Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

सत्तेचे सोपान

  • SnakesAndLadders
    कधी पापा, पाठीवर थापा
    कधी हपापा, कधी गपापा
    
    कधी थट्टा, कधी रट्टा
    कधी सत्ता, कधी बट्टा
    
    कधी चंदन, कधी भंजन
    कधी खंडन, कधी भांडण
    
    कधी झेंडा, कधी दंडा
    कधी चंदा, कधी गुंडा
    
    कधी थाप, कधी व्हॉट्स-अॅप
    कधी चाप, कधी मार-काप
    
    कधी खांदा, कधी फंदा
    नाही मंदा, कधी धंदा
    
    - रमताराम
    	

संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा