Vechit Marquee

सूची: अनुक्रमे ▶ वर्गीकरण ▶ लेखमाला ▶ लक्षवेधी ◼

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

आपला देश महान आहे


  • १. ‘कट्यार...’ गाजू लागला की त्याच्याशी संबंधित नसलेला कुणीतरी ‘हे फक्त ब्राह्मणानेच करावे, इतरांचे ते काम नोहे’ असे म्हणतो, आणि अचानक तो चित्रपट ब्राह्मणी ठरून जातो . ब्राह्मण ‘मस्ट वॉच हं’ चे मेसेज एकमेकाला फॉरवर्ड करू लागतात, तर ब्राह्मण आणि ब्राह्मण्यविरोधक त्याच्यावर आगपाखड करू लागतात. ‘अरे हा केवळ चित्रपट आहे, त्यात जातीचे काय?’ म्हणणार्‍याला ‘तुम्हाला काय कळणार शतकाशतकांच्या शोषणाचे दु:ख’ म्हणून कानाखाली वाजवली जाते. (गाल चोळताना कट्यार आणि शतकाशतकांच्या शोषणाचा नक्की संबंध काय यावर तो विचार करून थकतो .) २. ‘सैराट’ गाजू लागला की, ‘फँड्री’ पाठोपाठ दुसरा यशस्वी चित्रपट देणार्‍या या दिग्दर्शकाचे त्याच्या कौशल्याचे कौतुक सुरू होते. आता त्याला दलित आयकॉन बनवणारे मेसेजेस नि पोस्टसचा पूर येतो. फेसबुक आणि वॉट्सअ‍ॅप वर तथाकथित उच्चवर्णीय जातींना, त्या जातीच्या कलाकारांना हिणवणार्‍या पोस्ट दिसू लागतात. पुन्हा पोलरायजेशन होऊन सैराट हा मराठा समाजाची बदनामी करणारा चित्रपट आहे म्हणून गदारोळ होतो, समाजात उभी फूट पडते. नागराज हा सार्‍या समाज...

    पुढे वाचा »

शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

मी अजून जहाज सोडलेले नाही! - बाबा आमटे


  • कालचा दिवस म्हणजे पर्वणी. बाबा आमटेंचे लेखन आणि अभिवाचक म्हणून चंद्रकांत काळे आणि सचिन खेडेकर हे अभिवाचन गुरु, आमचे आदर्श, एकाच व्यासपीठावर. म्हणजे हल्लीच्या भाषेत काय म्हणतात तसा डब्बल धमाका. ऐंशी मिनिटांचा कार्यक्रम संपला तेव्हा असं वाटलं ‘असा कसा अर्ध्या तासात उरकला यांनी’, पण घड्याळ योग्य वेळ दाखवत होते. एका गोष्टीची गंमत वाटली. ती म्हणजे प्रेक्षकांची उपस्थिती. जेमतेम चाळीस-पन्नास प्रेक्षक. निर्माती असलेल्या सोनाली कुलकर्णीला इवेंट मॅनेजमेंट शिकवायला हवे. आमचे साहित्यिकही गर्दी जमवायला अमिताभ सारखे, अमीर खानसारखे ‘विशेष आकर्षण’ घेऊन येतात, दहीहंडीच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण ‘सनी लिओन’ असते तेव्हा लाखभराचा समुदाय उपस्थित होतो.... हे आपले उगाचच हो, आमचे आपले नेहमीसारखे. पण बाबांच्या कविता ऐकायला पन्नास माणसे जमतात हेच खरंतर खूप आहे म्हणतो मी. अजून त्यांचे नाव लोकांना ठाऊक आहे, हे काय कमी आहे. असो. जाता जाता: बाबांच्या ‘मी अजून जहाज सोडलेले नाही!’ मधला काही भाग...आजच्या काळाला बराचसा सुसंगत असा! --- ...

    पुढे वाचा »

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

तो कलकलाट होता...


  • काही काळापूर्वी मराठी संस्थळांवर असताना मी आपले लेखन दर्जेदार असल्याचे कसे ठसवावे यावर एक लेख लिहिला होता. ( जिथे लिहिला, त्या संस्थळाबरोबरच तो शहीद झाला .) त्यात एक मुख्य धागा होता, तो असा की अनेक ठिकाणी आपणच वेगवेगळ्या अवतारांनी असावे; नि इथले तिथे, तिथले आणखी कुठे असे संदर्भ देत ते लेखन अनेक ठिकाणी उल्लेखनीय मानले गेल्याचे, एक प्रकारे मान्य झाल्याचे ठसवावे असा होता. निवडणुकांच्या काळात नीती सेन्ट्रल आणि त्यासारख्या अनेक वेबसाईट अचानक निर्माण झाल्या, नि परस्परांच्या हवाल्याने बातम्या पसरवू लागल्या. नीती... च्या अवतारसमाप्तीनंतर स्क्रोलने लिहिलेल्या लेखात यांची एक लहानशी यादीच दिली होती. खोटे अनेक तोंडांनी वदवून खर्‍याचा आभास निर्माण करणे, हा आता भारतात प्रस्थापित होऊन बसलेला प्रकार आहे. आज याचे आणखी एक उदाहरण दिसते आहे. PoKमध्ये घुसून वीस अतिरेकी ठार मारून ‘ऊरी’चा बदला घेतला अशा बातम्या अनेक पोर्टल्सवर दिसू लागल्या आहेत. आश्चर्य म्हणजे अजूनतरी एकाही बड्या वृत्तपत्रसमूहाने वा चॅनेलने याची दखल घेतली नसली, तरी आपल्याच गटातल्या दु...

    पुढे वाचा »