-
दर महिन्याच्या अखेरीस मी ब्लॉगचा आढावा घेत असतो. पोस्ट, ड्राफ्ट्स वगैरेसह मी तिथे वाचक-राबता कसा आहे हे ही पाहात असतो. मागील महिन्यात माझ्या ‘वेचित चाललो...’( vechitchaalalo.blogspot.com ) या ब्लॉगवर वाचक-राबता प्रचंड वाढला आहे असे दिसून आले. पहिली प्रतिक्रिया ‘व्वा: आपला ब्लॉग बरेच लोक वाचू लागलेले दिसतात.’ अशी होती. पण नंतर असे दिसले की एरवी सरासरी मासिक वाचनांच्या जवळजवळ दहापट वाचने झाली आहेत. हे अजिबात संभाव्य नाही असे माझे मत आहे. कारण एकतर ब्लॉग मराठीमधून, त्यात जेमतेम दीड-एकशे पोस्ट्स. इतक्या वेगाने वाचायचे म्हणजे काही हजारात लोक इकडे वळायला हवेत. हे अशक्यच आहे. थोडे खणल्यावर लक्षात आले अगदी दर तीन ते पाच मिनिटाला एक या वेगाने हिट्स मिळत आहेत. मग डोक्यात प्रकाश पडला, की कुणीतरी बॉट(BOT) लावून ठेवलेला दिसतो. … पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
माहिती तंत्रज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
माहिती तंत्रज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शनिवार, ८ जुलै, २०२३
बॉटासुराचा उदयास्त
Labels:
अनुभव,
जिज्ञासानंद,
ब्लॉग,
माहिती तंत्रज्ञान
रविवार, २४ मे, २०२०
राष्ट्रवादाचा ‘तंत्र’मार्ग
-
यापूर्वीच्या निवडणुका आणि २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुका यांत एक महत्त्वाचा फरक आहे; तो म्हणजे यांत झालेला इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये एका बाजूने वृत्तवाहिन्या येतात, तसेच इंटरनेटच्या माध्यमांतील संकेतस्थळे, फेसबुक आणि ट्विटरसारखी समाजमाध्यमे, मोबाइल व त्यावरील व्हॉट्सअॅपसारखी संवादी माध्यमे या साऱ्यांचा समावेश होतो. या सर्व माध्यमांतून मोदींच्या खऱ्या-खोटय़ा यशोगाथांचा, काँग्रेसच्या खऱ्या-खोटय़ा पापांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी एक सूत्रबद्ध यंत्रणा उभी करण्यात आली होती. जी कमालीची यशस्वी ठरली. यात अधिकृत माध्यमांमधील प्रतिनिधी होते, तसेच समाजमाध्यमांमध्ये मोदींचा किल्ला लढवणारे स्वयंसेवकही. ही यंत्रणा उभी करण्यामागचे मेंदू व हात आणि त्या यंत्राचे इतर भाग यांचा आढावा रोहित चोप्रा यांनी ‘द व्हर्च्युअल हिंदू र… पुढे वाचा »
Labels:
‘लोकसत्ता’,
धर्मव्यवस्था,
पुस्तक,
माहिती तंत्रज्ञान,
राजकारण,
समाजमाध्यमे
रविवार, २२ मार्च, २०२०
जग जागल्यांचे ०५ - नैतिक तंत्रभेदी: सॅमी कामकार
-
कॅथरीन बोल्कोव्हॅक « मागील भाग --- दहा वर्षांचा असताना त्याला पहिला संगणक मिळाला. इंटरनेटवर भ्रमंती चालू असताना कुणीतरी धमकी देऊन त्याचा संगणक बंद पाडला. तो हादरला. पण ’जर समोरचा हे करु शकत असेल, तर मी ही करु शकतो’ या जिद्दीने कामाला लागला. इतर कुणाचा अधिकार असलेले, मालकीचे असलेले संगणक अथवा संगणक-प्रणाली यांच्यात परस्पर बदल करणे याला संगणकाच्या भाषेत ’हॅक’ करणे म्हटले जाते. टीन-एजर असतानाच तो वेगवेगळी सॉफ्टवेअर, गेम्स ’हॅक’ करुन आपल्याला हवे तसे बदल करु लागला. असे असले तरी सुरुवातीला त्याने इतर कुणाच्या संगणकाला धक्का लावलेला नव्हता. वयाच्या विशीत पोचल्यावर त्याने गंमत म्हणून हा प्रयोग करायचे ठरवले. तरुणाई आणि सोशल मीडिया हे नाते तेव्हा मूळ धरु लागले होते. आजच्या फेसबुक’सारख्या ’मा… पुढे वाचा »
रविवार, २४ नोव्हेंबर, २०१९
ऑनलाईन शॉपिंग आणि स्थानिक विक्रेते
-
--- फेसबुकवर सचिन डांगे यांनी केलेली पोस्ट: दहा वर्षांपूर्वी फ्रीज विकत घ्यायला एका इलेक्ट्रोनिकच्या दुकानात गेलो होतो. काहीतरी 5-स्टार असणारा फ्रीज पसंत केला आणि पैसे देऊन विकत घेतला. पण त्या दुकानदाराने घरी पाठवलेला फ्रीज 4-स्टार चा होता... तडक दुकान गाठले, त्याला पावती दाखवली आणि तक्रार केली तर वस्तू घेईपर्यंत जी-हुजुरी करून गोडगोड बोलणारा दुकानदार आता नीट वागत नव्हता. झालेली चूक मान्यही केली नाही.. 5-स्टार वाला फ्रीज नव्हता म्हणून 4वाला पाठवला, त्याला काय होतेय..इत्यादी.. त्याची किंमत पाचशे रुपये कमी होती, तेवढे परत दिले. वागणूक अशी की जसा मी त्या दुकानात हजर आहे की नाही.. फ्रीज घेतला, डिलिवरी झाली आणि हम आपके है कौन... अशा प्रकारचे अनुभव भरपूर लोकांनी घेतले असतील... डिलिवरी झाल… पुढे वाचा »
गुरुवार, २६ जुलै, २०१८
फुकट ते पौष्टिक...?
-
मोबाईलवर आपल्या पासवर्डसची फाईल तयार करून ठेवणार एक महान सीए मला ठाऊक आहे. आपल्या नातेवाईकांचे, मित्रांचे वाढदिवस, कौटुंबिक नाती, इत्यादि सारी माहिती हौसेने फेसबुक, तसंच Google contacts मध्ये भरून, आपल्या सोबत इतरांचाही बाजार उठवणारे महाभाग अनेक आहेत. एवढं पुरेसं नाही म्हणून आपली शाळा, बँक, आता या क्षणी कुठे आहोत, वगैरे कौतुकाने शेअर करुन आपल्या पायावर धोंडा मारून घेणारे, तर वारूळातील मुंग्यांप्रमाणे अगणित आहेत. त्यांच्यासाठी हे दोन अनुभव. --- गुगलची घुसखोरी : काही महिन्यांपूर्वी ‘अमेजन फायर टीव्ही’ स्टिक आणली. अलीकडेच ‘यंग शेल्डन’ या मालिकेचा सीझन संपल्यामुळे तिच्या ऐवजी पाहण्यासाठी म्हणून ‘अमेजन प्राईम’वर एखाद्या विनोदी मालिकेचा शोध घेत होतो. त्यातून ‘सिटीजन खान’ (इंटरनॅशनल चित्रपट पा… पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
जिज्ञासानंद,
माहिती तंत्रज्ञान,
विश्लेषण,
समाज,
Business
गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५
आभासी विश्व आणि हिंसा
-
