Vechit Marquee

सूची: अनुक्रमे ▶ वर्गीकरण ▶ लेखमाला ▶ लक्षवेधी ◼

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १४ : अंत:स्फोटाची अपरिहार्यता


  • गरजा, मागणी आणि पुरवठा « मागील भाग विकासाच्या नावाखाली ज्या बेगुमानपणे निसर्गाचा विध्वंस होतो आहे ते पाहाता, अशी इच्छा कधी कधी तीव्र होते की, “एक प्रचंड प्रलय यावा नि सारी मानवजात नष्ट व्हावी; म्हणजे इतर जीव सुखाने जगू शकतील.” मानवी वंशविच्छेद पण मानवी बुद्धीच्या मर्यादेत अशा सर्वंकष विध्वंसाची सोय ही केवळ बाह्य हल्ल्याद्वारेच - शस्त्राघात, जैविक, रासायनिक वा आण्विक - केली जाऊ शकते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे असा सर्वंकष संघर्ष नि व्यापक विध्वंस व्हायचा, तर किमान दोन समबल असे प्रतिस्पर्धी समोरासमोर यायला हवेत. सारासार विवेकाला उध्वस्त करुन जाईल इतपत सत्तेची, अस्मितेची, असुरक्षिततेची वा उन्मादाची भावना त्यांच्यात ओसंडून वाहायला हवी. ‘समोरच्या टोळीचे संपूर्ण निर्दालन केल्याखेरीज आपण नि आपली टोळी जगूच शकणार नाही’ इतका अतिरेकी विचार इतर सार्‍या पर्यायांची साफ धूळदाण करुन शिल्लक राहायला हवा. खरंतर हा विचार कमी-अधिक प्रमाणात सर्वच समाजरूपी मानवी टोळ्यांमध्ये रुजलेला आहे, त्याला भरपूर खतपाणी घालून प्रमाण तेवढे वाढवावे लागेल. वर उल्लेख केलेल्यांपैकी हत्यार कोणतेही वापरल...

    पुढे वाचा »