-
मंडळी काल आम्ही ‘राजनीती’ नामे चित्रपट पाहिला– सहज टीवीवर दिसला म्हणून पाहिला. अगदी शेवटपर्यंत पहावे असे त्यात काय होते, ते काही समजले नाही. एरवी १०-१५ मिनिटात पुढील चित्रपटाची इस्टुरी ९५% अचूकतेसह (संख्याशास्त्री ना आम्ही, ५% सोडावे लागतात) सांगून टीवी बंद करणारे आम्ही, या चित्रपटात काय होते की शेवटपर्यंत चिकाटीने पाहिले. कदाचित एरवी ‘पहावी’ लागणारी भिकार गाणी नव्हती म्हणून, कि दर दहा मिनिटांनी होणारा पंधरा मिनिटांचा ‘छोटासा’ ब्रेक न घेता अर्धा तास सलग चित्रपट पाहता आला म्हणून, की त्यात ती कत्रिना का कोण होती – जी सुंदर आहे, म्हणे – म्हणून, की त्या रणवीर– चुकलो ‘रणबीर’ म्हणायला हवं नाही का– चा एकही चित्रपट पूर्वी पाहिला नसल्याने ‘He deserves a chance' असाही एक सुप्त हेतू असावा. तर कारण काहीही असो, आम्ही तो चित्रपट टिच्चून बसून पा… पुढे वाचा »
Vechit Marquee
‘वेचित चाललो...’ वर :   
उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...       अंतरीच्या या सुरांनी      
बुधवार, १० नोव्हेंबर, २०१०
‘राजनीती’चे महाभारत
शनिवार, १४ ऑगस्ट, २०१०
नरोटीची उपासना
-
पु.ग.सहस्रबुद्धे यांनी ‘नरोटीची उपासना’ (१) हा लेख लिहिला, त्याला आज पन्नासहून अधिक वर्षे लोटली आहेत. पन्नास वर्षे झाली त्या वर्षी एका प्रथितयश वृत्तपत्राने तो पुनर्मुद्रित केला होता. आज श्रावण महिन्याच्या निमित्ताने त्याची आठवण झाली. हा पु.गं.चा लेख नाही, त्याचा आजच्या काळात वेध घेणारा म्हणून शकू कदाचित. प्रथमच एक गोष्ट स्पष्ट करतो (फारसा उपयोग नसतो हे ठाऊक असूनही) ती म्हणजे पु. गं.चा लेख किंवा हा लेख आपल्या परंपरांचे/ प्रवृत्तीचे प्रचलित विचारांच्या/सश्रद्धतेच्या मर्यादेतच विचार करतो आहे. इथे अश्रद्धतेचा विचार येणार नाही. (प्रतिवादाच्या सोयीसाठी प्रथम तसा शिक्का मारणे सोपे असते, पण लेखाची व्याप्ती ती नाही.) --- नरोटी म्हणजे करवंटी, नारळाच्या आतील जीवनदायी पाण्याचे, खोबर्याचे रक्षण करणारे भक्कम वेष्टण. श्रद्धा आणि परंपरांच्या भाषेत… पुढे वाचा »
शुक्रवार, १४ मे, २०१०
होते कुरूप वेडे (कथा)
-
(Italo Calvino यांच्या The Black Sheep या कथेचा स्वैर अनुवाद.) कोण्या एका गावी सगळेच चोर होते. प्रत्येकजण रात्री आपली पिशवी आणि काजळी धरलेले कंदिल घेऊन बाहेर पडत आणि एखाद्या शेजाऱ्याचे घर लुटून पहाटे जेंव्हा आपल्या घरी परतून येत तेंव्हा आपलेही घर लुटले गेलेले त्यांना आढळून येई. या व्यवस्थेत कुणाचेच नुकसान होत नसे वा कुणाचा फायदा. पहिला दुसऱ्याच्या घरी चोरी करे, तर दुसरा तिसऱ्याच्या. अशा तऱ्हेने चालू रहात पुन्हा अखेरचा पहिल्याच्या घरी चोरी करून साखळी पूर्ण करी. गावातील व्यापारही सर्वस्वी फसवण्याच्या कलेवर अवलंबून होता. विक्रेते आणि ग्राहक दोघेही तिचा यथाशक्ती वापर करीत. येथील नगरपालिका ही एक गुंडांचा अड्डाच होती. तिचे शासक आपल्या नागरिकांना छळण्याचे आपले एकमेव काम मोठ्या निष्ठेने करीत असत. तर नागरिकही आपल्या परीने त्याना ठकवण्याचे काम… पुढे वाचा »
बुधवार, ५ मे, २०१०
देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ५
-
<< मागील भाग काही काळापूर्वी सत्यजित रे यांच्या चित्रपटांची एक दोन परिच्छेदात ओळख करून देणारे अमृत गंगर यांनी लिहिलेले एक लहानसे पुस्तक (प्रकाशक लोकवाङ्मय गृह) वाचले होते. त्यांनी हा चित्रपट ‘भारतातील अंधश्रद्धेवर आसूड ओढणारा होता’ असे म्हटले आहे. तसेच तो प्रकाशित झाला तेव्हा अनेक धार्मिक संघटनांनी त्याविरुद्ध गदारोळ केला अशी माहिती दिली आहे. आता डावे नि उजवे यांचे ज्यावर एकमत झाले आहे त्याबाबतच मी मतभेद व्यक्त करू इच्छितो. मला वाटते इथे आपले टिपिकल भारतीय मन विचार करते आहे. आपल्याला जसे ‘असावे असे वाटते’ तसे ‘आहे’ असा आपला समज असतो. वरवर न पाहता, थोडे वस्तुनिष्ठ होऊन बारकाईने पाहणे आपल्याला जमत नाही. चटकन एक शिक्का मारला की आपण ‘वा’ म्हणायला किंवा दगड मारायला मोकळे होतो. मुळात ही शोकांतिका ही व्यक्ती-समष्टीची लढाई आहे, माणसे न… पुढे वाचा »
शुक्रवार, ३० एप्रिल, २०१०
देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ४
-
<< मागील भाग आणखी काही दिवस गेले आहेत. आता छोटू आजारी आहे. पण त्याच्या आईने हे कालिबाबूंना किंवा छोटूच्या वडिलांपासून लपवून ठेवले आहे. त्यांना समजले तर पुढे काय होईल हे तिला स्वच्छ दिसते आहे. त्यांच्यापासून लपवून तिने वैद्याला बोलावले आहे. आल्याआल्या तो विचारतो, ‘घरात साक्षात देवी असताना मला बोलावण्याचे काय कारण?’ बोलता बोलता तो हे ही सांगून टाकतो, की देवीने त्याचे दीर्घकाळ त्रास देणारे दुखणे बरे केले आहे. तरीही तिच्या विनंतीवरून तो छोटूला तपासतो आणि औषधे पाठवून देण्याचे मान्य करतो. अर्थात या पेक्षा छोटूला देवीच्या पायावर घालणे अधिक चांगले हे सांगायलाही विसरत नाही. वैद्यबुवा बाहेर पडत असतानाच छोटूचे वडील तिथे येतात आणि छोटूला आजारी पाहून कालिबाबूंना सांगायला धावतच बाहेर जातात. छोटूच्या आईला ज्याची भीती वाटत होती तेच घडते. बेशुद्… पुढे वाचा »
गुरुवार, २९ एप्रिल, २०१०
देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ३
-
<< मागील भाग हा प्रकार थांबवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून उमाप्रसादने दयाला आपल्याबरोबर कलकत्त्याला नेण्याचा निर्णय घेतला आहे. कालिबाबूंच्या उपस्थितीत जाणे शक्य नसल्याने उत्तररात्री निघण्याचे ठरवून त्यासाठी त्याने बोटीची सोयही करून ठेवली आहे. पतीबरोबर जायला मिळणार या आनंदात दयाच्या चेहर्यावर स्मित उमटते. रात्री ते दोघे घाईघाईने नदीकिनार्याकडे येत असता ती अचानक थांबते. त्याला कळत नाही की ती का थांबली आहे. तो तिला घाईने पाऊल उचलायला सांगतो आहे. पण ती स्तब्धच. अचानक नजर उचलून ती म्हणते ‘पण माझ्यात जर खरंच देवीचा अंश असेल तर... तर मग माझ्या असे निघून जाण्याने माझे निहित कार्य मी टाळल्यासारखे होईल. त्यामुळे तुमच्यावर, आपल्या घरावर देवीचा कोप होईल.’ तो परोपरीने समजावू पाहतोय, पण ती म्हणते, ‘तो मुलगा केवळ तीर्थाने बरा कसा झाला हे खर… पुढे वाचा »
देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - २
-
<< मागील भाग कालिबाबू आत्यंतिक श्रद्धाळू आहेत. गेली चाळीस-एक वर्षे ते देवीची आराधना करताहेत. ‘तिच्याच कृपेने घराची भरभराट झाली आहे’ अशी त्यांची श्रद्धा आहे. या पारलौकिक श्रद्धेबरोबरच त्यांची आपल्या धाकट्या सुनेवरही श्रद्धा आहे. या घराचे सगळे चांगले होते ते तिच्या पायगुणाने किंवा खरेतर हातगुणाने. त्यामुळे कदाचित अर्धजागृत अवस्थेत त्यांच्या अबोध मनाने या दोन्ही प्रतिमा त्यांना एकामागोमाग दाखविल्या असाव्यात. पण आत्यंतिक श्रद्धेपोटी कालिबाबू यातून भलताच अर्थ काढतात. त्यांना वाटते की देवीनेच त्यांना दृष्टांत दिला आहे आणि ह्या देवीनेच आपल्या सुनेच्या रुपात अवतार घेतला आहेत. स्वप्नात जे पाहिले त्याने भारावलेले कालीबाबू उठून ‘माँ’ ‘माँ’ अशा हाका मारत तिच्या खोलीकडे धावतात. भर रात्री त्यांच्या हाका ऐकून बाहेर आलेल्या दयामयीच्या पायावर ड… पुढे वाचा »
देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - १
-
मागील शनिवारी NFAI च्या फिल्म क्लबमधे सत्यजित रेंचा ‘देवी’ पाहिला. रेंचा तुलनेने कमी प्रसिद्धी मिळालेला हा चित्रपट, कोणाला ठाऊक असेलच तर तो त्यात प्रमुख भूमिका केलेल्या शर्मिला टागोरमुळे. एरवी पाथेर पांचाली, चारुलता, अभिजान वगैरेंच्या तुलनेत तसा बाजूला पडलेला. एखादा युरोपियन चित्रपट पाह्यला मिळेल अशी आशा असताना अचानक आपल्या मातीतील हा चित्रपट पहायला मिळाला आणि त्या अनुभवातून सुन्न होऊन बाहेर आलो. किती तरी वेळ त्यातून बाहेरच येता येईना. अंधश्रद्धा, बुवाबाजी इ. विषयांवरील अनेक भडक चित्रपट पाहण्यात आले आहेत. पण आत्यंतिक श्रद्धेतून झालेले स्त्रीचे दैवतीकरण आणि त्यातून ओढवलेला तिचा अंत हा अतिशय चटका लावून जाणारा अनुभव होता. --- चित्रपटाच्या सुरवातीलाच एक प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा अनलंकृत पुतळा दिसतो. प्रथम त्याचे रेखीव डोळे अधोरेखित केले जातात, मग … पुढे वाचा »
शुक्रवार, २३ एप्रिल, २०१०
विठ्ठलाच्या स्त्रिया
-
(एका संस्थळावरील चर्चेत विठोबाच्या पत्नींबद्दल थोडी चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने हा विषय समोर आला.) विठोबा-रखुमाईचा गजर करणार्या महाराष्ट्रदेशी विठोबाच्या स्त्रिया हा विषय कदाचित आश्चर्यकारक वाटेल. पण लोकपरंपरेला तो तसा मुळीच नाही. आपल्या लाडक्या विठोबाचे नाव या ना त्या प्रकारे अनेक जणींशी जोडले गेले आहे. त्यात ( म्हणजे नंतर त्याच्यावर आरोपित केलेल्या विष्णूची... म्हणून त्याचा अवतार घोषित केलेल्या कृष्णाची... या बादरायण संगतीने ) त्याची राणी रुक्मिणी तर आहेच, पण अभिजात परंपरेबाहेर त्याच्या पदुबाई उर्फ पद्मावती, तुळशीबाई या अन्य पत्नी तर आहेतच, पण जनी सारखी साधीसुधी स्त्री सुद्धा आहे. इरावती कर्वेंसारखी एखादी विदुषी त्याला बॉयफ्रेंड म्हणून त्याच्याशी आधुनिक नातेही जोडू पाहते. यामुळे या विठोबाच्या स्त्रिया हा हा विषय दुर्गा भागवत,… पुढे वाचा »
रविवार, १८ एप्रिल, २०१०
नागर-गप्पा
-
तुम्हाला बिल गेट्सने पैसे दिले का? दचकलात का? अहो पण दचकायला काय झालं? एक-दोन वर्षापूर्वी मी तुम्हाला एक ढकलपत्र नव्हते का धाडले, ज्यात आपला (हो निदान पैसे देतोय तर आपला म्हणायला काय हरकत आहे) बिल त्याचे पैसे वाटून टाकणार आहे असे म्हटले होते? मला नाही मिळाले अजून म्हणून म्हटलं इतर कोणा कोणाला मिळालेत ते विचारावे. असो. थट्टेचा भाग बाजूला ठेवू या. पण माझी खात्री आहे हे ढकलपत्र प्रत्येक इ-मेल-पत्ताधारी व्यक्तीला किमान एकदा (पॉइंट टू बी नोटेड. मला किमान पाच जणांकडून आले... काय पण शेजार आहे नाही! ) तरी मिळालेच असणार. आणि कदाचित 'I know the truth, but just in case... ' असे म्हणत पुढे ढकललेही असेल, हो ना? माझ्या एका केरळी गणितविभाग-प्रमुख (म्हणजे मराठीत HOD हो) मित्राने प्रथम पाठवले. आणि त्याच्या 'cc' मध्ये जवळजवळ सव्वाश… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)