Vechit Marquee

सूची: अनुक्रमे  ▶ वर्गीकरण  ▶ लेखमाला  ▶ लक्षवेधी  ◼

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १३ : गरजा, मागणी आणि पुरवठा


  • जठराग्नी शमवाया भूतां « मागील भाग जीवसृष्टीतील प्रत्येक जिवाच्या अन्न आणि निवारा (संरक्षण) या दोन मूलभूत गरजा आहेत नि जुगण्याची प्रेरणा ही जीवसातत्याला चालना देणारी भावना. कोणतीही नवी सामाजिक, राजकीय व्यवस्था प्रस्थापित केली, तरी या दोन गरजांच्या पूर्तीसाठी पुरवठ्याचे व्यवस्थापन तिला करावे लागते. तरच तो समाज नि ती व्यवस्था स्थिर राहू शकते. पुरवठा नव्हे साठा ‘प्लरिबस’मधील समूहजीवी व्यवस्था सर्व सजीवांना अभय देत असल्याने आजवर शेती, नि पशुपालन या दोन मार्गाने आपले अन्न मिळवणार्‍या अर्वाचीन मानवाला पर्यायी मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. या व्यवस्थेमध्ये अन्नाची गरज भागवणारी जी व्यवस्था निर्माण केली गेली आहे, ती दीर्घकाळ उपयोगी ठरणारी नाही. ज्या नव्वद कोटी कलेवरांच्या पुरवठ्यावर ही व्यवस्था अवलंबून आहे, तो साठा आहे, उत्पादन-व्यवस्था नाही. एका मनुष्यप्राण्याचा दैनिक आहार ध्यानात घेतला, तर हा साठा काही दिवसांतच– निदान महिन्यांत संपून जाणार आहे. तसंच प्रत्येक कलेवराला प्रथिनामध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेदरम्यानही काही घट होणार आहे. या दरम्यान त्या साठ्यामध्ये पडणारी ...

    पुढे वाचा »

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १२ : जठराग्नी शमवाया भूतां


  • अद्यतनीकरण (Update) « मागील भाग कुठलेही तत्त्वज्ञान, विचार माणसाला आकर्षक वाटला नि ‘आपण तो स्वीकारला आहे’ असा दावा त्याने केला, तरी त्याच्याकडून तो पूर्णांशाने आत्मसात होतोच असे नाही. त्याच्या वास्तविक, व्यावहारिक जीवनातील काही प्रिय, काही अंगवळणी पडलेल्या, काही आवश्यक गोष्टींचा त्याच्याशी संघर्ष होऊ लागला, की त्याची मनस्थिती द्विधा होते. ‘याच्यासाठी ते सोडवत नाही, की त्याच्यासाठी हे’ अशी संभ्रमित अवस्था होऊन बसते. मग यातून Best of Both असा पर्याय (वा पळवाट) काढण्याची खटपट सुरू होते. आपद्धर्माचा महामार्ग मला ओशोंनी सांगितलेली, बुद्धाशी संबंधित कथा आठवते आहे (१) . बुद्धांनी अहिंसेचा संदेश प्रसृत केल्यानंतर त्याने प्रभावित झालेले अनेक जण त्यांचे अनुयायी झाले. परंतु यात अनेक क्षत्रिय होते. मांसाहार हा त्यांच्या आहाराचा अविभाज्य भाग होता. त्यात अचानक बदल झाल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. अति-उत्तरेकडील हिमाच्छादित भागात राहाणार्‍यांना शाकाहारापेक्षा मांसाहार अधिक सहजपणे उपलब्ध होत असे. या नि अशा कारणांनी जेरीस आलेली काही मंडळी बुद्धांकडे गेली, त्यांना आपली अडचण सां...

    पुढे वाचा »

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ११ : अद्यतनीकरण (Update)


  • नव्या व्यवस्थेकडे « मागील भाग अद्यतनीकरण (Update) संगणक वा स्मार्ट फोन वापरणार्‍यांना ‘अद्यतनीकरण’ (Update) ही संकल्पना चांगलीच माहित झाली आहे. या दोन्ही उपकरणांवर Microsoft Office, WhatsApp, iTunes यांसारख्या विविध प्रणाली असतात. तुम्ही या दोन उपकरणांचा वापर करत असताना अनेकदा तुमचा संगणक वा फोन ‘अमक्या अ‍ॅपचा अपडेट उपलब्ध आहे’ किंवा ‘पुढचे व्हर्शन उपलब्ध आहे’ असा संदेश देत असतो. हे अद्यतनीकरण करण्यास तुम्ही संमती दिली की ती प्रक्रिया आपोआप– तुमच्या हस्तक्षेपाखेरीज पार पाडली जाते. पण हे ही जुने झाले. आता अनेक प्रणाली – विशेषत: browsers – हे तुम्हाला विचारता, तुमच्या माघारी, परस्पर अद्ययावत करून मोकळे होतात. उलट त्यांना तसे करता येऊ नते यासाठी बरेच सव्यापसव्य करावे लागते. बहुतेक वापरकर्ते (Users) हे आळशी असल्याने हे त्यांच्या पथ्यावर पडते. त्यातील धोक्याकडे दुर्लक्ष करुन ते सुखाने काम करत राहातात. https://www.eetimes.com/ येथून साभार. उपग्रह मनोरंजनाच्या (satellite television) जमान्यात तुम्हाला विविध दूरचित्रवाणी वाहिन्या पाह...

    पुढे वाचा »

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १० : नव्या व्यवस्थेकडे


  • सर्वे सुखिन: सन्तु « मागील भाग शिकारजीवी, शेतीजीवी, आणि व्यापारजीवी असे मानवी समाजव्यवस्थांचे प्रमुख टप्पे दिसतात. यातील पहिले दोन अनायासे सहजीवी होते. शिकारजीवी, शेतीजीवी समाजांमध्ये प्रामुख्याने टोळ्यांचा परस्पर-संघर्ष वा स्पर्धा होती, तर व्यापारजीवी समाजाने त्याला आपल्यामध्ये आतच सामावून घेतले. या बदलाने सहभावनेला दुर्बल केले. त्यातून समाज शबल होत गेला. साम्यवादी व्यवस्था तर खर्‍या अर्थाने ‘सर्वे सुखिन: सन्तु’ स्वरूपाची म्हणता येईल, समूह-हिताच्या हेतूने पाहिले तर तिच्यामध्ये न्यून दिसत नाही. तरीही व्यावहारिक पातळीवर तिचा पहिला– श्रमजीवींच्या एकाधिकारशाहीचा– टप्पाही मूळ हेतू साध्य करण्यात यशस्वी झालेला दिसत नाही. शेती नि पशुपालन या दोहोंमार्फत आपले अन्न मिळवू लागलेला मनुष्यप्राण्याला – अगदी मोजक्या वन्यजीवी जमाती सोडल्या तर – शिकारजीवी राहण्याची गरज उरलेली नाही. मानवी इतिहासाच्या प्राचीन अध्यायामध्ये प्रबळ असलेले संग्रह (gather), अपहार (steal) आणि शिकार (hunt) हे तीन जीवनाधार आज अदखलपात्र वा संदर्भानुसार गुन्हेही ठरत आहेत. उत्पादन आणि विनिमयप्रधान समाजामध्ये शेती आणि पशुपालन ...

    पुढे वाचा »