-  
      
(शाहीर रामजोशी यांच्या पायीच्या धूलिकणातून फुटलेला अंकुर)
       
  	’कोर्ट’ चित्रपटामध्ये शाहिराच्या भूमिकेत वीरा साथीदार.(१). ट्विट: (आता ‘X’ या नावाने ओळखल्या जाणार्या) ‘ट्विटर’ या मायक्रोब्लॉगिंग साईटवरील प्रासंगिक लेखन. (२). रिळांत: Reel = इन्स्टाग्राम, टिकटॉक, मोज आदि मायक्रोव्हिडिओ साईट्स वा अॅपवरील छोटे व्हिडिओ. (३). सर्प. (४). सांगा कोणाची? (५). आखूड विजार.गटागटाने ट्विटा मारूनि सोटा धरिशी का मनीं जगाची उठाठेव कां तरी? पोस्टीत अथवा ट्विटेत(१) हो का, रिळांत(२) घ्या हो कधी स्नेहाचे नांव निज अंतरी काय मनांत धरूनि इतरांशी वाकडे ही काय जगाचे हित करतिल माकडे आंतून थरकती, बाहेर वीर फाकडे अगा शेळपटा उगा स्वत:ला शूर म्हणविसी गड्या करुनि फुकाच्या काड्या भला जन्म हा तुला लाभला मनुष्यप्राण्याचा धरिशी का डूख अहि(३)सारखा ट्विटेट्विटेवर शिळा पडो या, बिळांत लपुनि फेका तरिही न होय ’तयाची’(४) कृपा दर्भ वृत्तीचा मनीं धरोनी टोचशी कोणा फुका जाळिशी तव रुधिराला वृथा गुंडउदंडउद्दंड झुंड झुंडीची कृपा न सार्थक, वांझच सारे खपा हे वार-वाग्बाण जराही येतील ना कामा ह्या दुर्लभ नरदेहात ठेवी करुणा श्रमवंत भुकेला, तू अस्मिता-चोळणा(५) वर्म कळेना, धर्म सुचेना, कर्माने तू गधा बांधुनि घे कविरायाचा शिधा - शाहीर लांबहोशी
 
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : | 
शुक्रवार, १२ मे, २०२३
जल्पकांस—
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा