-
विषयसंगतीमुळे हा लेख ’ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
आस्वाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
आस्वाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०
बुद्धिबळातील मार्शल-आर्ट
सोमवार, ३० एप्रिल, २०१८
This, is us!
-
विषयसंगतीमुळे हा लेख ‘ वेचित चाललो... ’ वर हलवला आहे. थोडे संस्करण केलेला हा लेख 'जीवनाचे पोर्ट्रेट या शीर्षकाखाली इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »
मंगळवार, १० एप्रिल, २०१८
सीसल आणि ससुल्या
-
तुम्ही कार्टुन्स पाहता की नाही ठाऊक नाही. ‘वॉर्नर ब्रदर्स’च्या प्रसिद्ध बग्स बनी या पात्राचा सर्वात पहिल्या एपिसोडमध्ये ससा-कासवाच्या त्या प्रसिद्ध शर्यतीची कथा सांगितली होती. ‘बग्स बनी’ला मूळ कथा आधीच माहीत असल्याने, कुठेही विश्रांती घ्यायची नाही असे ठाम ठरवून, ते साध्यही करतो. पण तरीही बिचारा ती शर्यत हरतोच ... ...त्याचे कारण असतो तो सीसल नावाचा चलाख टर्टल, ज्याच्याशी बग्सने शर्यत लावलेली असते. या सशाला दोन कासवांमध्ये काही फरक चटकन दिसत नसल्याचा फायदा घेत, शर्यतीच्या वाटेवर एकुण दहा कासवे उभी केलेली असतात. ‘कितीही वेगाने धावलो, कासवाला मागे टाकले तरी, पुढे जावे तो कासव पुन्हा आपल्या पुढेच’ पाहून बग्सला हे कसे घडते ते कळत नाही. शक्य तितका वेग वाढवत तो अंतिम रेषा पार करतो. बघतो तर सीसल … पुढे वाचा »
Labels:
आस्वाद,
चलच्चित्रे,
जिज्ञासानंद,
संस्कृती,
समाज
सोमवार, ५ मार्च, २०१८
प्रेम कुणावरही करावं
-
विषयसंगतीमुळे हा लेख ‘ वेचित चाललो... ’ वर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »
शनिवार, २५ नोव्हेंबर, २०१७
ओझ्मा आणि वेदनेची वाट
-
विषयसंगती ध्यानात घेऊन, काही अधिक भर घालून, हा लेख ‘ परीकथा आणि वेदनेची वाट ’ या शीर्षकासह ‘ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. - oOo - पुढे वाचा »
शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७
‘कट्यार काळजात घुसली’ - एक दृष्टिक्षेप (उत्तरार्ध) : रत्नजडित पण बिनधारेची कट्यार
-
सेरिपी « मागील भाग --- ‘कट्यार...’ नाटकाबद्दल बाबत बोलताना प्रामुख्याने त्यातील व्यक्तिरेखांचा विचार मागील भागात केला आहे. आता याच व्यक्तिरेखा चित्रपटात कशा येतात ते पाहणे रोचक ठरेल. पण सुरुवातीलाच हे स्पष्ट केले पाहिजे, चित्रपटाचे नाव नि कथानकाचा गाभा तोच असला, तरी चित्रपट ही एक स्वतंत्र कलाकृती आहे हे अमान्य करता येणार नाही. तेव्हा ‘नाटकात जे आहे ते इथे का नाही, किंवा चित्रपटात नव्याने जे आले आहे ते का आले आहे?’ हे दोन प्रश्न गैरलागू आहेत. ते चित्रपटकथा-लेखकाचे स्वातंत्र्य मान्य करायला हवे. परंतु दोन्हींमध्ये जे सामायिक आहे, त्याची तुलना मात्र करणे शक्य आहे नि न्याय्यही. चित्रपटात सामान्य प्रेक्षकासाठी बरेच रंग गडद करावे लागतात हे मान्य. पण चित्रपटात गडदच काय पण भडक करून, वर पात्रांची नि कथानकांची संपूर्ण मोडतोड केली आहे. इतकी की … पुढे वाचा »
‘कट्यार काळजात घुसली’ - एक दृष्टिक्षेप (पूर्वार्ध) : सेरिपी
-
अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणार्या कौशल्यांनंतर माणसाने सर्वप्रथम विकसित केलेले कौशल्य असावे ते गाण्याचे. मनोरंजनाचे दालन माणसाने सर्वप्रथम खुले केले ते गाण्याचे दार उघडूनच. एखादे आवडते गाणे, आवडती धून गुणगुणला नाही असा माणूस सापडणे दुर्मिळ. अगदी आपला आवाज बेसूर आहे हे पक्के ठाऊक असलेली माणसेही, निदान बाथरुममध्ये तरी – जिथे समोर कुणी नसल्याने भिडस्तपणा आड येत नाही – अधेमधे आपला गळा तासून पाहतात. असा सुरांचा मोहक दंश जर योग्य वयात झाला, तर त्या डसण्यातून जी बाधा होते, ती अलौकिक अशीच असते. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातल्या सदाशिवला तो सूर सापडतो ‘पंडित भानुशंकरां’च्या गाण्यातून. त्या सुरांनी वेड लावलेला तो दहा-बारा वर्षांचा मुलगा, त्यांच्या अनुपस्थितीतही अनेक वर्षे सांभाळून ठेवतो, आणि अखेर घरच्या जबाबदारी… पुढे वाचा »
सोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६
विनोद दोशी नाट्य महोत्सव - २: मै हूँ युसुफ और ये है मेरा भाई
-
त्या लहानशा गावात लोक अनेक पिढ्यांपासून राहात आहेत. गावाने अनेक उंबर्यांच्या अनेक पिढ्या पाहिल्या आहेत. गावातल्या प्रत्येकाला केवळ तिथे जन्मलेल्याच नव्हे, तर लग्न करून गावात आलेल्या सासुरवाशिणीच्याही चार पिढ्यांचा इतिहास ज्ञात आहे. केस पिकलेल्या, दातांचं बोळकं झालेल्या गावच्या वृद्धांना, गावाच्या रस्त्यांवर नि मैदानावर बागडणार्या सार्या पोरासोरांच्या जन्माची गाणी अजून याद आहेत. इथे जन्मलेल्या आणि मातीस मिळालेल्या समवयस्कांच्या मजारीवर त्यांनी आपल्या हाताने मूठ मूठ माती टाकली आहे. गावात भांडणतंटे, रुसवेफुगवे आहेत, तसेच त्यात मध्यस्थी करून तड लावणारे बुजुर्गही आहेत. ‘अशा तर्हेने ते सुखासमाधानाने नांदत होते’ असे परीकथेतले वास्तव नसले, तरी नांदत्या उंबर्यांचे ते गाव ही एक जिवंत परिसंस्था आहे. अचानक एक दिवस बातमी आली. गावाशी काडीचा संबं… पुढे वाचा »
Labels:
आंतरराष्ट्रीय,
आस्वाद,
जिज्ञासानंद,
नाटक,
राजकारण,
समाज,
साहित्य-कला
मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१६
विनोद दोशी नाट्य महोत्सव - १: शब्देविण संवादु...
-
नाटक किंवा एकुणच सादरीकरणाची कला ही शब्दाधारितच असते असा आपला बहुतेकांचा समज असतो, तो बव्हंशी खराही आहे. अगदी अलिकडे वास्तववादी शैलीशी फटकून राहात ‘एकदिश कथनशैली’ (Linear Narrative) नाकारून, घाट अथवा मांडणीचे (form) अनेक प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य घेत असतानाही शब्दांचे महत्त्व तसेच राहते. पाश्चात्त्यांच्या ‘ऑपेरा’ सारख्या प्रकारात असेल, की आपल्याकडे ज्यांना ‘खेळे’ म्हणून ओळखतात तशा दशावतारी किंवा त्या त्या प्रदेशातील पारंपारिक नाट्यप्रकारातही शब्दांचे वर्चस्व वादातीत असते. शब्दांचे महत्त्व नाकारून, केवळ विभ्रम आणि शारीर हालचालीतून कथा जिवंत करण्याचे काम, आजवर कथकली सारख्या नृत्यप्रकाराने केले आहे. तरीही यात मुद्राभिनयाबरोबरच (expression) मानवी शरीराचा वापर पुरेपूर केला आहे. प्रश्न असा आहे, की आता तो ही किमान पातळीवर आणून सादरीकरण शक्य… पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
आस्वाद,
जिज्ञासानंद,
नाटक,
संगीत,
साहित्य-कला
मंगळवार, १ डिसेंबर, २०१५
काजळवाट
-
विषयसंगती ध्यानात घेऊन ही पोस्ट ‘ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवली आहे. ती ‘ इथे ’वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »
सोमवार, १० ऑगस्ट, २०१५
जग दस्तूरी रे...
-
विषयसंगती ध्यानात घेऊन हा लेख ’ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. . - oOo - पुढे वाचा »
गुरुवार, ३० जुलै, २०१५
जावडेकरांची ‘गेम’
-
विषयसंगती ध्यानात घेऊन हा लेख ‘ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »
गुरुवार, ९ एप्रिल, २०१५
‘सायलेंट मोडमधल्या कविता’: नव्या जाणिवांची विचक्षण कविता
-
गेल्या पंचवीस-एक वर्षांचा काळ हा आपल्या जीवनात अनेक आमूलाग्र बदल घडवणारा ठरला. नव्वदीच्या दशकात बंदिस्त व्यवस्थेच्या काही खिडक्या उघडल्या जाऊन ‘जागतिकीकरण’ या नव्याच व्यवस्थेने या देशात हातपाय पसरायला सुरुवात केली. या बदलाचा एक मोठा भाग व्यापला तो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीने. गेल्या शतकाच्या अखेरच्या दशकात आपल्या दारी आलेल्या संगणकाने, आणि या शतकाच्या सुरुवातीपासून आपल्या हाताला जणू सहावे बोट असावे असा चिकटून राहू लागलेला ‘मोबाईल’ या दोन महत्त्वाच्या आयुधांनी आपल्या जगण्याचे आयाम बदलले, व्याप्ती बदलली. जुन्या व्यवस्थेच्या पाईक असलेल्यांना हे बदल कुठे रुचेनासे झाले, ‘माणसे -मोबाईल नि संगणकावर - खूप बोलू लागली आणि संवाद कमी झाला’ असा आक्षेप या नव्या जीवनपद्धतीवर घेतला जाऊ लागला. पण या पलिकडे जाऊन तंत्रज्ञानाने माणसाच्या … पुढे वाचा »
Labels:
‘परिवर्तनाचा वाटसरु’,
आस्वाद,
पुस्तक,
साहित्य-कला
शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०१४
अंडा हॉल्ट
-
रमापद चौधुरीची कथा वाचत होतो... रेल्वे लाईनवरचं कुणी एक गाव, गावाजवळ लहानसं स्टेशन. स्टेशनचं नि गावाचं नाव महत्त्वाचं नाही कारण तो रेल्वेचा स्टॉप ‘अंडा हॉल्ट’ म्हणूनच प्रसिद्ध. गाव तसं चार गावांसारखं, मुख्य रोजगार शेतीच. पण गावात सार्यांकडेच कोंबड्या. युद्ध सुरू झाल्यापासून युद्धकैद्यांची वाहतूक करणार्या गाड्या ये-जा करू लागल्या नि गावाला नवा रोजगार मिळाला, युद्धकैद्यांसाठी ब्रेड-अंड्यांचा ब्रेकफास्ट तयार करण्याचा! गाडी येण्याच्या आदल्या दिवशी रात्री गावची सारी अंडी जमा करून उकडून तयार ठेवायची नि गाडी येतात सार्या युद्धकैद्यांना तो ब्रेकफास्ट द्यायचा हे काम. एके दिवशी त्या युद्धकैद्यांवर पहारा करणार्या सैनिकाने खुश होऊन एक अधेली भिरकावली, युद्धकैद्यांना कुतूहलाने पहायला आलेल्या गावकर… पुढे वाचा »
मंगळवार, २२ जुलै, २०१४
‘मी...ग़ालिब’ ला भेटताना...
-
मिर्ज़ा असदुल्ला ख़ान ग़ालिब! आपण अस्सल तुर्की वंशाचे आहोत असा अहंकारमिश्रित समज असलेला, नबाबाच्या घराण्यात जन्मलेला आणि त्यामुळेच जगण्यासाठी कमवावे लागते याची गंधवार्ता नसलेला. आपद्धर्म म्हणून चाकरीसाठी, उमेदवारीसाठी गोर्या मित्राच्या दारी जातानाही नबाबाला मिळणारा आदरसत्कार मिळावा असा अस्थानी अहंकार बाळगणारा, सांसारिक पातळीवर सुमार देहसौंदर्य नि सुमार विचारक्षमता असलेली पत्नी लाभल्याने भावनिक पातळीवर वंचित राहिल्याची अनुभूती घेणारा, दरबारी राजकारणापासून दूर राहू पाहात असतानाही त्यात ओढला जाऊन– दुर्दैवाने नेहेमीच चुकीच्या बाजूला राहणारा, आणि तरीही आज दीडशेहून अधिक वर्षे आपले अढळपद राखून असलेला प्रतिभावंत. ‘नाटक कंपनी’ च्या अधिकृत संस्थळावरुन साभार. ग़ालिबचे आयुष्य हे समकालीनांच्या तसेच अ… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)














