-
दहा-बारा वर्षांपूर्वी ‘ नारबाची वाडी ’ नावाचा एक मराठी चित्रपट प्रकाशित झाला होता. ‘लोभाहाती माती’ या बाळबोध संस्काराचे हलकेफुलके चित्रपटीय रूप असलेल्या या चित्रपटाची कथा अगदी सरळसोट. एक लहान नातू सोडून कुणीही नसलेल्या नारबा नावाच्या कुण्या एकाची देखणी वाडी पाहून लोभावलेला जमीनदार(खोत) ती बळकावण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्या हयातीमध्ये त्याची ती इच्छा फलद्रूप होत नाही. मग काही वर्षांनी त्याचा मुलगा आपल्या वडिलांची इच्छा पुरी करण्यासाठी नारबाच्या मागे लागतो. नारबा एव्हाना आणखी वयस्कर झाला आहे. ‘आपल्याला जगण्यात काही रस उरलेला नाही. लवकरच वरचे बोलावणे येईल.’ असे तो सतत बोलत असतो. हे ऐकून या धाकल्या जमीनदाराच्या तोंडाला पाणी सुटते. झाडावरुन पिकले फळ टपकन पडावे तसा हा पिकला म्हातारा पडेल, तेव्हा त्याची वाडीही तशीच अलगदपणे आपल्या हाती पडावी… पुढे वाचा »
शनिवार, २५ एप्रिल, २०२६
‘नारबाची वाडी’ , ‘माय ओल्ड लेडी’ आणि हयातहक्काची संकल्पना
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
