Vechit Marquee

सूची: अनुक्रमे ▶ वर्गीकरण ▶ लेखमाला ▶ लक्षवेधी ◼

मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

आळशांच्या बहुमता...


  • प्राचीन काळी मी संगणक-क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही स्वयंसिद्ध (stand-alone) (१) स्वरूपाची प्रणाली (software) सॉफ्टवेअर तयार करत असू. तिचा आराखडा आमचाच नि तयार करणारे आम्हीच. त्यात काय काय असावे, कसे असावे हे निश्चित करणारा पहिला planning टप्पा असे. त्यानंतर त्याचा डोलारा (skeleton) तयार केले जाई. मग प्रत्यक्ष कार्य करणारे विभाग एक-एक करुन भरले जात. आता याचा पुढचा महत्त्वाचा टप्पा सुरु होई. यात त्याची प्राथमिक वैधता-चाचणी (testing) आणि/किंवा QA अर्थात गुणवत्ता-तपासणी केली जाई. त्यानंतर यात सापडलेल्या ढोबळ चुका दुरुस्त करुन ही प्रणाली अधिक भक्कम केली जाई. यात अपेक्षित निकाल मिळतो आहे ना हे तपासण्याबरोबरच अनपेक्षित निकाल येत नाही ना या दिशेनेही चाचणीचे टप्पे पार पडत. ते पार पडल्यानंतर हे कंपनीच्या बाहेरील काही तज्ज्ञांना Beta-tester म्हणून नेमून त्यांच्याकडे सुपूर्द केले जाई. रुढ चौकटीमध्ये काम करणार्‍या कंपनीतील कामगारांच्या नजरेस न पडणार्‍या चुका या टप्प्यात सापडतील अशी अपेक्षा असे. या बाह्य तज्ज्ञांचे तपासणी काम चालू असताना...

    पुढे वाचा »

शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५

निवडणुका, प्रातिनिधित्व: अमेरिका आणि भारत


  • मागील आठवडाभर आमच्यासारख्या मूठभरांचं लक्ष न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीकडे होते. आपण ‘डेमोक्रॅटिक सोशलिस्ट’ असल्याचा दावा करणारे जोहराम ममदानी मोठ्या फरकाने निवडून आले. कुणी त्याला भारतीय वंशाचा म्हणवत ताट-वाटी घेऊन त्याने रांधलेल्या यशाचा एक तुकडा आपल्या पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न केला. कुणी ‘डेमोक्रॅटिक’ का होईना सोशलिस्ट आहे ना’ म्हणत विळा-कोयता उंच केला. मोकाट भांडवलशाहीचे आगर असलेल्या अमेरिकेच्या आर्थिक राजधानीमध्ये तिचे नाक कापल्याचा आसुरी आनंद आमच्यासारख्यां रिकामटेकड्यांना झाला... इस्रायलने मध्यपूर्वेत एक मुस्लिम मारला की आपल्याकडे काहींना होतो अगदी तसा. कुणी नुसताच आनंद व्यक्त केला, कुणी ‘तेव्हा कसे... आता का...’ हा भारताचा राष्ट्रीय तर्क वापरुन आपली हिणवत्ता सिद्ध केली. पण या सगळ्या कल्लोळामध्ये काही तपशील पाहायचे आपण विसरुन गेलो. ममदानी लढवत असलेल्या निवडणुकीत किमान सात उमेदवार रिंगणात होते. ममदानी विविध ठिकाणी प्रत्यक्ष वा व्हिडिओद्वारे मतासाठी आवाहन करत होते. या आवाहनामध्ये ते स्वत:ला मत तर मागत होतेच, पण त्या...

    पुढे वाचा »

रविवार, २ नोव्हेंबर, २०२५

ट्रम्प, अमेरिका आणि जागतिक बदलाचे वारे - २ : ट्रम्प आणि इस्रायल


  • भाग - १ « मागील भाग --- व्यवसायातील नफा वाढवायचा असेल, तर ‘वेतन-खर्च कमी करणे’ हा भांडवलशाहीतील हुकमी मार्ग आहे. आठ वर्षांत आपल्या कर्मचार्‍यांना जेमतेम एक टक्का वेतनवाढ दिल्याबद्दल बोईंगच्या सीईओला अमेरिकन सेनेट कमिटी सदस्यांनी धारेवर धरल्याचा एक व्हिडिओ यू-ट्यूबवर सापडेल. याचबरोबर इतर सुरक्षा नियम धाब्यावर बसवून, प्रवासी नि कर्मचारी यांचा जीवही धोक्यात घालून, कंपनीचा नफा वाढवण्याचे नव-नवे मार्ग त्याने शोधले. याबद्दल बक्षीस म्हणून त्याला एकाच वर्षांत ४५% इतकी घसघशीत वाढ देऊन, ३.३ कोटी डॉलर्स(!) इतके वार्षिक वेतन कंपनीच्या संचालक मंडळाने देऊ केले. कट्टर भांडवलशाहीसमर्थक अमेरिकेत अजिबात न शोभणारे याचे निदान त्याची झाडाझडती घेणार्‍यांपैकी एका सेनेटरने केले. तो म्हणाला, ‘मि. सीईओ, तुम्हाला कंपनीच्या हिताच्या आड येणारी समस्या शोधायची खटपट करायची गरज नाही. ती समस्या तुम्हीच आहात.’ alJazeera.com येथून साभार. जेव्हा राजकारणी हेच उद्योजकही असतात, तेव्हा ते व्यावसायिक यशाचे उपाय शासनव्यवस्थेतही अंमलात आणू लागतात. ट्रम्प यांच्यासाठी...

    पुढे वाचा »

गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५

ट्रम्प, अमेरिका आणि जागतिक बदलाचे वारे - १ : अमेरिकेमध्ये ट्रम्प


  • बहुप्रतीक्षित नोबेल शांतता पुरस्कार अखेर जाहीर झाला. सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या विरोधक असलेल्या, ‘आपल्या देशात अमेरिकेने लष्करी हस्तक्षेप करावा’ अशी मागणी करणार्‍या आणि जगभरात सर्वाधिक खनिज तेलाचे साठे असलेल्या त्या देशातील ते साठे भांडवलदारांच्या ओटीत टाकण्यास उत्सुक असणार्‍या, व्हेनेझुएलाच्या मारिया मच्याडो यांच्या पदरात हा पुरस्कार पडला. मच्याडो यांचा राजकीय दृष्टीकोन शांततावादी मुळीच नाही. नोबेल शांतता कमिटीने बहुधा ‘समाजवाद नि समाजवादी विरोधक = शांततावादी’ ही सोपी व्याख्या स्वीकारली असावी. विध्वंसाचे हत्यार असलेल्या डायनामाईटच्या विक्रीतून अमाप पैसा केलेल्या नोबेलने हा पुरस्कार ठेवलेला असल्याने अंतर्विरोध हा त्याचा स्थायीभाव असा पुन्हा-पुन्हा दिसतो. पण मच्याडोंना हा पुरस्कार मिळाला यापेक्षा, ‘मी आठ युद्ध थांबवली, मला नोबेल शांतता पुरस्कार द्या’ असं निर्लज्जपणे म्हणत देशोदेशी हिंडणार्‍या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पना अखेर नोबेल कमिटीने ठेंगा दाखवला याची चर्चा अधिक झाली. ट्रम्प यांचा स्वभाव पाहाता यांच्या यशापाठीमागे आपणच असल्याचा दावा अजूनही करु शकतात. मारिया यांनी आपला हा...

    पुढे वाचा »

गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

अर्ध्यावरती डाव मोडला...


  • (कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या चरणी हे विडंबन सादर...) भातुकलीच्या खेळामधलीं तात्या आणिक कोणी अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥ तात्या वदला, “मला न कळली, शब्दांविण तव-भाषा घरी पोचतां, पुसिन तेथील, धुरकटलेल्या कोषा (१) ” का कमळीच्या डोळां तेव्हा दाटुनि आले पाणी ? ॥१॥ कमळी वदली बघत एकटक लाल-लाल तो तारा “उद्या पहाटे दुसर्‍या वाटा, तिज्या गावचा वारा” पण तात्याला उशिरा कळली, गूढ अटळ ही वाणी ॥२॥ तिला विचारी तात्या, “का हे हात असे सोडावे ? त्या दैत्याने माझ्याआधी, तूंस असे कवळावे ?” या प्रश्नाला उत्तर नव्हते, कमळी लाजिरवाणी ॥३॥ का कमळीचे तुटले दावे (२) , आज दूर जाताना ? का तात्याचा डाव गंडला, ‘कर’पाशी (२) चुरताना? भ्रमरासम ती उडून गेली, भुलुनी लाल-फुलांनी ॥४॥ - रमताराम --- (१). शब्दकोष (२). या दोनही ठिकाणी श्लेषावर ध्यान असू द्या. ...

    पुढे वाचा »

बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?


  • वृद्धत्वाची जेथ प्रचिती... « मागील भाग --- मागील भागाच्या अखेरीस नेहरुंचा उल्लेख आला आहे, तोच धागा पकडून पुढे जाऊ. जिज्ञासा https://www.istockphoto.com/ येथून साभार. फेसबुकवर एके ठिकाणी कुरुंदकरांनी नेहरुंबाबत लिहिलेला एक उतारा पोस्ट केलेला होता. त्याखाली एका तरुणाने “लेखकाला टॅग करता येईल का? त्याच्या प्रोफाईलवर जाता येईल.” अशी कमेंट केलेली होती. समाजमाध्यमांवर बस्तान बसवून असलेल्या ट्रोलिंग मानसिकतेच्या कुणी एकाने त्याचा स्क्रीनशॉट पोस्ट म्हणून टाकला असता, त्यावर सुमारे शंभरेक जणांनी 'हा: हा:’ अशी प्रतिक्रिया दिलेली पाहिली. ( ‘नेहरु’ असा शब्द वाचूनच हा: हा: करणारे काही त्यात असतील. त्यांना वगळून ) इतक्या सार्‍यांना कुरुंदकर ठाऊक आहेत ही आनंदाचीच बाब आहे. कुरुंदकरांचे, त्यांच्या दृष्टिकोनाचे स्थान माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण असेच आहे. परंतु तरीही कुणाला तरी कुरुंदकर ठाऊक नाहीत याने माझी अस्मिता दुखावत नाही. विचारांना अस्मितेचे देव्हारे नसावेत अशा मताचा मी आहे. या प्रतिसादात हास्यास्पद काही आहे असे मला वाटत नाही. पोस...

    पुढे वाचा »

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

पौरुषाचा कांगावा


  • महाराष्ट्र देशीचे उत्तर भारतीय जामात श्री. विवेक अग्निहोत्री यांनी मराठी वरणभाताला नाके मुरडताना ‘हे कसलं गरीबाचं खाणं. मी दिल्लीचा आहे. तेलाचा थर असणारं तिखट, मांसाहारी खाणं मला आवडतं’ अशी मुक्ताफळे उधळली आणि महाराष्ट्रदेशी संताप उसळला. तांबडा-पांढरा, अख्खा मसूर, वडा-भात, वांगे-भरीत, शेव-भाजी, चकोल्या वगैरेंनी वरणभाताशी असलेली आपली नेहमीची ईर्षा तात्पुरती म्यान करुन त्यांस बाहेरून पाठिंबा देऊ केला. आम्हीही लोणच्यापासून पोह्यांपर्यंत सर्वत्र साखरेचा वर्षाव करणार्‍या जमातीशी तात्पुरते जुळवून घेतले. एकुण महाराष्ट्रदेशी दुर्मीळ असा एकोपा दृश्यमान झाला. मुळात अमुक खाणे हे फार शौर्याचे, तमुक खाणे दुय्यम अभिरुचीचे लक्षण वगैरे विनोदी समज नि त्यातून निर्माण झालेल्या अस्मिता हा केवळ महाराष्ट्रदेशीच नव्हे तर संपूर्ण भरतभूमीमध्ये पसरलेला मानसिक आजार आहे. तो असाध्य असाच आहे. त्यावर कुणाही धन्वंतर्‍याला आजवर उपाय सापडलेला नाही. ‘अमुक गावचा ढमुक पदार्थ टमुक गावातील पदार्थापेक्षा बेष्टं असतो’ हे अत्यंत निर्बुद्ध असे विधान अस्मितेच्या झेंड्यावर मिरवणारे ...

    पुढे वाचा »

बुधवार, १८ जून, २०२५

वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १ : वृद्धत्वाची जेथ प्रचिती...


  • १. वार्धक्याची वाट प्रत्येक माणसाच्या प्रगतीचा आलेख हा दोन टोके धरून थोडे ताणलेल्या इंग्रजी ‘एस’ अक्षरासारखा असतो. लहानपणी परावलंबी काळात ती मंद असते, पौगंडावस्थेपासून ती वेगाने होते आणि एका टप्प्यानंतर, मध्यमवयानंतर तिचा वेग कमी होतो नि माणूस चढण सोडून सपाट रस्त्यावरुन आडव्या दिशेने पुढे सरकत जातो. वृद्धपणी भौतिक नि मानसिक पातळीवर एक स्थैर्यावस्था आलेली असते. पण तरीही भवतालामध्ये, जगण्याच्या बहुतेक पैलूंमध्ये बदल होतच असतात. ते स्वीकारण्यासाठी लागणारी स्वतंत्र बुद्धी आता वृद्धांकडे राहिलेली नसते. त्यांच्याकडची शारीरिक, बौद्धिक पुंजी ही त्यांच्या उदयकाळातील बदलांशी झगडण्यात खर्च झालेली असते. त्यामुळे आता होणारे बदल स्वीकारण्यासाठी गुंतवणूक करावी अशी ऊर्जा त्यांच्याकडे शिल्लक नसते. प्रगतीच्या नव्या वाटा जे बदल घडवून आणत असतात, त्यातून ‘त्यांचे जग’ म्हणता येईल अशी भौतिक, समाजिक, वैचारिक पातळीवरील त्यांची आकलनाची घडी विस्कटत असते. प्रवास करून एका निश्चित ठिकाणी पोहोचण्याची मानसिकता असलेल्या माणसाला, प्रगतीच्या वेगामुळे सतत प्रवासातच असल्...

    पुढे वाचा »

बुधवार, ११ जून, २०२५

काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता


  • (मागच्या पोस्टमध्ये ‘खाण्यावरती बोलू काही’ म्हणून जे बोलायचे ते बोलून घेतले. पण आता असे लक्षात आले की अजूनही थोडे बोलायचे राहिले आहे. एखादा पदार्थ आवडला की पोट भरल्यावरही भूक असल्याची भावना शिल्लक राहाते ना, तसे काहीसे. म्हणून ही खाद्यावरची दुसरी पोस्ट, वेगळ्या वाटेवरून जाणारी.) मराठी काव्यक्षेत्र हे निरंतर फळते-फुलते– काहींच्या मते फसफसते (म्हणजे द्रव कमी नि फेस जास्त) असे क्षेत्र आहे. माझ्या फेसबुक वास्तव्या-दरम्यान दररोज किमान दहा मराठी कवितांचे आगमन होते असा अनुभव आहे. पण अशा संपृक्त जगात जी विषमता दिसते, त्याने आमचे मन नेहेमी विषण्ण असते (१) . अगदी रांगोळी टिंबांच्या कहाण्या, हिमालयाची उशी करुन झोपण्याच्या वल्गना करणार्‍या किंवा कवितेची चूळ थुंकून जगाला भस्म करुन टाकू इच्छिणार्‍या महत्त्वाकांक्षा... वगैरे ‘हायर कविते’चे क्षेत्र तर सोडाच, पारंपरिक काव्यालंकारामध्येही मला ही विषमता चटकन दिसून येते. आता हेच पाहा ना. साधे उपमांचे क्षेत्र फुले, चंद्र, काटे, आदी केवळ दृश्य पैलूंमध्ये बंदिस्त आहे, याचा आम्हाला नेहमी विषाद वाटत आला आहे. माणसाला पंचेंद्रिये असतात (आणि तरीही १४५ कोटी...

    पुढे वाचा »