Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
विरंगुळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विरंगुळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १३ जानेवारी, २०२६

आली माझ्या घरी ही...


  • ...संक्रांत! का? नेहमी दिवाळी आली म्हणूनच गाणं म्हणावं की काय? की गोड बोलायला सांगणारी अलिकडे आवडेनाशी झाली आहे ज्वलज्जहाल, कडवट हिंदूंना? पण गंमत अशी, की यावेळी खुद्द संक्रांतच गोड बोलेना झाली होती. सांगतो ना काय झालं ते. “तुमची नाटकं फार झाली...” संक्रांत आज फारच वैतागली होती. दाते पंचांगवाले काका तिला पुढच्या वर्षीच्या एन्ट्रीचे डीटेल्स समजावून सांगत होते, पण ती त्यांचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हती. “जेव्हा पाहावं तेव्हा हे ‘आग्नेयेकडून येते आहे नि नैऋत्येकडे जाते आहे. जाताना पश्चिमेकडे पाहाते आहे.’ वगैरे फालतूपणा बास आता. साधंसोपं ‘पश्चिमेकडून येते आहे नि दक्षिणेकडे जाते आहे’ असं का नाही? “आणि ते मेंढ्यावर आरूढ झाली आहे न्‌ बैलावर आरूढ झाली आहे काय; एकजात गाढवं आहेत सारी. जरा चांगलं कन्फर्टेबल वाहन द्या. घाणेरडा… पुढे वाचा »