मुंबईत वीज गेली म्हणून फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना आणखी एक निषेधाचे पत्र लिहिले चंद्रकांत पाटलांनी राज्यपालांची भेट घेतली दरेकरांनी गेटवेवर अर्धा तास उपोषण केले आणि एका राणेंनी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंना जबाबदार धरले पंजाबमधील शेतकर्यांना पाठिंबा देणारा नवा लेख संजय राऊत यांनी लिहिला. कंगनाने ट्विट करुन त्यातील व्याकरणाच्या चुका जाहीर केल्या काँग्रेस नि राहुल गांधींनी काय करावे यावर कम्युनिस्ट विचारवंताने एकशे तेरावा लेख लिहिला आणि सायक्लोस्टाईल करुन आपल्या मित्रांना पाठवला माहिती अधिकाराचा वापर करुन मोराच्या पिसांची संख्या राहुल गांधीनी माहिती करुन घेतली कपिल सिब्बल यांनी त्याबाबत सोनियांकडे तक्रार केली आपले तिकिट कापण्यामागे मुंबई पोलिसाचे षडयंत्र असल्याचा गुप्त अहवाल मिळाल्याचा दावा गुप्तेश्वर पांडॆंनी केला आणि सीबीआय चौकशीची मागणी केली आपले कालचे विधान मिसक्वोट केले काश्मीरी जनता चीनमध्ये नव्हे अफगाणिस्तानमध्ये जाण्यास उत्सुक असल्याचा खुलासा फारुक अब्दुल्लांनी केला बलात्कार्यांना जामीन मिळाल्याची बातमी गायब होऊन तिथे 'पतंजलीचे अधिकृत शेण खा आणि कोरोनाला पळवून लावा' म्हणणारी जाहिरातपट्टी फिरु लागली. ... वीज गेली हे तर बरेच झाले. टीव्हीवर हे सारे पाहण्याऐवजी डोळॆ फोडून घेण्याचे वाचले म्हणून मुंबईकर खूष झाले. - रमताराम
- oOo -
‘वेचित चाललो...’ वर :   
अंतरीच्या या सुरांनी       गेले... ते दिन गेले       दशांशचिन्हांकित कविता आणि प्रमेय-प्रत्यंतर       लेखकजिज्ञासायोग       आद्य मराठी-सारस्वतांचा निघंटु       छोटीशीच आहे फौज आपुली       आज धारानृत्य चाले...       वेचताना...: जिज्ञासामूर्ती       जिज्ञासामूर्ती       न स्त्री स्वातंत्र्यमर्हती       धारयते इति धर्मः ?       स्वातंत्र्य आले घरा (उत्तरार्ध)       स्वातंत्र्य आले घरा (पूर्वार्ध)       वेचताना... : स्वातंत्र्य आले घरा       माझा बाप       स्वप्न-वास्तव-सत्ता      
सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०
मुंबईत वीज गेली...
संबंधित लेखन
कविता
प्रासंगिक
वक्रोक्ती
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
सध्या कशातही राम राहिला नसला तरी तुमच्या नावात नक्की आहे
उत्तर द्याहटवा_/\_ फरक इतकाच की हा मर्यादापुरुषोत्तम असण्यापेक्षा कोदंडधारी अधिक आहे. :)
हटवाmast...
उत्तर द्याहटवा_/\_
हटवा15115
उत्तर द्याहटवा