-
एक आटपाट नगर होतं. तिथं एक पाटलाची गढी होती. पाटील अगदी पाटलासारखा होता. कधी रयतेची काळजी घेई, कधी त्यांचं शोषण करी. पाटलाचे सगे-सोयरे, सोयरे-धायरे, जातवाले-गाववाले पाटलाच्या अधिक मर्जीतले होते, हे तर ओघानं आलंच. गावात एक तेजतर्रार फायरब्रँड तरुण तालमीत नित्य नेमानं मेहनत करत असे. त्याला पाटलाचं हे वर्चस्व मान्य नव्हतं. पाटीलकी ही शोषक व्यवस्था आहे, असं त्याचं म्हणणं होतं. त्यानं गावातच अॅंटी-पाटीलिझमची मुहूर्तमेढ रोवली. ग्रामपंचायतीची निवडणूक असो, पंचायत राजमधून मिळणारे लहान-सहान ठेके असोत की, कुठल्या-कुठल्या सरकारी योजनांमार्फत येणारी मदत असो. प्रत्येक पातळीवर तो पाटलाला नडू लागला. कालचं पोरगं आहे म्हणून पाटीलही दुर्लक्ष करत असे. गावातील लोकांना पाटलाचं वर्चस्व डाचत असलं तरी एक अपरिहार्यता म्हणून किंवा शेवटी अडीनडीला तोच कामात येतो म… पुढे वाचा »
Vechit Marquee
‘वेचित चाललो...’ वर :   
उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...       अंतरीच्या या सुरांनी      
मंगळवार, २८ मे, २०१९
एका किंग-स्लेअरची गोष्ट (एक राजकीय रूपककथा)
रविवार, २६ मे, २०१९
पक्षांतराचे वारे (उत्तरार्ध) : पक्षांतर आणि सामान्य मतदार
-
नेत्यांचे वातकुक्कुट << मागील भाग नेता आणि कार्यकर्ता यांचे हितसंबंध या पक्षांतराशी निगडित असतात. पण सामान्य मतदार याच्याकडे कसे पाहातो. त्याला यात अनैतिक, गद्दारी दिसत नाही का? त्यासाठी सामान्य माणसाची मानसिकता समजून घेता यायला हवी. त्रात्याच्या भूमिकेत नेता सर्वसामान्य माणूस हा मुख्यत: जगण्याच्या गरजांशी जोडलेला असतो. अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, विचार यांचा खल करत बसणे त्याला परवडत नाही. हल्ली शासकीय कार्यालयात किंवा बॅंकांमध्ये जशी ’एक खिडकी योजना’ असते तशी योजना तो शोधत असतो. त्या खिडकीत गेले की त्याचे काम व्हावे अशी त्याची अपेक्षा असते. आध्यात्मिक पातळीवर देव आणि धर्म, गुंतवणूक करताना इन्शुरन्स पॉलिसी विकणारा किंवा रिकरिंगचे/पीपीएफ/भिशीचे अकाउंट चालवणारा त्याचा ब्रोकर यांच्या शिरी तो आपला भार वाहात असतो. याशिवाय मुलान… पुढे वाचा »
शनिवार, २५ मे, २०१९
बाजू-बदल खुल खुल जाए...
-
आमच्या लहानपणी दूरदर्शन नुकतेच आले होते आणि टेलिविजन ही देखील गल्ली वा वाड्यात एखाद्याकडेच असणारी वस्तू होती. त्यामुळे क्रिकेटचा सामना असला की तिथे आख्खी गल्ली गोळा होई. या गर्दीत काही नमुनेदार महाभाग हटकून असत. ते नेहमी विरोधी पक्षाच्या बाजूने असत. विशेषत: भारत हरला की यांच्या वाणीला जबरदस्त धार येई. ’बघा, सांगत होतो की नाही. तुमचा गावसकर आमच्या माल्कम मार्शल समोर झुरळ आहे. त्या मनिंदरसिंगला तर तो अमका सहज फोडून काढेल.’ आम्ही आपले पडेल चेहर्याने बसलो असता यांचे चेकाळून भाषण चालत असे. आणि चुकून गावसकरने शतक केले, मनिंदरसिंगने समोरच्या टीमला स्पिनवर नाचायला लावले किंवा कपिलदेवने त्यांची भंबेरी उडवली की हे गप्प होत. पण त्यांना मनातून ज्या गुदगुल्या होत असत, त्या त्यांच्या चेहर्यावर दिसून येत. पण सामना प्रत्यक्ष संपेपर्यंत ते फारसे बो… पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
आयजीच्या जिवावर,
पक्षांतर,
विरंगुळा,
समाज
पक्षांतराचे वारे (पूर्वार्ध) : नेत्यांचे वातकुक्कुट
-
एखाद्या राजकीय पक्षाच्या, नेत्याच्या अथवा विशिष्ट वैचारिक पार्श्वभूमी असलेल्या शासकांच्या हातात दीर्घकाळ सत्ता असली आणि सुरुवातीच्या काळातला आशावादाचा भर ओसरला की हळूहळू त्या व्यवस्थेतील उणीवा दिसू लागतात. मग त्यांचे परिणाम तपासले जाऊ लागतात, हळूहळू त्यावर ध्यान इतके केंद्रित होते की त्यांची सकारात्मक बाजू विसरुन ‘आता हे आता बदलले पाहिजे’ या निष्कर्षापर्यंत लोक येऊन पोचतात. त्यांना निष्कर्षापर्यंत पोचवण्यात अर्थातच विरोधकांच्या प्रचाराचा आणि अलीकडे त्याहून महत्त्वाचा म्हणजे माध्यमांचा वाटा मोठा असतो. लोकभावनेमध्ये पडू लागलेल्या या फरकाचा अंदाज मुरब्बी राजकारण्यांना लगेच येतो. त्यामुळे निवडणुका जवळ आल्या की पक्षांतराचे वारे जोरदार वाहू लागतात. असमतोल पृष्ठभागावर पाणी नेहमी उताराकडे धावते तसे राजकारणी नेहमी (सत्तेच्या) चढाच्या दिशेने धावत… पुढे वाचा »
गुरुवार, २३ मे, २०१९
Standing my ground
-
कुणी काय करावं, बदलावं की बदलू नये हे सांगत वांझोटे उद्योग करत नाही. मी काय करेन ते नक्की सांगतो. मोदींनी भारतात प्रत्येक घरात सोन्याचा कमोड बसवला... जगातील सातशे कोटींपैकी सहाशे नव्याण्णव कोटी, नव्याण्णव लाख, नव्याण्णव हजार, नऊशे नव्याण्णव लोकांनी लोटांगण घातले... ... तरीही या भूतली त्यांना मतदान न करणारा मी एकटा असेन. त्या माणसाने इथे द्वेष रुजवला आहे, समाजात फूट पाडली आहे, झुंडींना निवाड्याचे स्वातंत्र्य दिले आहे, जनतेने निवडून देऊनही तो स्वत:ला जनतेला उत्तरदायी समजत नाही. इतरांना ते चालत असेल पण जनतेचा एक प्रतिनिधी म्हणून ते मला अमान्य आहे. खोटेपणा आणि चारित्र्यहनन यांचा त्याने राजमार्ग बनवला आहे. माझ्या आसपासच्या अनेक सुज्ञ भासणार्या व्यक्तींना त्याने त्या खोटेपणाचे आंधळे वाहक बनवले… पुढे वाचा »
बुधवार, २२ मे, २०१९
’काँग्रेस-भाजप एकाच माळेचे मणी’ पार्टी
-
’काँग्रेस नि भाजप एकाच माळेचे मणी’ म्हणणार्यांचाही काँग्रेसच्या घसरणीत मोठा वाटा आहे हे त्यांना नाकारताच येणार नाही. पूर्वी काँग्रेस सत्ताधारी असल्याने त्यांच्यावर अधिक आक्रमक टीका केली हे समजण्याजोगेच आहे. पण हे करत असतानाही ’भाजप नि काँग्रेस या दोघांचेही आम्ही विरोधक आहेत, पण काँग्रेसपेक्षा भाजप हा अधिक मोठा विरोधक आहे. आणि म्हणून जेव्हा अन्य सर्व पर्याय कुचकामी असतील*, अपरिहार्य असेल तेव्हा तेव्हा आम्ही भाजपपेक्षा काँग्रेसला साथ देऊ’ अशी निसंदिग्ध प्रतवारी त्यांनी लावायला हवी होती. तसे न केल्याने भाजपच्या साथीने काँग्रेसच्या नावे सतत (सकारणही, ते चुकीचे होते असे मला मुळीच म्हणायचे नाही!) शंख करत असताना त्यांच्या जागी कोण? याचे उत्तर न शोधता, त्याचा नीट पुरस्कार न करता करत असतील,आणि त्याचा फायदा भाजपच्या पारड्यात पडला असेल तर, ती तर त… पुढे वाचा »
Blame It On EVM
-
पाच वर्षांपूर्वी ईवीएम हॅकिंग आणि (त्याहीपूर्वी अनेक वर्षे) ’धनदांडग्यांच्या मदतीने सत्ताधारी जिंकले’ असे रडणारे आजही तसेच रडत असतील, तर इतक्या वर्षांत या विरुद्ध त्यांना प्रतिबंधात्मक किंवा पर्यायी असा कोणताही उपाय शोधता आलेला नाही, या आपल्या अपयशाची कबुलीच ते देत आहेत. ’ईवीएम हॅकिंग मुळे आम्ही हरलो’ हे रडगाणे म्हणजे माझे लकी पेन हरवले म्हणून नापास झालो या तर्कासारखे आहे. मतपत्रिकेकडे परत जायला हवे हे विरोधकांचे - त्यात काही वास्तविक आणि काही स्वयंघोषित पुरोगामीही आहेत - म्हणणे नि संघ-भाजपच्या ’आपल्या गौरवशाली (मनात: माझ्या सोयीच्या) भूतकाळाकडे चला.’ म्हणण्याइतकेच प्रतिगामी आहे. ईवीएमबद्दलचा संशय हा कोणत्याही पुराव्याखेरीज खात्रीत रूपांतरीत होणे हा ते करणार्याच्या पूर्वग्रहालाच दृढ करत असत… पुढे वाचा »
गुरुवार, १६ मे, २०१९
लेखन, लेखक आणि वृत्तपत्रे - १
-
एक फेसबुक पोस्ट: लोकसत्ता पूर्वी साडेसातशे रुपये मानधन देत होतं आता 500 चेक येतो तीन महिन्यानंतर महाराष्ट्र टाइम्स अनेक महिने चेक आलेला नाही. मग आता एकदम फार्मला तो भरून द्या पॅन कार्ड वगैरे. त्यात लेखकांना व्हेंडर म्हणजे पुरवठा करणाऱ्या इतर कामगार वगैरेमध्ये नेमलेला आहे. झी मराठीसाठी लीहायला लागलो सहा महिने त्यांनी कोणालाच मानधन दिलं नव्हतं. एका कवीला दोनशे रुपये मानधन दिल्यावर गदारोळ झाला वगैरे. शेतकऱ्यांना मालाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे वगैरे बद्दल आंदोलने झालीच पाहिजेत, ते योग्यच आहेच, पण गेली तीस वर्षे लिहिणार्या आमच्यासारख्यांना लेखनातून काही पैसे मिळाले पाहिजेत की नाही? ज्या पुस्तकांवर आम्ही लिहितो ती विकत घेण्याचे पैसेही लेखातून सुटत नसतील तर मराठीत कशासाठी लिहायचे. बाकी तुम्ही राजकारणावर चर्चा कराच, पण हे समाजकारण जरा लक्षात… पुढे वाचा »
बुधवार, १५ मे, २०१९
एक विधान, दहा फाटे
-
कमल हासन: नथुराम हिंदू दहशतवादी होता. आम्ही: तुम्ही म्हणाल तसं. एक देशभक्त भाजीवाला: महात्मा नथुराम गोडसे यांचा हा घोर अपमान आहे. कमल हासन यांचे मुंडके आणणार्यास मी पाच कोटी बक्षीस जाहीर करतो. असल्या देशद्रोही प्रवृत्तींचे समूळ उच्चाटन व्हायला पाहिजे. आम्ही: तुम्ही म्हणाल तसं. एक स्वयंघोषित पुरोगामी : हिंदूंना का बदनाम करता? तो फक्त संघी दहशतवादी आहे. आम्ही: तुम्ही म्हणाल तसं. एक सखोल इतिहासकार: त्याला हिंदू दहशतवादी का म्हणता, तो फक्त वैदिक दहशतवादी आहे. आम्ही: तुम्ही म्हणाल तसं. एक जातिअंतवादी पुरोगामी: मुळीच नाही. तो फक्त बामणी दहशतवादी आहे. आम्ही: तुम्ही म्हणाल तसं. एक जनरल फेसबुकी: 'त्याच्या'कडे पण बघा की. आम्ही: तुम्ह… पुढे वाचा »
॥ आए दिन भक्त मिलते हैं ॥
-
http://dreamtime.com येथून साभार. भक्त दीनदयाल रोड पर मिलते हैं । भक्त बारामती होस्टलमें बसते हैं । भक्तोंका डेरा मातोश्री के दरबारमें है । भक्तोंका मेला कृष्णकुंज के द्वार पे है । भक्त कभी 'कापिताल' लिए घूमते हैं । भक्त साइकिल पे बैठा हाथी देखते हैं । भक्त ’समोसे में आलू’ रखते हैं । भक्त अन्योंको ’तृण’वत मानते हैं । भक्तोंके लिए नेता ही परमभगवान हैं । उसकी चरणोंमे ही उनका उत्थान है। उसकी हर उक्ती अंतिम सत्य मानते हैं। उसकी हर कृती आशीर्वाद मानते हैं । भक्तोंका भगवान गिर पडे, तो उसे 'भूमाता-वंदन' कहते हैं। सहसा वो वायुविजन करे, तो मलय-गंध-युक्त मानते हैं । आए दिन भक्त मिलते हैं... ...भक्त अब ’२४ अकबर रोड’पर भी दिखने लगे हैं। - परमभक्त रम… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)