शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

अब्ज अब्ज जपून ठेव (अर्थात ’मल्ल्याला सल्ला’)

( कविवर्य मंगेश पाडगांवकर यांची क्षमा मागून )

अब्ज अब्ज जपून ठेव, कोहिनूर हिर्‍यापरी

काय बोलले जन हे, 
विसरुन तू जा सगळे,
जमविली जी माया तू, जाण अंती तीच खरी

लाज नको पळताना, 
खंत नको स्मरताना
काळ जाता विसरिल रे, जनता ही तुज सहजी

राख लक्ष स्वप्नांची, 
हतबल त्या गरीबांची,
तव कृपेने बुडले जे, उडु दे वार्‍यावरी

-  मजेत पेडगांवकर


- oOo -

कवितेसोबत जोडलेले भाष्यचित्र https://blogs.navbharattimes.indiatimes.com/ येथून साभार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा