Vechit Marquee

सोमवार, २५ मे, २०२०

जग जागल्यांचे ०८ - वर्णभेदभेदी कॅथी हॅरिस


  • ‘रुझवेल्ट’चा राखणदार: कॅ. ब्रेट क्रोझर   << मागील भाग बराच काळ मानेवर खडा ठेवून रोजगाराचे काम केल्यानंतर तुम्ही छानशा सुटीचा बेत आखता. परदेशातील एखाद्या छानशा ठिकाणी जाऊन सुटीचा निवांत आस्वाद घेऊन ताजेतवाने होत परतीच्या वाटेवर विमानतळावरुन बाहेर पडण्यासाठी रांगेत उभे राहता. केव्हा एकदा बाहेर पडतो नि घर गाठतो असे तुम्हाला झालेले असते. पण...तुम्हाला तपासणीसाठी दीर्घकाळ अडकवून ठेवले जाते. कधी शरीराची बाह्य चाचपणी, कधी संपूर्ण विवस्त्र करुन तपासणी, कधी इंद्रियतपासणीदेखील! कधी तशा विवस्त्र स्थितीत तपासणी-खोलीत बसवून ठेवले जाते. काही वेळा शरीराअंतर्गत तपासणीसाठी एक्स-रे किंवा एन्डोस्कोपीतून … पुढे वाचा »

रविवार, २४ मे, २०२०

राष्ट्रवादाचा ‘तंत्र’मार्ग


  • यापूर्वीच्या निवडणुका आणि २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुका यांत एक महत्त्वाचा फरक आहे; तो म्हणजे यांत झालेला इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये एका बाजूने वृत्तवाहिन्या येतात, तसेच इंटरनेटच्या माध्यमांतील संकेतस्थळे, फेसबुक आणि ट्विटरसारखी समाजमाध्यमे, मोबाइल व त्यावरील व्हॉट्सअ‍ॅपसारखी संवादी माध्यमे या साऱ्यांचा समावेश होतो. या सर्व माध्यमांतून मोदींच्या खऱ्या-खोटय़ा यशोगाथांचा, काँग्रेसच्या खऱ्या-खोटय़ा पापांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी एक सूत्रबद्ध यंत्रणा उभी करण्यात आली होती. जी कमालीची यशस्वी ठरली. यात अधिकृत माध्यमांमधील प्रतिनिधी होते, तसेच समाजमाध्यमांमध्ये मोदी… पुढे वाचा »