-
राजकीय आखाड्यामध्ये एका राजकीय नेत्याच्या विरोधी पक्षनेत्याशी असणार्या साट्यालोट्याबद्दल सतत कुजबूज होत असते. एका पंच पंच उष:काली दोघांनी बांधलेली गाठ ज्येष्ठांच्या आशीर्वादाअभावी सोडावी लागल्यानंतर त्यांच्यातील संबंधांबद्दल अधूनमधून वावड्या उठत असतात. त्यात कितपत तथ्य आहे ते त्या दोघांनाच ठाऊक. एक नक्की, भूतकालातील त्या आशादायी पहाटेची आठवण काढत त्यांच्यातील एक जण संध्याकाळी उदास फिरताना दिसतो. एका हताश क्षणी त्याने शब्दबद्ध केलेली आपली विरहवेदना...
https://www.bhaskar.com/ येथून साभार(कविवर्य ’आरती प्रभू’ यांची क्षमा मागून...) तो येतो आणिक जातो येताना कधी सह्या आणितो अन् जाताना चिठ्या मागतो येणे-जाणे, देणे-घेणे असते सारे जे न कधी तो सांगतो येताना कधी आधी लपतो तर जाताना तो लपवितो कळते काही, उगीच ते ही नकळत बोले पुशित बाही पदावाचून कधीच ’नाही... नाही...’ म्हणतो येताना त्याची खुलते कळी गुणगुणतो तोही भूपाळी* जाताना कधी करून बेत येण्यासाठीच फिरून येथ मध्येच येतो, निघून जातो... हे सलते - oOo - * प्रात:काली गाण्याचा एक प्रकार
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
मंगळवार, १८ एप्रिल, २०२३
कुण्या एकाची सत्तागाथा (एक राजकीय विरहगीत )
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा