-
(एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने खुद्द पंतप्रधानांची पदवी दाखवावी अशी मागणी केली. त्यावर पंतप्रधानांच्या राज्यातील न्यायालयाने त्या मुख्यमंत्र्याला २५,०००/- चा दंड केला. या अनुभवावरून संगीताचार्य गो. ल. माल यांनी अशा प्रकारची मागणी करणार्यांना इशारा देणारे हे पद रचले.)
(देवल मास्तरांची क्षमा मागून...) पदवीधरा हा बोध खरा जिज्ञासा कबरीं पुरा ॥ संशय खट झोटिंग महा देऊ नका त्या, ठाव जरा ॥ ईडीपिडा त्राटिका जशी । कवटाळिल ती, भीती धरा ॥ छिन्नमस्ता* ती बलशाली । आव मानितां, घाव पुरा ॥ --- * पूर्ण जीभ बाहेर काढलेलं महाकालीचं एक रूप. - oOo - गीत/संगीत गो. ल. माल नाटक: संशयलोळ चाल: चल झूठे कैसी...
‘वेचित चाललो...’ वर :   
उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...       अंतरीच्या या सुरांनी      
शनिवार, १ एप्रिल, २०२३
पदवीधरा...
संबंधित लेखन
कविता
प्रासंगिक
विडंबन
विरंगुळा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा