Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
संख्याशास्त्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संख्याशास्त्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ५ एप्रिल, २०२०

‘प्रिन्सेस डायमंड’च्या डायरीतून ‘कोविड-१९’


  • ‘जॉन्स हॉपकिन्स युनिवर्सिटी’चा कोविड-१९ संबंधी माहिती देणारा डॅशबोर्ड पाहात होतो. कोणत्या देशांत किती रुग्ण आहेत हे पाहताना त्या यादीत अचानक ’डायमंड प्रिन्सेस’ हे नाव पाहिले की बुचकळ्यात पडलो. या देशाचे नावही कधी ऐकले नव्हते. अधिक शोध घेता हा देश नव्हे तर खासगी क्रूझ आहे असे समजले. जेमतेम एक हजारच्या आसपास कर्मचारी आणि सुमारे २७०० उतारू असलेल्या या क्रूझवर तब्बल ७१२ लोकांना लागण झालेली होती. त्यातले ५१२ विषाणूमुक्त झाले तर १० जण दगावले असे हॉपकिन्सचा डॅशबोर्ड सांगतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर लागण झाल्यानेच त्या क्रूझचे नाव देशांच्या यादीत समाविष्ट करावे लागले. हा एक अनोखा अपवाद आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली लागण हे एकच कारण आहे असे मात्र नाही. असा अपवाद समोर असलेल्या समस्येबद्दल काही इनसाईट देऊन जातो आहे. एखाद्या मोठ्या भूभागावर … पुढे वाचा »

रविवार, ४ डिसेंबर, २०१६

सर्वेक्षणांचे गौडबंगाल


  • कार्ल मार्क्सचा सहाध्यायी फ्रेडरिक एंगल्सने एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर इंग्लंडमधील कामगार वर्गाच्या दारुण अवस्थेवर प्रकाशझोत टाकणारा अहवाल लिहून समाजनिर्मितीत सर्वेक्षणावर आधारित मूल्यमापन पद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले. आजची प्रस्थापित व्यवस्था संख्याशास्त्राचे नियम आणि मूल्यमापन पद्धती धुडकावत, जनमत स्वत:च्या बाजूने वळवण्याचे डावपेच रचत आहे. नोटाबंदीनंतर सर्वेक्षणांतून झालेले फसव्या जगाचे दर्शन हे त्याचेच द्योतक आहे... --- वृत्तपत्रे, चॅनेल्स, इन्टरनेट पोर्टल्स यांच्यामार्फत अनेक सर्व्हे घेण्यात येतात. उदा. ‘सलमान खान दोषी आहे असे तुम्हाला वाटते का?’ किंवा ‘अमीर खान असहिष्णुतेबद्दल जे म्हणाला त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का?’ वगैरे. त्याचे निकालही लगेच लाईव्ह दिसत असल्याने, आपले मत बहुसंख्येबरोबर गेले किंवा नाही हे ही लगेच तपासता येते… पुढे वाचा »