-
सामान्यपणे दक्षिण भारताचा इतिहासही धड ठाऊक नसलेले लोक टारझनसारखे छात्या पिटून राष्ट्रभक्ती वगैरेच्या बर्याच बाता मारत असतात. इतिहासामधून आपल्या जातीच्या, धर्माच्या सोयीच्या घटना नि नेते शोधून त्यांच्या जयंत्या, मयंत्या, पुतळे नि देवळे उभी करुन आपल्या संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाच्या ढेकरा- आय मिन डरकाळ्या फोडत असतात. प्रामुख्याने यांच्यातच ’आमच्याच नळाचं पाणी जगभर गेलंय’ या गैरसमजाला देवघरात ठेवून रोज दोन फुलं वाहण्याची पद्धत आहे. वास्तविक संस्कृती नि इतिहास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण इतिहास म्हणतो तेव्हा केवळ राजकीय इतिहास- आणि त्याला जोडून येणारा सामाजिक इतिहासच आपल्याला अभिप्रेत असतो. सांस्कृतिक नि भौतिक इतिहासाचे आपल्याला वावडे असते. शेजार्याच्या घराला, शेजारच्या इमारतींमधील घराला वापरलेल्या विटांची माती कशी आमच्याच परसातली होती … पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
संगीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
संगीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
रविवार, ७ ऑगस्ट, २०२२
आमच्याच नळाचं पाणी जगभर गेलंय
शनिवार, ११ जुलै, २०२०
कला, कलाकार आणि माध्यमे
-
विषयसंगतीमुळे हा लेख ’ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »
मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१६
विनोद दोशी नाट्य महोत्सव - १: शब्देविण संवादु...
-
नाटक किंवा एकुणच सादरीकरणाची कला ही शब्दाधारितच असते असा आपला बहुतेकांचा समज असतो, तो बव्हंशी खराही आहे. अगदी अलिकडे वास्तववादी शैलीशी फटकून राहात ‘एकदिश कथनशैली’ (Linear Narrative) नाकारून, घाट अथवा मांडणीचे (form) अनेक प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य घेत असतानाही शब्दांचे महत्त्व तसेच राहते. पाश्चात्त्यांच्या ‘ऑपेरा’ सारख्या प्रकारात असेल, की आपल्याकडे ज्यांना ‘खेळे’ म्हणून ओळखतात तशा दशावतारी किंवा त्या त्या प्रदेशातील पारंपारिक नाट्यप्रकारातही शब्दांचे वर्चस्व वादातीत असते. शब्दांचे महत्त्व नाकारून, केवळ विभ्रम आणि शारीर हालचालीतून कथा जिवंत करण्याचे काम, आजवर कथकली सारख्या नृत्यप्रकाराने केले आहे. तरीही यात मुद्राभिनयाबरोबरच (expression) मानवी शरीराचा वापर पुरेपूर केला आहे. प्रश्न असा आहे, की आता तो ही किमान पातळीवर आणून सादरीकरण शक्य… पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
आस्वाद,
जिज्ञासानंद,
नाटक,
संगीत,
साहित्य-कला
मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०१४
तसा मी... असा मी, आता मी
-
प्रास्ताविक: काही काळापूर्वी एक जुना मित्र भेटला. तो नि मी पूर्वी बरोबर असताना जसा ‘मी’ होतो तोच त्याच्या डोळ्यासमोर होता. माझी शारीरिक, मानसिक स्थिती, माझी रहाणी, माझ्या आवडीनिवडी, माझी राजकीय सामाजिक मते इ. बाबत आता मी बराच बदलून गेलो आहे याची जाणीव करून देणारी ती भेट होती. मग सहज विचार करू लागलो की हे जे बदल एका व्यक्तीमधे होतात, ‘तसा मी’ चा ‘असा मी’ होतो तो नक्की कसा? काय काय घटक यावर परिणाम करतात. यावर आमचे ज्येष्ठ मित्रांशी थोडे बोलणे झाले. त्यांनी याबाबत सरळ धागाच टाकावा असे सुचवले. या निमित्ताने इतरांनाही स्वतःमधे डोकावून पाहण्याची संधी मिळेल नि त्यातून आदानप्रदान होईल ज्यातून काही नवे सापडेल, आपले आपल्यालाच काही अनपेक्षित सापडून जाईल असा आमचा होरा आहे. त्याला अनुसरून लेख लिहा… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)



