-
https://i1.wp.com/amitguptaz.com/ येथून साभार.
(कविवर्य आरती प्रभू यांची क्षमा मागून) ते येते आणिक जाते येताना काही बिट्स१ आणते अन् जाताना टाटा करते येणे-जाणे, डालो२ होणे असते असे जे न कधी पुरे होते येताना कधी मध्ये थांबते तर जाताना एरर देते न कळे काही उगीच काही आकळत मज काही नाही कारणावाचून उगीच का हे असे अडते? येतानाची कसली रीत, बाईट्स३ ऐवजी देई ते बिट जाताना कधी हळूच जाई येण्यासाठीच फिरुन जाई प्रकट होते, विरुन जाते, जे टवळे - चालूदे प्रभू (ऊर्फ मंदार काळे)
- oOo -१. बिट्स (Bits) हे संगणकामध्ये साठवणुकीचे असलेले एकक. २. आभासीविश्वातील ’शॉर्टहॅंड मराठी’मध्ये ’डाऊनलोड’साठी
वापरला जाणारा शब्द ३. संगणकाच्या साठवणुकीचे एकक. १ बाईट (Byte) = ८ बिट्स (Bits)
---
* हा शब्द एरॅटिक (Erratic) आहे, एरॉटिक (Erotic) नाही. एरर (Error) म्हणजे अद्याप कारण न उमगलेली चूक. त्यापासून एरॅटिक म्हणजे सतत चुका करणारे असा अर्थ आहे. एरॉटिक मनांसाठी हा खुलासा. :)
‘वेचित चाललो...’ वर :   
चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...       अंतरीच्या या सुरांनी       गेले... ते दिन गेले       दशांशचिन्हांकित कविता आणि प्रमेय-प्रत्यंतर       लेखकजिज्ञासायोग       आद्य मराठी-सारस्वतांचा निघंटु       छोटीशीच आहे फौज आपुली       आज धारानृत्य चाले...      
बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०
एका एरॅटिक*-नेटग्रस्ताची कैफियत
संबंधित लेखन
कविता
विडंबन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा