-
नाचत ना भाजपात, आता । राकाँच्या कळपात, नाथा ॥ आणिक होती, चिकी मावशी(१)। तावडेंची उलघाल, नाथा ॥ खुर्ची उलटली, सत्ता हरपली । काकांच्या फटक्यात, नाना ॥ तो तर वरती, नवबिहारी(२) । सर्व हताश पाहात, नाना ॥ --- (१). चिक्की घोटाळ्याचे आरोप असलेली राजकारणी. (२). महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हुकल्यानंतर नुकतेच बिहारचे प्रभारीपद स्वीकारावे लागलेला नेता.
गीत: काव्यकार्टुन
संगीत: आताबास्कर संगीत मंडळी
गायक: चंद्रकांत छोटीमिशी (कोरस: आयटीसेल)
नाटक: सं. खुर्चीप्रभाव
राग: मुन्शिपाल्टी कानडा
चाल: उद्धवा नेऊ नको नाथास
---
कवितेसोबत जोडलेले भाष्यचित्र प्रसिद्ध भाष्यचित्रकार आलोक यांच्या ट्विटर पोस्टवरून साभार.
शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०
नाचत ना...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा