(कविवर्य शंकर रामाणी यांची क्षमा मागून)
टीव्ही लागले रे, टीव्ही लागले
कुणाच्या घरातिल टीव्ही लागले
रवीची प्रभा मंद अंधूकताना
याने लावले रे, त्याने लावले!
दिसा कष्टुनि जे जाहले श्रमी
जन सारे अखेरीस सैलावले
इथे कावलो मी, सर्व गलग्यामुळे
मनी प्रार्थना, वीज घालवाच रे
सुरू बातम्या या कुणाच्या घरी
कुणी हास्यजत्रेत हो दंगले
संत्रस्त मम मनाच्या तळीचे
शिवीसूक्त हे ओठातुनि ओघळे
- सतत त्रस्तमी (ऊर्फ मंदार काळे)
कुणी हास्यजत्रेत हो दंगले
संत्रस्त मम मनाच्या तळीचे
शिवीसूक्त हे ओठातुनि ओघळे
- सतत त्रस्तमी (ऊर्फ मंदार काळे)
---
(मित्रवर्य उत्पल व. बा. यांच्या सहकार्याने एक जास्तीचे कडवे.)
इथे पत्रकारितेची पडली शवे
त्यावरी नफ्याची गगनचुंबी घरे
स्क्रीन जयाचा बुद्धी शोषून घेतो
त्या इडियटाचे पिसे लागले रे
टीव्ही लागले रे...टीव्ही लागले...
---
व्वा व्वा
उत्तर द्याहटवाहे मागच्या प्रयोगांहून आवडले.
'घालवाच' व 'पत्रकारितेची' या शब्दांपाशी वाचताना रिदम जातो, तिथं शक्य असेल तर अजून चाचपडून बघावे...