ज्याने कुणी इंटरनेटला Virtual World (याचा ‘आभासी विश्व’ असा अतिशय वाईट अनुवाद केला जातो) असा शब्द प्रथम वापरला त्याच्या कल्पनाशक्तीला दाद द्यायला हवी. ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस उगवलेल्या ‘वर्ल्ड वाईड वेब’ या संकल्पनेतून केवळ एकाच भूभागावरचे नव्हे तर जगभरात पसरलेले संगणक परस्परांना जोडण्याची सोय झाली. त्यातून कल्पनांचा विस्फोट झाला आणि माणसाचे जग त्याने उलटे पालटे करून टाकले. या इंटरनेटने एका बाजूने माणसाला आजवर कधीही सापडले नव्हते असे प्रचंड व्याप्ती असलेले ‘माध्यम’ दिले तर दुसरीकडे थेट एक मानवनिर्मित, कृत्रिम असे ‘विश्व’च निर्माण केले. आज माणसाच्या जगातील माहितीशी निगडित बहुसंख्य जबाबदार्या हे माध्यम जग लीलया पेलून धरते आहे, तर हे नवे विश्व माणसाच्या अद्याप विकसितही न झालेल्या पैलूंना नवी क्षितीजे प्रदान करते आहे. या नव्या माध्यमाने… पुढे वाचा »
Labels:
‘पुरोगामी जनगर्जना’,
जिज्ञासानंद,
माहिती तंत्रज्ञान,
समाज,
हिंसा
शनिवार, १२ सप्टेंबर, २०१५
नासा म्हणे आता
-
या महिन्यात एक अश्मखंड पृथ्वीवर आदळून पृथ्वीवरील बरीच मानवसृष्टी नष्ट होणार आहे असं ‘नासा’च्या सूत्रांनी जाहीर केले आहे. त्यातून जे वाचतील त्यांना नोव्हेंबरमधे पंधरा दिवसांची रात्र अनुभवायला मिळणार आहे! नासाने मर्मेड्स अथवा मत्स्य-स्त्रीच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब केले आहे. चेर्नोबिलनंतरच्या किरणोत्साराचा मागोवा घेताना शेणाने सारवलेल्या एका झोपडीत शून्य किरणोत्सार असल्याचे पाहून, नासाच्या आण्विक संशोधकांनी गायीच्या अलौकिकत्वाबद्दल गौरवोद्गार काढले होते. नासाच्या उपग्रह अभ्यास केंद्राने भारत नि श्रीलंकेला जोडणारा रामसेतू आहे हे सिद्ध केले आहे. नासानेच भारतीय शिक्षणपद्धतीचा बारकाईने अभ्यास करून ती जगात सर्वात श्रेष्ठ असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. … पुढे वाचा »
रविवार, १८ एप्रिल, २०१०
नागर-गप्पा
-
तुम्हाला बिल गेट्सने पैसे दिले का? दचकलात का? अहो पण दचकायला काय झालं? एक-दोन वर्षापूर्वी मी तुम्हाला एक ढकलपत्र नव्हते का धाडले, ज्यात आपला (हो निदान पैसे देतोय तर आपला म्हणायला काय हरकत आहे) बिल त्याचे पैसे वाटून टाकणार आहे असे म्हटले होते? मला नाही मिळाले अजून म्हणून म्हटलं इतर कोणा कोणाला मिळालेत ते विचारावे. असो. थट्टेचा भाग बाजूला ठेवू या. पण माझी खात्री आहे हे ढकलपत्र प्रत्येक इ-मेल-पत्ताधारी व्यक्तीला किमान एकदा (पॉइंट टू बी नोटेड. मला किमान पाच जणांकडून आले... काय पण शेजार आहे नाही! ) तरी मिळालेच असणार. आणि कदाचित 'I know the truth, but just in case... ' असे म्हणत पुढे ढकललेही असेल, हो ना? माझ्या एका केरळी गणितविभाग-प्रमुख (म्हणजे मराठीत HOD हो) मित्राने प्रथम पाठवले. आणि त्याच्या 'cc' मध्ये जवळजवळ सव्वाश… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)