-
रानिया - एक मॉडर्न आणि मॉडेल राज्ञी << मागील भाग दरवर्षी ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा झाली की वार्षिक वादंगांचे फड रंगतात. कुणाला शासनाची हांजी हांजी करण्याबद्दल पुरस्कार मिळाला, कुणाची लायकीच नव्हती, दुसरेच कुणी लायक कसे होते, याची हिरिरीने चर्चा सुरू होते. माध्यमांतून दिसणार्या लोकांभोवती ही चर्चा बहुधा फिरत राहते. पण या यादीत दरवर्षी काही अपरिचित नावेही दिसतात. ते कोण याचा शोध घेण्याची तसदी आपण बहुधा घेत नाही. विशेष म्हणजे ही नावे बहुधा पर्यावरण, जलसंधारण, मूलभूत वा शाश्वत विकास या सर्वसामान्य माणसाच्या जगण्याला पायाभूत असूनही, तुम्हा आम्हाला काडीचा रस नसलेल्या क्षेत्रातील असतात असा अनुभव आहे. यांच्याकडे फारसे लक्ष द्यावे असे माध्यमांना वाटत नाही याचे कारण म्हणजे यात ‘ब्रेकिंग न्यूज’ नसते; सर्वसामान्यांना वाटत नाही कारण आ… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
‘पुरोगामी जनगर्जना’ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
‘पुरोगामी जनगर्जना’ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शुक्रवार, ८ एप्रिल, २०१६
ऐलपैल - ४ : जमिनीलगतची उंच माणसे
Labels:
‘पुरोगामी जनगर्जना’,
ऐलपैल,
प्रासंगिक,
व्यक्तिमत्व,
समाज
मंगळवार, ८ मार्च, २०१६
ऐलपैल - ३ : रानिया - एक मॉडर्न आणि मॉडेल राज्ञी
-
क्यूबा: जागतिक आरोग्यसेवेचे रोल मॉडेल << मागील भाग जानेवारी महिन्यात फ्रेंच नियतकालिक ‘चार्ली हेब्दो’ने एक व्यंगचित्र प्रकाशित केले. त्यात त्यांनी ‘अलान कुर्दी’ या भूमध्य समुद्रात जलसमाधी मिळालेल्या तीन वर्षाच्या सीरियन निर्वासिताबद्दल अश्लाघ्य टिपणी केली होती. हा तोच अलान होता, ज्याच्या समुद्रकिनारी वाळूत विसावलेल्या मृतदेहाचे छायाचित्र गेल्या सप्टेंबर महिन्यात जगभर पसरले आणि देशोदेशीच्या शांततावाद्यांना झडझडून जागे केले होते. हे ‘चार्ली हेब्दो’ तेच होते ज्याच्या कार्यालयावर इस्लामी माथेफिरुंनी हल्ला करून त्यांच्या अकरा सदस्यांना ठार मारले होते. त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेल्या शांततावादी समाजाला या निमित्ताने त्यांनी तोंडघशी पाडले आणि जगात शांततावादी, स्वातंत्र्यवादी कि… पुढे वाचा »
Labels:
‘पुरोगामी जनगर्जना’,
आंतरराष्ट्रीय,
जिज्ञासानंद,
राजकारण,
व्यक्तिमत्व,
समाज
शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१६
ऐलपैल - २ : क्यूबा: जागतिक आरोग्यसेवेचे रोल मॉडेल
-
आइसलँडः जागतिकीकरण, एक बेट आणि एक धडा << मागील भाग ‘आईकडून गर्भाकडे होणारे एचआयव्ही आणि सिफिलिस संक्रमण यशस्वीपणे रोखणारा क्यूबा हा जगातील पहिला देश’ ठरल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मागच्या वर्षी (२०१५) जाहीर केले, आणि कॅरेबियन समुद्रातील हे लहानसे बेट अचानक प्रकाशझोतात आले. इतर काही देश जरी हे उद्दिष्ट गाठलेले– वा गाठण्याचा स्थितीत असले, तरी अमेरिकेच्या परसात असलेला आणि सातत्याने अमेरिकेची वक्रदृष्टी सहन करत आलेला, कम्युनिस्ट एकाधिकारशाही असलेला देश हे साधतो, हा अनेकांच्या दृष्टिने मोठा धक्का होता. सनसनाटी बातम्यांच्या शोधात असणार्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांची दृष्टी, जरी या निमित्ताने प्रथमच या देशाकडे वळली असली, तरी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात क्यूबाचे नाव त्यापूर्वी एक दोन दशकांपासूनच ऐकू येऊ लागले होते. कॅरॅबियन समुद्रात बहा… पुढे वाचा »
Labels:
‘पुरोगामी जनगर्जना’,
आंतरराष्ट्रीय,
आरोग्यव्यवस्था,
ऐलपैल,
जिज्ञासानंद
गुरुवार, १४ जानेवारी, २०१६
ऐलपैल - १ : आइसलँडः जागतिकीकरण, एक बेट आणि एक धडा
-
इंग्लंड आणि ग्रीनलंडच्या यांच्या मधोमध उत्तर अटलांटिक आणि आर्क्टिक समुद्राच्या सीमेवर वसलेले आईसलँड हे एक बेट. महाराष्ट्राच्या सुमारे एक-तृतीयांश इतके क्षेत्रफळ, आणि जेमतेम तीन लाख लोकसंख्येचा देश. युनोच्या ‘ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स’नुसार १३ वा, तर दरडोई उत्पन्नाच्या दृष्टीने जगात १६व्या क्रमांकाचा देश! या देशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हटले तर तो आपली ऊर्जेची जवळजवळ संपूर्ण गरज ही केवळ जलविद्युत आणि भू-ऊर्जा या दोन पर्यावरणपूरक ऊर्जांच्या माध्यमातून भागवतो . आर्थिकदृष्ट्या सुस्थिर असलेल्या या देशाने नव्वदीच्या दशकात खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. याचाच एक भाग म्हणून बँकांवरील सरकारी नियंत्रण पूर्णपणे उठवण्यात आले. आईसलँडचा आर्थिक व्यवहार बव्हंशी ज्यांमध्ये एकवटला होता, त्या ग्लिटनर, लँड्सबँ… पुढे वाचा »
Labels:
‘पुरोगामी जनगर्जना’,
अर्थकारण,
आंतरराष्ट्रीय,
ऐलपैल,
जिज्ञासानंद,
राजकारण,
समाज
शनिवार, १९ डिसेंबर, २०१५
व्यवस्थांची वर्तुळे
-
आपल्या देशात ‘धर्म मोठा की देश?’ हा मिलियन डॉलर नव्हे, बिलियन-ट्रिलियन डॉलर प्रश्न आहे. समाजातील काही गट हा प्रश्न आपल्या विरोधकांना वारंवार विचारत असतात, कारण तो त्यांना अडचणीचा असतो, निरुत्तर करणारा असा यांचा समज असतो. पण जे हा प्रश्न विचारतात, त्यांना स्वतःलाही अनेकदा याच प्रश्नाला सामोरे जावे लागते. अशा अडचणीच्या वेळी ते हमखास ‘त्यांनी तसे मान्य केले तर आम्ही मान्य करू’ असे म्हणत आपली शेपूट सोडवून घेताना दिसतात. पण याचाच एक अर्थ असा की आपल्या नि ‘त्यांच्या’ कृतीत गुणात्मकदृष्ट्या काहीही फरक नाही याची कबुलीच देत असतात! दोनही बाजूंनी एकमेकांच्या आड लपण्याचा कितीही प्रयत्न केला तरी, काहीवेळा श्रद्धा, काहीवेळा कुटुंब, काहीवेळा भौगोलिकदृष्ट्या जोडलेल्या (देश माझा, देशातील नागरिक माझे, इतर देशाच्या नागरिकांपेक्षा अधिक जवळचे; हाच नियम द… पुढे वाचा »
Labels:
‘पुरोगामी जनगर्जना’,
जिज्ञासानंद,
तत्त्वविचार,
भूमिका,
संस्कृती,
समाज
गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५
आभासी विश्व आणि हिंसा
-
ज्याने कुणी इंटरनेटला Virtual World (याचा ‘आभासी विश्व’ असा अतिशय वाईट अनुवाद केला जातो) असा शब्द प्रथम वापरला त्याच्या कल्पनाशक्तीला दाद द्यायला हवी. ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस उगवलेल्या ‘वर्ल्ड वाईड वेब’ या संकल्पनेतून केवळ एकाच भूभागावरचे नव्हे तर जगभरात पसरलेले संगणक परस्परांना जोडण्याची सोय झाली. त्यातून कल्पनांचा विस्फोट झाला आणि माणसाचे जग त्याने उलटे पालटे करून टाकले. या इंटरनेटने एका बाजूने माणसाला आजवर कधीही सापडले नव्हते असे प्रचंड व्याप्ती असलेले ‘माध्यम’ दिले तर दुसरीकडे थेट एक मानवनिर्मित, कृत्रिम असे ‘विश्व’च निर्माण केले. आज माणसाच्या जगातील माहितीशी निगडित बहुसंख्य जबाबदार्या हे माध्यम जग लीलया पेलून धरते आहे, तर हे नवे विश्व माणसाच्या अद्याप विकसितही न झालेल्या पैलूंना नवी क्षितीजे प्रदान करते आहे. या नव्या माध्यमाने… पुढे वाचा »
Labels:
‘पुरोगामी जनगर्जना’,
जिज्ञासानंद,
माहिती तंत्रज्ञान,
समाज,
हिंसा
रविवार, ३० ऑगस्ट, २०१५
सत्तेचे भोई
-
आठ ऑगस्ट रोजी बंगालमधील ‘काँग्रेस छात्र परिषदे’चा कार्यकर्ता असलेल्या कृष्णप्रसाद जेना या विद्यार्थ्याची प्रतिस्पर्धी ‘तृणमूल छात्र परिषद’ या तृणमूल काँग्रेसशी संलग्न असलेल्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करत हत्या केली. या मारहाणीचे कारण काय होते तर, तृणमूल काँग्रेसचे मंत्री सौमेन महापात्र यांच्या स्वागतासाठी आला नाही! हे महापात्र महाशय त्यावेळी पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी म्हणून आले होते. तरीही त्यांना आदरसत्काराची हौस होती, की नेत्यावर छाप पाडण्यासाठी कार्यकर्तेच अति आक्रमक होते हे सांगता येत नाही. पण इतक्या क्षुल्लक कारणावरून एका विद्यार्थ्याची हत्या करण्याइतके बेभान होण्यात शासन धार्जिणे असण्याचा आधार नक्कीच कामी येत असणार. यावर शासन आणि विद्यापीठ संलग्न व्यक्तींच्या प्रतिक्रिया अतिशय संवेदनशून्य होत्या… पुढे वाचा »
Labels:
‘पुरोगामी जनगर्जना’,
जिज्ञासानंद,
राजकारण,
विश्लेषण,
सत्ताकारण,
समाज
बुधवार, १२ ऑगस्ट, २०१५
अन्योक्ती १ - एका ‘जॉन स्नो’चा मृत्यू
-
'Game of Thrones' नावाच्या एका बहुचर्चित दूरचित्रवाणी मालिकेतला पाचवा सीजन नुकताच संपला. कोण्या काल्पनिक जगातले सात राजे, काही भटक्या टोळ्या नि त्यांचे राजे यांच्यात सतत चालू असलेले सत्तासंघर्ष, त्यासाठी वापरली जाणारी देहापासून पारलौकिकापर्यंत सारी साधने, परस्परद्रोह, हत्या, हिंसाचार, लैंगिकता यांचा विस्तीर्ण पट असलेली ही मालिका जगभरातल्या प्रेक्षकांना बांधून ठेवणारी ठरली आहे. तिचे पुढचे भाग चॅनेलवर येण्याआधीच पहायला मिळावेत यासाठी ते खटपट करू लागले आहेत इतकी उत्सुकता त्याबद्दल निर्माण झालेली आहे. अनेक प्रेक्षक त्यात इतके गुंतले आहेत की नुकत्याच सादर झालेल्या शेवटच्या भागात झालेल्या ‘जॉन स्नो’च्या हत्येने प्रेक्षकांमधे संतापाची लाट उसळली. अनेकांनी ती मालिका दाखवणार्या चॅनेलकडे निषेध नोंदवला. फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियांतू… पुढे वाचा »
बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४
समाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने - ११ (अंतिम भाग) : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - ३
-
भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - २ << मागील भाग फ. तत्त्वांची सर्वसमावेशकता किंवा व्यापकता: बदलत्या काळाचे भान नसणे आणि आपल्या तत्त्वज्ञानाला कालातीत समजणे हा खरं तर धार्मिक कट्टरपंथीयांचा सर्वात मोठा दोष. काळाचे चक्र फिरवून मागे नेऊन पुन्हा एकवार आपल्या प्रभावाच्या काळात जगाला नेता येईल असा भाबडा नि अव्यवहार्य विचार हा फक्त यांचा दोष आहे असे नव्हे असे आता म्हणावे लागेल. आज समाजवादी मंडळीही नव्या काळाच्या संदर्भात आपले तत्त्वज्ञान तपासून पाहतात का, त्यात काय बदल करावे लागतील याचा उहापोह करतात का नि काही मते, तत्त्वे ही कालबाह्य झाली असे प्रामाणिकपणे मान्य करून त्यांना सोडून देऊन पुढे जाण्यासाठी काही संघटित प्रयत्न वा यंत्रणा उभी करतात का वा त्या दृष्टीने काय करता येईल याचा विचार करतात का? लोहियांचा समाजवाद भारतीय समा… पुढे वाचा »
समाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने - १० : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - २
-
भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - १ << मागील भाग ड. गरज एका चेहर्याची: सामूहिक नेतृत्व या देशाला मानवत नाही हे पुरेसे सिद्ध झाले आहे. लोक तत्त्वांना, मुद्द्यांना ओळखत नाहीत, ते चेहर्याला ओळखतात. अमुक एक विपदा 'कशी निवारता येईल?' यापेक्षा 'कोण निवारील?' हा प्रश्न त्यांना अधिक समजतो नि त्याचे उत्तर त्यांना हवे असते. या देशात जोरात चाललेली तथाकथित बुवा-बाबांची दुकाने हेच सिद्ध करतात. देशात सर्वाधिक काळ सत्ताधारी राहिलेला काँग्रेस हा पक्ष नेहेमीच एका नेत्याच्या करिष्म्यावर उभा होता. पं नेहरु, इंदिरा गांधी आणि शेवटी राजीव गांधी या नेतृत्वाकडे भोळीभाबडी जनता त्राता म्हणूनच पहात होती. राजीव गांधीच्या हत्येनंतर काँग्रेसला उतरती कळा लागली तर बंगालमधे पस्तीसहून अधिक वर्षे मुख्यतः ज्योती बसूंचा चेहरा घेऊन उभ्या … पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)







