Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
भांडवलशाही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भांडवलशाही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २३ जून, २०२०

अगायायायायफोन


  • काही महिन्यांपूर्वी एका कार्यशाळेमध्ये आम्ही एका चित्रपटाचा शो आयोजित केला होता. मर्यादित लोकांसाठी असल्याने थिएटर नव्हते. तेव्हा सरळ लॅपटॉपवरुन प्रोजेक्टरला जोडावे असा प्लान होता. प्रोजेक्टर असो वा बाह्य मॉनिटर वा टीव्ही, वाटेल त्याला एक एचडीएमआय केबल जोडली की तो लॅपटॉप बिचारा निमूट चित्रपट वा गाण्याचा नळ सोडून पाणी वाहतं करतो असा अनुभव आमचा. पण आमचा माज साफ उतरला कारण दिग्दर्शक महाशयांचा लॅपटॉपचा धर्म वेगळा होता... साहेब आले ते अ‍ॅपल घेऊन. त्यांच्या त्या लॅपटॉपने आधी आमच्या प्रोजेक्टरकडे बघून नाक मुरडले नि ’पोरगी नकटी आहे, मी सोयरिक करणार नाही’ म्हणून जाहीर केले. मग एक यूएसबी फ्लॅशडिस्क ऊर्फ पेनड्राईव्हवर घेऊन तो प्रोजेक्टरला जोडू असे ठरले. तो प्रयोग सुरु झाला नि महाशय यूएसबीला नाके मुरडू लागले. मग दुसरा एक समंजस लॅपटॉप आणून तिला थोडा… पुढे वाचा »

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०

जरा डावे, जरा उजवे, कांद्यावरती बोलू काही


  • ( फेसबुकवर एका मित्राच्या ’कांदा निर्यातबंदी हा समाजवादी पर्याय म्हणावा की भांडवलशाही?' या प्रश्नाला उत्तर म्हणून लिहिलेली पोस्ट. त्यात आणखी एका मुद्द्याची भर घालून इथे पोस्ट केली आहे. ) मला नेहमीच, आणि जगण्याशी निगडित सर्वच मुद्द्यांबाबत असे वाटते की ’हे की ते’ ही द्विपर्यायी मांडणी बहुधा बाळबोध असते. तसे करुच नये. ज्यांना एका विचारसरणी वा मॉडेलवर आपली निष्ठा मिरवायची असते, तेच असा अगोचरपणा वारंवार करतात. अवघड प्रश्नांची सोपी उत्तरे त्यांना हवी असतात म्हणून समस्येचे असे सुलभीकरण ते करत असतात. कांदे (अथवा कोणताही शेतमाल) महागला की ’बजेट कोलमडले’ म्हणून ओरड करणारे जितके चूक तितकेच ’या पुण्या-मुंबईकडच्या मध्यमवर्गीयांच्या सोयीसाठी सरकार भाव पाडते’ असा बाळबोध विचार करणारेही तितकेच चूक असतात, कारण ते समस्येचे संपूर्ण आकलन करुन न घेता … पुढे वाचा »

रविवार, २६ जानेवारी, २०२०

जग जागल्यांचे ०२ - रोशचा रोष : स्टॅन्ले अ‍ॅडम्स


  • व्यवस्था आणि माणूस « मागील भाग --- २००९ मध्ये भारतात ’स्वाईन फ्लू’चा उद्रेक झाला. या आजाराने झालेल्या मृत्यूंची संख्या हजारांत पोचली. यावर परिणामकारक ठरणारे एकच औषध होते, त्याचे नाव ’टॅमिफ्लू’. हे औषध १९९९ साली बाजारात आणले गेले, आणि उत्पादकाचा त्यावरील एकाधिकार संपण्याच्या सुमारास या आजाराचा जगभर उद्रेक झाला. या योगायोगाबद्दल अनेकांनी संशय व्यक्त केला होता. या औषधाची निर्माती होती स्वित्झर्लंड-स्थित ’हॉफमान-ला-रोश’, जिच्याबद्दल असा संशय घेण्यास पुरेसा इतिहास होता. संशोधन-खर्च भरून येण्यासाठी औषध निर्मिती कंपन्यांना औषध बाजारात आल्यावर काही काळ एकाधिकार दिलेला असतो. ब्रिटनमध्ये व्हॅलियम आणि लिब्रियम या उपशामक (tranquilizers ) औषधांचे रोशकडे असलेले एकाधिकार संपल्यावरही रोशने अन्य उत्पादकांना त्याचे उत्पादन-अधिकार देण्याच्या ब्रिटिश … पुढे वाचा »

सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

उठवळांचे आत्मरंग


  • पश्चिमेत लॉरेन्स ऑलिव्हिए किंवा लिव उलमनसारख्या प्रथितयश कलावंतांच्या आत्मचरित्रांची जशी परंपरा आहे, तशी ती आपल्याकडे नाही. पण म्हणून दिग्गज कलावंतांची अगदीच टाकाऊ वा उथळ स्वरूपाची आत्मचरित्रंही आजवर प्रकाशित झालेली नव्हती. मात्र, अलीकडे बॉलीवूडमधील नट-नट्यांच्या प्रकाशित आत्मचरित्रांनी ती पायरीसुद्धा ओलांडली आहे. त्यातल्या नवाजुद्दीनने उठवळ स्वरूपाचं आत्मचरित्र लिहून त्या बदलौकिकात भर घातली आहे इतकेच... अष्टपैलू अभिनेता अशी ज्याची ओळख झाली, ज्याच्या संघर्षाच्या मिथक कथा मोठ्या प्रेमाने पसरवल्या गेल्या, त्या नवाजुद्दीन सिद्दिकीवर उथळ आणि उठवळ मांडणीमुळे आत्मचरित्र (अ‍ॅन ऑर्डिनरी लाइफ - ए मेमॉयर) मागे घेण्याची नुकतीच वेळ आली. नवाजुद्दीनच्या आधी करण जोहर, ऋषी कपूर, आशा पारेख, अनू अगरवा… पुढे वाचा »