-
वृद्धत्वाची जेथ प्रचिती... « मागील भाग --- मागील भागाच्या अखेरीस नेहरुंचा उल्लेख आला आहे, तोच धागा पकडून पुढे जाऊ. जिज्ञासा https://www.istockphoto.com/ येथून साभार. फेसबुकवर एके ठिकाणी कुरुंदकरांनी नेहरुंबाबत लिहिलेला एक उतारा पोस्ट केलेला होता. त्याखाली एका तरुणाने “लेखकाला टॅग करता येईल का? त्याच्या प्रोफाईलवर जाता येईल.” अशी कमेंट केलेली होती. समाजमाध्यमांवर बस्तान बसवून असलेल्या ट्रोलिंग मानसिकतेच्या कुणी एकाने त्याचा स्क्रीनशॉट पोस्ट म्हणून टाकला असता, त्यावर सुमारे शंभरेक जणांनी 'हा: हा:’ अशी प्रतिक्रिया दिलेली पाहिली. ( ‘नेहरु’ असा शब्द वाचूनच हा: हा: करणारे काही त्यात असतील. त्यांना वगळून ) इतक्या सार्यांना कुरुंदकर ठाऊक आहेत ही आनंदाचीच बाब आहे. कुरुंदकरांचे, त्य… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
इतिहास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
इतिहास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?
Labels:
आकलन,
इतिहास,
जिज्ञासानंद,
तत्त्वविचार,
भाष्य,
समाज
बुधवार, १८ जून, २०२५
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १ : वृद्धत्वाची जेथ प्रचिती...
-
१. वार्धक्याची वाट प्रत्येक माणसाच्या प्रगतीचा आलेख हा दोन टोके धरून थोडे ताणलेल्या इंग्रजी ‘एस’ अक्षरासारखा असतो. लहानपणी परावलंबी काळात ती मंद असते, पौगंडावस्थेपासून ती वेगाने होते आणि एका टप्प्यानंतर, मध्यमवयानंतर तिचा वेग कमी होतो नि माणूस चढण सोडून सपाट रस्त्यावरुन आडव्या दिशेने पुढे सरकत जातो. वृद्धपणी भौतिक नि मानसिक पातळीवर एक स्थैर्यावस्था आलेली असते. पण तरीही भवतालामध्ये, जगण्याच्या बहुतेक पैलूंमध्ये बदल होतच असतात. ते स्वीकारण्यासाठी लागणारी स्वतंत्र बुद्धी आता वृद्धांकडे राहिलेली नसते. त्यांच्याकडची शारीरिक, बौद्धिक पुंजी ही त्यांच्या उदयकाळातील बदलांशी झगडण्यात खर्च झालेली असते. त्यामुळे आता होणारे बदल स्वीकारण्यासाठी गुंतवणूक करावी अशी ऊर्जा त्यांच्याकडे शिल्लक नसते. प्रगतीच… पुढे वाचा »
Labels:
आकलन,
इतिहास,
जिज्ञासानंद,
तत्त्वविचार,
भाष्य,
समाज
रविवार, ७ ऑगस्ट, २०२२
आमच्याच नळाचं पाणी जगभर गेलंय
-
सामान्यपणे दक्षिण भारताचा इतिहासही धड ठाऊक नसलेले लोक टारझनसारखे छात्या पिटून राष्ट्रभक्ती वगैरेच्या बर्याच बाता मारत असतात. इतिहासामधून आपल्या जातीच्या, धर्माच्या सोयीच्या घटना नि नेते शोधून त्यांच्या जयंत्या, मयंत्या, पुतळे नि देवळे उभी करुन आपल्या संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाच्या ढेकरा- आय मिन डरकाळ्या फोडत असतात. प्रामुख्याने यांच्यातच ’आमच्याच नळाचं पाणी जगभर गेलंय’ या गैरसमजाला देवघरात ठेवून रोज दोन फुलं वाहण्याची पद्धत आहे. वास्तविक संस्कृती नि इतिहास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण इतिहास म्हणतो तेव्हा केवळ राजकीय इतिहास- आणि त्याला जोडून येणारा सामाजिक इतिहासच आपल्याला अभिप्रेत असतो. सांस्कृतिक नि भौतिक इतिहासाचे आपल्याला वावडे असते. शेजार्याच्या घराला, शेजारच्या इमारतींमधील घराला वापरलेल्या विटांची माती कशी आमच्याच परसातली होती … पुढे वाचा »
मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२
इतिहास, चित्रपट नि मी
-
'काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रेक्षागृहात असताना, त्यांच्याबद्दल भवती न भवती चालू असताना एका मित्राने त्याच्या फेसबुक-पोस्टबाबत मी व्यक्त व्हावे यासाठी मला टॅग केले होते. त्याला दिलेला हा प्रतिसाद. माझ्या स्वयंभू परंपरेला अनुसरून सर्वच गटांना नाराज करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. एरवी माझ्या दृष्टिने प्रासंगिकता हा आता टाकाऊ विषय आहे हे सुरुवातीलाच नोंदवून ठेवतो. एखाद्या लेझर विजेरीच्या भिरभिरत्या लाईटच्या मागे नाचणार्या मांजरासारखे नाचायला मला आवडत नाही. --- मुळात इतिहास हा विषय मला त्याज्य आहे. ’इतिहासातून प्रेरणा मिळते’ हे भंपक विधान आहे. इतिहासातून फक्त झेंडे आणि शस्त्रे मिळतात.'माणसे त्यातून शिकतात’ हे शेंडाबुडखा नसलेले विधान आहे. ’शालेय जीवनात इतिहास हा विषय शिकवूच नये. ज्याला खरोखर रस असेल त्याला पुरेशी समज आल्यावर… पुढे वाचा »
शनिवार, ३० जुलै, २०२२
भूतकालाचा करावा थाट
-
भूतकालभोगी भारताच्या अगदी सुरुवातीच्या पिढ्यांनी जे निर्माण केले ते मुद्दल गुंतवून मधल्या पिढ्यांनी त्यावर गुजराण केली. अधिक मिळवण्यापेक्षा बचत करुन पोट भरण्याचा हा वारसा आपल्या पुढच्या पिढ्यांना दिला. शेतीकेंद्रित समाजव्यवस्थेचे चिरे निखळायला सुरुवात झाली, उद्योगांचे नि रोजगारांचे इमले उठू लागले नि माणसे अधिकच परावलंबी होत चाकरमानी झाली. त्यांची उरलीसुरली निर्मितीक्षमता लयाला जाऊन त्यांचे एककीकरण होऊ लागले. निर्मितीक्षम आणि निर्मितीशील समाज व त्यातील व्यक्तिंमध्ये असणारा आत्मविश्वास डळमळीत होऊ लागला, की माणूस उसन्या काठ्यांचे आधार घेऊ लागतो. त्यातही डोक्याला फार ताण देता, काहीही गुंतवणूक न करता फुकट मिळणार्या अशा काठ्या म्हणजे वारसा आणि भूतकालवैभव. मग भूतकालभोगी पुढच्या पिढ्यांनी डोके भूतकाळात खारवून, मुरवून ठेवले आणि वर्तमानात हातां… पुढे वाचा »
गुरुवार, १६ जुलै, २०२०
इतिहासाचे अवजड ओझे (‘मॅन इन द आयर्न मास्क’च्या निमित्ताने)
-
विषयसंगतीमुळे हा लेख ’ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »
सोमवार, १ जून, २०२०
बेगिन, बालाकोट, बुश आणि अंधारातील अधेली
-
७ जून १९८१ रोजी इस्रायलने इराकवरील ’ओसिरॅक’ अणुभट्टीवर हल्ला करुन ती उध्वस्त केल्याचे जाहीर केले. ’या अणुभट्टीमध्ये अण्वस्त्रांना आवश्यक असणारे इंधन बनवले जात आहे’ असा इस्रायलने आरोप केला होता. ’भविष्यात एक अण्वस्त्रसज्ज शेजारी निर्माण झाल्याने आमच्या राष्ट्राचे सार्वभौमत्व धोक्यात येईल. त्याविरोधात ’pre-emptive strike करण्यात आला, धोक्याला अंकुर फुटताच आम्ही तो खुडून टाकला’ असा दावा इस्रायलने केला. या हल्ल्याला ’ऑपरेशन ऑपेरा’ असे नाव देण्यात आले होते. या हल्ल्यामध्ये ही ’अणुभट्टी उध्वस्त केली’ असे इस्रायलने जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात तिचे बाह्य नुकसानच झाले होते. गाभ्याला फारसा धक्का लागला नव्हता. ती उभारणार्या फ्रेंच तंत्रज्ञांनी नंतर तिची डागडुजी करुन ती पुन्हा कार्यान्वित केली. याच धर्तीवर पुढे २००३ मध्ये असंख्य संहारक अस्त… पुढे वाचा »
Labels:
‘द वायर मराठी’,
आंतरराष्ट्रीय,
इतिहास,
जिज्ञासानंद,
राजकारण,
सत्ताकारण
मंगळवार, १७ डिसेंबर, २०१९
‘यशस्वी माघार’ की ‘पलायन’
-
( ’माफीवीर सावरकर’ या उल्लेखाला प्रतिवाद म्हणून ’माफी नव्हे , राजनीती : शिवछत्रपती आणि सावरकर’ या प्रसिद्ध इतिहाससंशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचा लेख फेसबुकवर शेअर करण्यात आला. त्याला दिलेले हे उत्तर. ) ’यशस्वी माघार’ म्हणायचे की ’पलायन’ हे भविष्यातील यशावर अवलंबून असते. तात्पुरती माघार घेऊन नंतर यशाची जुळणी करणॆ शक्य झाले तर त्या पलायनालाही यशस्वी माघार म्हणता येते. नाहीतर प्रत्येक पळपुटा आपल्या पलायनाला ’स्ट्रॅटेजिक रिट्रीट’ म्हणूच शकतो. ते आपण मान्य करत जाणार आहोत का? की आपल्या बाब्याचा दावा खरा नि विरोधकाचा खोटा इतके सरधोपट निकष लावणार आहोत? इतरांसाठी अतर्क्य भविष्यवाणी करणारा द्रष्टा तेव्हाच म्हणवला जातो जेव्हा त्याची भविष्यवाणी खरी होते. (खरंतर त्या भविष्यवाणीलाही तर्काचा, संगतीचा, वारंवारतेचा आधार हवा. पण तो मुद्द्या सध्या सो… पुढे वाचा »
सोमवार, ७ मे, २०१८
इतिहासाची झूल पांघरलेले बैल
-
इतिहासातील व्यक्तिरेखांना खांद्यावर घेऊन ‘बाय असोसिएशन’ आपणही ग्रेट आहोत हे मिरवण्याची संधी लोक साधू इच्छितात. ती व्यक्तिरेखा आपल्या जातीची आणि/किंवा धर्माची असेल तर, तिच्यावर आपला बाय डिफॉल्ट हक्क आहे, आणि अन्य जात/धर्मीयांचा नाही, असे बजावून तिच्यावर ‘रिजर्वेशन’ टाकता येते. त्यातून सामान्यातल्या सामान्याला असामान्यतेच्या भोवती मिरवता येते. जोवर ‘सामान्य असण्यात काही गैर नाही’ हे मान्य करत नाही, उगाचच श्रेष्ठत्वाची उसनी झूल मिरवण्याचे विकृत हपापलेपण माणसाच्या मनातून जात नाही, तोवर हे असेच चालणार. पार्ट्या पाडून, टोळ्या बनवून खेळायला, खेळवायला, हिणवायला आणि माज करायला माणसाला आवडते. इतिहास उकरून काढून आपली दुकाने चालवणारे जसे धर्मवेडे आहेत, तसे जात-माथेफिरूही भरपूर आहेत. गेल्या पंधरा वीस वर्षांत घरबसल्या तथाकथित ‘खरा इतिहास’ लिहिणार्यां… पुढे वाचा »
शुक्रवार, २ मार्च, २०१८
खरा इतिहास, खोटा इतिहास
-
अमका इतिहास हा ‘खोटा इतिहास’ आहे नि अमका इतिहास ‘खरा इतिहास’ आहे हे अनेक लोक छातीठोकपणे सांगतात, तेव्हा मला प्रचंड न्यूनगंड येतो. मुद्रित माध्यमांचा शोध लागून दस्तऐवजीकरण चालू झालेल्या काळातील, किंवा एका दिवसांतच एका देशातून दुसर्या दूरवरच्या देशात पोचता येईल इतकी अत्याधुनिक विमानसेवा सुरु झालेल्या काळातील; काही घटना, उक्ती/उद्धृते यांच्याबद्दल ठामपणे सांगणे मला अवघड जाते. तिथे प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास यांच्याबाबत ठामपणे खरे-खोटे करणारे लोक त्यांच्या त्यांच्या धर्माच्या प्रेषिताहून महान असतात, असे माझे नम्र मत आहे. आता हेच बघाना, एका विज्ञानविषयक वीडिओ बघत असताना एकदम ठेच लागली. त्यात एक खगोलशास्त्रज्ञ असं म्हणाली, "Albert Einstein had said, 'Not only is the universe stranger than we imagine, it is stranger than we can … पुढे वाचा »
गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८
नेहरु आणि पटेल: बाता आणि वास्तव
-
१. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सरदार पटेल ७२ वर्षांचे होते. २. त्यावेळी ते तीव्र मधुमेहाने आजारी होते. ३. डिसेंबर १९५० मध्ये त्यांच्या त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा... ३अ. भारत स्वतंत्र होऊन तेव्हा जेमतेम तीन वर्षे झाली होती. म्हणजे तेव्हा पुन्हा ‘भारताचा शाप’(!) असलेले नेहरु पंतप्रधान झालेच असते. ३ब. अजून भारतातील पहिल्या निवडणुकाही पार पडल्या नव्हत्या. ४. ते स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि भारतीय सेनेचे पहिले ‘कमांडर-इन-चीफ’ होते. आणि ज्या अर्थी संस्थानांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय ते ‘एकट्याने’ घेऊ शकत होते, आणि तो ‘एकट्याने’ अंमलातही आणू शकत होते त्या अर्थी त्यांना शासनात भरपूर निर्णयस्वातंत्र्य नि अधिकार होते असे म्हणावे लागेल. ज्या अर्थी नेहरुंनी त्यांना यात स्वातंत्र्… पुढे वाचा »
रविवार, २१ जून, २०१५
एका शापित नगरीची कहाणी
-
‘ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. तरीही माणसं आपला इतिहास धुंडाळतात, हजारो वर्षांपूर्वीच्या कुण्या श्रेष्ठ व्यक्तीशी आपले नाते जोडून त्याला आपल्या वर्तमानातल्या अस्तित्वाचा आधार बनवू पाहतात. अनेक वर्षांच्या परंपरा असलेला समाज यात आपल्या अस्मितांची स्थानेही शोधत असतो. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तीन ‘बिब्लिकल’ धर्मांचे आणि त्यांच्या असंख्य पंथोपपंथांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘जेरुसलेम’ नगरीला या सार्या परंपरांमधे अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकाच नगरीचे अस्तित्व आणि महत्त्व इतका दीर्घकाळ टिकून राहिल्याचे दुसरे उदाहरण इतिहासात नाही. त्यामुळे जेरुसलेमचा इतिहास हा श्रद्धाळूंच्या दृष्टीने जितका महत्त्वाचा, तितकाच अभ्यासकांच्या दृष्टीनेही. पण जिथे श्रद्धांचा प्रश्न असतो, तिथे त्या अभ्यासात वस्तुनिष्ठता येणे बव… पुढे वाचा »
Labels:
‘मीमराठीLive’,
इतिहास,
जिज्ञासानंद,
पुस्तक,
संस्कृती,
समाज
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)











