Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
समाजजीवन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
समाजजीवन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १८ मार्च, २०२०

गुलामोपनिषद


  • गुलामाला मालक दोन वेळचे अपुरे जेवण देतो आणि त्याच्याकडून बेदम काम करुन घेतो. ’तुला पैसे दिले तर ती जोखीम तुला सांभाळता येणार नाही, पोटभर जेवलास तर सुस्ती येईल नि काम करता येणार नाही आणि सतत काम केले नाहीस तर तुझे आरोग्य बिघडेल.’ असे मालकाने गुलामाला पक्के पटवून दिलेले असते. कुणी गुलामाला त्याच्या गुलाम असण्याची जाणीव करुन दिली तर उलट, ’अरे उलट इथे दोनवेळच्या अन्नाची शाश्वती आहे. एरवी त्यासाठी किती वणवण’ करावी लागली असती?’ असा प्रतिप्रश्न करतो. कारण आज त्याचे जे जगणे आहे त्याहून चांगले जगणे अस्तित्वातच नाही अशी मालकाने त्याची खात्री पटवून दिलेली असते. इतरांचे स्वातंत्र्य किंवा त्याचेच गुलामीपूर्व आयुष्य हे खरे स्वातंत्र्य नाही, अध:पाताचे जिणे आहे असे त्याचे सांगणे असते आणि गुलामाला ते पुर… पुढे वाचा »

रविवार, ५ जानेवारी, २०२०

संग्राम बारा वर्षांचा आहे...


  • संग्राम बारा वर्षांचा आहे... संग्रामच्या वडिलांची कार एजन्सी आहे, त्यांच्या मालकीचा एक पेट्रोल-पंप आहे, ते बिल्डर आहेत आणि मुख्य म्हणजे ते समाजसेवक आहेत. ’संग्रामराजे प्रतिष्ठान’च्या माध्यमातून त्यांचे समाजकार्य विविध क्षेत्रात चालू असते. संग्राम त्यांना बाबा, डॅड न म्हणता ’दादा’ म्हणतो, कारण आसपासचे सारेच लोक त्यांना दादा म्हणतात. त्यांचा उच्चभ्रू वस्तीमध्ये तीन हजार स्क्वेअर फुटाचा ऐसपैस बंगला आहे. दाराशी दोन एसयूव्ही आणि एक एक्सयूव्ही कार आहे. बंगल्यात दादांचा स्वत:चा बार आहे. आणि दहा बाय दहाचे प्रशस्त देवघरही. दारासमोर पोट खपाटीला गेलेला एक दरवान आहे आणि त्याच्या शेजारी दोन गलेलठ्ठ कुत्रे बांधलेले आहेत. संग्रामच्या वडिलांच्या गळ्यात पाच तोळ्यांची चेन आणि डाव्या हातात सात तोळ्यांचे सोन्याचे कडे आहे. हाताच्या दहा बोटांपैकी सहा … पुढे वाचा »

वेदांग दहा वर्षांचा आहे...


  • वेदांग दहा वर्षांचा आहे... वेदांगचे आईवडील संगणकक्षेत्रात काम करतात. दोघांचे उत्पन्न छाऽन आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये त्यांचा दीड हजार स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आहे. सोसायटीमध्ये लॉन आहे, क्लब हाऊस आहे. सोसायटीच्या दाराशी येणार्‍या जाणार्‍याकडे संशयाने पाहणारा दाराशी दरवान... चुकलो सिक्युरिटी मॅनेजर आहे. सोसायटीमध्ये राहणार्‍यांच्या घरी निरोप देता यावा म्हणून त्या सिक्युरिटी मॅनेजरच्या तीन-बाय-तीनच्या ’केबिन’मध्ये इंटरकॉम आहे. त्यावरुन कोणत्याही फ्लॅटमधून दुसर्‍या फ्लॅटमध्ये बोलणे शक्य असले तरी तसा वापर कुणी करत नाही. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. वेदांगच्या आईबाबांकडे आयफोन आहे. त्याचे नवे व्हर्शन जूनमध्ये येणार आहे. ’ही बातमी शेअर करताना ’फीलींग एक्सायटेड’ असे स्टेटस वेदांगच्या बाबांनी... चुकलो डॅडनी टाकले आहे. वेदांगची मम्मी अजूनही … पुढे वाचा »

शनिवार, ४ जानेवारी, २०२०

‘आठवडी बाजारा’ची मुशाफिरी


  • ( राज कुलकर्णी यांच्या ’आठवडी बाजार आणि समाजजीवन’ या पुस्तकासाठी लिहिलेली प्रस्तावना ) आपल्या देशातील शिक्षणक्रमातील इतिहासाच्या अभ्यासामध्ये प्रामुख्याने राजकीय आणि प्राचीन इतिहासावर भर असतो. जगण्याशी निगडित असणाऱ्या जड वस्तूच्या, आयुधांच्या आणि माणसाच्या जीवनशैलीचा जो अतूट संबंध असतो, त्याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसते. याचे कारण ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये त्या त्या काळचे शासनकर्ते, राज्ये, साम्राज्ये आदींचा सनावळीसह काटेकोर उल्लेख असला, आणि त्याच्या अनुषंगाने सांस्कृतिक इतिहासाची काही पानेही जोडलेली असली, तरी त्या काळी प्रचलित असणाऱ्या वस्तू आणि मनोरंजनादि पैलूंचा वेध घेणाऱ्या जड वस्तूच्या इतिहासाची, विकासाची प्रामुख्याने उपेक्षाच दिसते. क्वचित कुठे असली, तरी विद्यार्थीच काय अभ्यासकांपैकी बहुसंख्य व्यक्तीदेखील त्यांना फार महत्त्व देताना… पुढे वाचा »