि. ग्लाड’ या अनिल बर्वे लिखित कादंबरी/नाटक यांबाबत विवेचन करणारे दोन लेख ‘वेचित चाललो’ वर लिहिले होते. विषयसंगतीनुसार काही तपशील वगळून हा मजकूर एकत्रितरित्या ‘तत्रैव’ नियतकालिकाच्या नोव्हेंबर-डिसेंबर-२०२४ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.) पुस्तक : ‘थॅंक यू, मिस्टर ग्लाड’ लेखक : अनिल बर्वे प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन आवृत्ती सहावी, दुसरे पुनर्मुद्रण (२०२०) —काही झाले तरी ग्लाडसाहेबांची राजनिष्ठा मोठी कडवी होती हे खरे. प्राण गेला तरी साहेब खाल्ल्या मिठाला जागल्याशिवाय राहिला नसता. बेचाळीसच्या चळवळीत हाती सापडलेल्या सत्याग्रह्यांना कारणे शोधून शोधून ग्लाडसाहेबाने गुरासारखे बडवून काढले होते. पण युनियन जॅक उतरून तिरंगा वर चढला, तेव्हा ग्लाडसाहेबाने दु:ख आवरून एक कडक सॅल्… पुढे वाचा »
Labels:
जिज्ञासानंद,
तत्रैव,
राजकारण,
समाज,
साहित्य-कला
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)









