-
मुल्ला नसरुद्दिनचा म्हणून एक किस्सा सांगितला जातो— हे सारे किस्से ‘अपौरुषेय’ असल्याने त्यात सतत भर पडत असते. त्यातले काही सीमोल्लंघन करुन इतर देशांत तेनालीरामचे, बीरबलाचे, इसापचे... म्हणून प्रसिद्ध होतात. त्यांचे काही इकडे आयात केले जातात आणि ‘आपलेच मूळचे’ यावर फावल्या वेळात भांडायला मूर्ख जमातींना मुद्दे मिळून जातात— ते जाऊ दे. किस्सा असा की एकदा मुल्लाने लोकांची फिरकी घ्यायचे ठरवले. ‘आज मशिदीमध्ये अन्नदान होणार आहे नि कुणीही घरात चूल न पेटवता जेवणासाठी तिकडे जायचे आहे’ असे त्याने पसरवून दिले. लोक– विशेषत: स्त्रिया, खुश झाले. चला आज गोडधोड खायला मिळणार म्हणून सुखावले. ठरली वेळ झाली नि सगळॆ लोक ठेवणीतले कपडे घालून मशिदीकडे धावू लागले. पाचच मिनिटांत वसती ओस पडली. दोन-तीन मिनिटांत मुल्लाही ठेवणीतले कपडे घालून पिशवीत ताट-वाटी घेऊन निघाला. वाटेत त्याचा एक मित्र भेटला. ‘कुठे निघालास?’ त्याने विचारले. ‘मशिदीत’ मुल्लाने उत्तर दिले. याला मुल्लाचा चावटपणा ठाऊक होता, त्यामुळे त्याला आश्चर्य वाटले. ‘अरे पण तूच ही अफवा पसरवलीस ना?’ त्याने विचारले. ‘अरे पण ज्या अर्थी इतके लोक मशिदीकडे चालले आहे...
पुढे वाचा »
धर्म लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
धर्म लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
गुरुवार, २१ मे, २०२६
पास्ता आणि झुरळ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
