तो म्हणाला, "फलाण्याबाबतीत गणपाचे वागणे बरोबर नाही" गणपा म्हणाला, "’त्या’बाबतीत गण्याला बोलत नाही, फाटते याची." तो म्हणाला, "ढेकाण्याबाबतीत गण्याचे वागणे बरोबर नाही." गण्या म्हणाला, "’त्या’बाबतीत गणपाला बोलत नाही, फाटते याची." तो म्हणाला, "अमुक मुद्द्यावर गण्याची बाजू योग्य आहे." ते म्हणाले, "हा छुपा मनुवादी आहे." तो म्हणाला, "तमुक मुद्द्यावर गणपाची बाजू बरोबर आहे." ते म्हणाले, " हा अर्बन-नक्षलवादी आहे.’ तो म्हणाला, "ढमुक मुद्द्यावर दोन्हीं बाजूंच्या दाव्यात तथ्य आहे." ते म्हणाले, "हे समाजवादी लेकाचे कायम कुंपणावर." तो म्हणाला, "टमुक मुद्द्यावर दोन्ही बाजूंची चूक दिसते." ते म्हणाले, "हा साला दोन्हीं बाजूंनी बोलतो." तो म्हणाला, "पामुक मुद्द्यावर ही तिसरी बाजू अधिक योग्य ठरेल." ते म्हणाले, "याचं नेहमी तिसरंच असतं." तो म्हणाला, "मुद्द्याला नेहमी दोनच बाजू असतात असे नाही." ते म्हणाले, "हा नेहमी फाटेच फोडत असतो." तो म्हणाला, "या धोरणांत गरीबांचे हित नाही." ते म्हणले, ’हा साला कम्युनिस्ट आहे." तो म्हणाला, "सारेच श्रीमंत शोषक नसतात." ते म्हणाले, "हा भांडवलशाहीचा हस्तक आहे." तो कंटाळून म्हणाला, "असल्या खुळचट आप्तांपेक्षा एखादा शहाणा शत्रू बरा." ते म्हणाले, "हा देशद्रोही आहे." तो संतापून म्हणाला, "मुद्द्यांऐवजी बाजू सांभाळणार्यांना फटकावले पाहिजे." ते म्हणाले, "हा हिटलर आहे." तो वैतागून म्हणाला, "असल्या मूर्खांसोबत राहण्यापेक्षा आत्महत्या केलेली काय वाईट?" ते म्हणाले, "हा भेकड आहे." ... आता तो काहीच म्हणत नाही. ते मात्र म्हणतात, "भित्रा लेकाचा, बोलण्याची हिंमत नाही." - रमताराम
- oOo -
‘वेचित चाललो...’ वर :   
दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...       अंतरीच्या या सुरांनी       गेले... ते दिन गेले       दशांशचिन्हांकित कविता आणि प्रमेय-प्रत्यंतर       लेखकजिज्ञासायोग       आद्य मराठी-सारस्वतांचा निघंटु       छोटीशीच आहे फौज आपुली       आज धारानृत्य चाले...       वेचताना...: जिज्ञासामूर्ती       जिज्ञासामूर्ती       न स्त्री स्वातंत्र्यमर्हती      
शुक्रवार, १६ जुलै, २०२१
ते म्हणतात...
संबंधित लेखन
कविता
चर्चा
समाज
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा