शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

फुकट घेतला मान

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या व्यावसायिक धोरणांबद्दल अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित करणारा अमेरिकास्थित ’हिन्डेनबर्ग’चा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यावर त्यांच्या शेअर्सनी गटांगळ्या खाण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यात स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि एलआयसी यांच्यामार्फत गुंतलेल्या सर्वसामान्यांच्या पैसा धोक्यात आला. अदानींनी मुद्द्यांचा प्रतिवाद करण्याऐवजी राष्ट्रवादाची ढाल पुढे केली. त्याला अनुसरून स्वयंघोषित राष्ट्रभक्तांचे बुद्धिहीन जथे अदानींच्या समर्थनार्थ धावले...

Adani Smiling
( शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर यांची क्षमा मागून...)
“नाही खर्चली कवडी दमडी, नाही सांडिला घाम फुकट घेतला मान, भाऊ(१) मी फुकट घेतला दाम.” “कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे हुशारी; देशबंधूच्या बचतीतील मी, सहज खर्चिले दाम.” ॥१॥ कुणी अदानी कर्णावतीचा, मैतर त्याचा दिल्लीमधला, तारक होईल यास आज तो; तसा देश, प्रभु राम ॥२॥ जितुके बालक, तितुक्या पोस्टी समर्थना तव सिद्ध राहती; फेसबुकावर पोरे-सोरे, वृथा मारिती तान ॥३॥ - अगदी माडगूळकर
- oOo -

(१) हे संबोधन कुण्या ‘जागरूक पहारेकर्‍या’चे असावे असा संशय आहे.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा