Vechit Marquee

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

राज्यांतील निवडणुका आणि मोदीलाट


  • देशाच्या विधानसभांमधून भाजप कसा आता हद्दपार झाला आहे म्हणून ’मोदी लाट हटली’ किंवा ’मोदींची कामगिरी पाहा’ म्हणणार्‍यांनो जरा थांबा. मोदींचे मूल्यमापन मोदी ज्या भूमीवर लढतात तिथेच व्हायला हवे. पोटनिवडणुकांमध्ये अगदी उ.प्र.च्या मुख्यमंत्री नि उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजप पराभूत झाला होता, पण २०१९ च्या मध्यावधी निवडणुकांत उ.प्र. मध्ये पुन्हा भाजपने ९०% जागा जिंकल्या. राजस्थान, म.प्र., छत्तीसगड मध्येही विधानसभा गमावूनही मोदींच्या भूमीवर म्हणजे लोकसभा निवडणुकीत जवळजवळ १००% यश मिळवले आहे. गंमत म्हणजे महाराष्ट्राचे हे नाट्य रंगलेले असताना राजस्थानातील स्थानिक स्वराज्य संस्थातून काँग्रेसने प… पुढे वाचा »

शोले पुन्हा पाहिल्यानंतर


  • विषयसंगतीमुळे हा लेख ’वेचित चाललो...’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »

मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१९

विचार आणि सत्ता


  • विचार नि विश्लेषण कितीही दर्जेदार, व्यापक हितकारी वगैरे असले, तरी जोवर त्यांची अंमलबजावणी होत नाही, तोवर त्यांना सुविचाराच्या वहीत लिहून ठेवलेल्या संदर्भहीन सुविचाराइतकेच महत्व असते... किंवा ज्यावर कधीही प्रश्न न विचारता त्यातील मजकूर शिरोधार्य मानायचा असतो अशा धर्मग्रंथांसारखे! अंमलबजावणी करायची तर सत्ता हवी, आणि सत्ता हवी असेल तर आपले सोवळे उतरवून थोड्या तडजोडीला तयार असावे लागते. हे शहाणपण ’काँग्रेस, भाजप दोघेही वैट्टं वैट्टं’ हा जप करत बसलेल्या आणि राजकीय ताकद शून्य झालेल्या समाजवाद्यांना किंवा बुद्ध्यामैथुन करत बसलेल्या समाजवादी आणि कम्युनिस्टांना यायला हवे. जिवंत राहिला तर माणूस बळ वाढवू… पुढे वाचा »

रविवार, २४ नोव्हेंबर, २०१९

गिव एव्हरी डेविल हर ड्यू


  • मला राजकीय मते आहेत हे उघडच आहे. ती मी कधीच लपवली नाहीत. पण याचा अर्थ मी एक बाजू घेऊन ती बाजू पवित्र नि योग्य, त्या बाजूच्या माणसाने, पक्षाने, नेत्याने म्हटले ते तंतोतंत खरे असे म्हणत तलवारी घेऊन कुणावर हल्ले केले नाहीत. शाब्दिक हल्ले नक्कीच केले आणि करतही राहीन, पण ते माझ्या स्वत:च्या मतांसाठी, इतर कुणाच्या मला मनातून न पटलेल्या मुद्द्यावर समर्थन करण्यासाठी नाही. अमुक मत माझ्या बाजूच्या बहुसंख्येचे, जातीचे, धर्माचे, पक्षाचे, नेत्याचे आहे ’म्हणून’ माझे असायला हवे, नि मला पटत नसून खाली डोके वर पाय करुन, एक डोळा मुडपून, एक तिरळा करुन, नाकपुड्या फेंदारून अष्टवक्रासनात बसून कसे बरोबर दिसते, अशा म… पुढे वाचा »

पर्यायाचा विचार, सिंहासनाचा खेळ आणि सेनेचा वाघ


  • एखादी जुनी व्यवस्था, जुनी निवड ही ’कालबाह्य झाली आहे, घातक आहे, बदलली पाहिजे’ म्हणून ओरड सुरु झाली की सर्वप्रथम ’पर्याय काय?’ या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे. अन्यथा आगीतून फुफाट्यात पडण्याचा अनुभव अनेकदा येतो. ‘आहे हे इतके वाईट नि घातक आहे की पर्याय म्हणजे इतर काहीही चालेल' किंवा' हे आधी जाऊ तर द्या, पर्याय आपोआप उभा राहील’ हे उत्तर पर्यायाचा विचारच न केल्याचे निदर्शक असते. ते वैचारिक आळशीपणाचे किंवा विद्रोहाचा विचार करता थकलेल्या मेंदूकडे रचनात्मक विचारासाठी, योग्य निरासाचा विचार करण्यासाठी पुरेशी ऊर्जाच शिल्लक न राहिल्याचे लक्षणही असते.जुन्या विचाराला, व्यवस्थेला नाकारून नवा विचार,… पुढे वाचा »

ऑनलाईन शॉपिंग आणि स्थानिक विक्रेते


  • ---
    फेसबुकवर सचिन डांगे यांनी केलेली पोस्ट:

    दहा वर्षांपूर्वी फ्रीज विकत घ्यायला एका इलेक्ट्रोनिकच्या दुकानात गेलो होतो. काहीतरी 5-स्टार असणारा फ्रीज पसंत केला आणि पैसे देऊन विकत घेतला. पण त्या दुकानदाराने घरी पाठवलेला फ्रीज 4-स्टार चा होता... तडक दुकान गाठले, त्याला पावती दाखवली आणि तक्रार केली तर वस्तू घेईपर्यंत जी-हुजुरी करून गोडगोड बोलणारा दुकानदार आता नीट वागत नव्हता. झालेली चूक मान्यही केली नाही.. 5-स्टार वाला फ्रीज नव्हता म्हणून 4वाला पाठवला, त्याला काय होतेय..इत्यादी.. त्याची किंमत पाचशे रुपये कमी होती, तेवढे परत दिले. वागणूक अशी की जसा मी त्या दुकानात हजर आहे की नाही.. फ्रीज घेतला,… पुढे वाचा »

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१९

पवारांच्या अंतस्थ हेतूचे प्रतिबिंब दाखवणार्‍या दोन शक्यता


  • (सेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे सरकार येण्याचे आदल्याच दिवशी नक्की झालेले असताना, रात्रीतून चक्रे फिरुन अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले. विधानसभेत अध्यक्षाची निवड अथवा विश्वासदर्शक ठराव यांच्या संदर्भात शरद पवार यांची भूमिका आणि त्यांच्यासमोर असलेले पर्याय यांचा थोडा उहापोह.) महाराष्ट्रातील सत्तेच्या खेळात आपण सार्‍यांनी तर्काचे, विनोदबुद्धीचे वारु मोकाट सोडले आहेत. ते जरा बांधून ठेवू. घटनाक्रम हा सर्वस्वी परावलंबी असल्याने आणि रंगमंचावरील पात्रे लेखकाला न जुमानता आप-आपली स्क्रिप्ट्स स्वत:च लिहित असल्याने स्थिती कशी वळण घेईल, या पुढचा भाग केव्हा कालब… पुढे वाचा »

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१९

मी पण टॅक्सपेअर


  • जेएनयू चा प्रश्न आला की मोदी-भक्तांचे पित्त उसळून येते नि आपल्या टॅक्स-पेअर्स मनीचे काय करु नये याची पोपटपंची ते करु लागतात. मग मीच का मागे राहू? १. कोणाचाही पुतळा अथवा स्मारक उभारले जाऊ नये आणि मुख्य म्हणजे या नियमाला अपवाद अजिबात असू नयेत. २. कुंभमेळ्यापासून हजयात्रेपर्यंत कोणत्याही धार्मिक कार्यक्रमावर खर्च करु नये. मंदिर, मशीद, बुद्धविहार, गुरुद्वारा, चर्चेस, जिनालये इत्यादि धर्मस्थळे बांधून नयेत वा त्यांना अनुदान देऊ नये.३. सरकारी कामांच्या जाहिराती करू नयेत.४. गावे, शहरे, स्टेडियम, इन्स्टिट्यूट्स, हॉस्पिटल इत्यादिंसह कुठल्याही गोष्टींच्या नामांतरावर खर्च करु नये.५. कोणत्याही बुडत्या खास… पुढे वाचा »

रविवार, १७ नोव्हेंबर, २०१९

टीआरपीची पैठणी


  • एक शहाणी-सुरती, शिकली-कमावती पोरगी होती. उपवर झाली. स्थळ सांगून आले. दाखवण्याचा कार्यक्रम झाला. पोरीला पोरगं काही पसंत नव्हतं. शिकलेलं असून बुरसटलेल्या विचाराचं, आई-बापाचा नंदीबैल असावा असं वाटत होतं. पण बोहोल्याच्या घाईला आलेल्या आत्या-मावशा-साळकाया-माळकाया-आज्या-काकवा सगळ्यांनी कलकलाट सुरु केला. ’त्यात काय पाहायचं. हाती पायी धड असलं म्हणजे झालं’ - आजी ’इतका विचार काय करायचा. थोडं डाव-उजवं होत असतंच. आम्ही नाही निभावून नेलं’ - काकू ’तुम्ही आजकालच्या पोरींना स्वातंत्र्य दिलंय त्याचा गैरफायदा घेताय. बापाने स्थळ आणलं ते त्याला समजत नाही म्हणून?’ एक मावशी करवादली ’अगं, असं विचार करत बसशील तर ज… पुढे वाचा »

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९

ड्रायविंग सीट


  • निवडणुका संपल्या होत्या...सरकार-स्थापनेची दंगल सुरु होण्यापूर्वी, निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपाने निर्माण झालेली कटुता पुसून काढावी, भाषणे करुन आणि प्रचारातील दगदगीतून थोडा विसावा मिळावा, म्हणून काही सर्वपक्षीय नेते एका एअर-कंडिशन्ड मिनी-बसने के.डी. शिवकुमार यांच्या रिसॉर्टकडे निघाले होते. मुंबईहून पुणे, सातारा, कोल्हापूर, मग वळून कोकण असे करत एक एक नेत्याला घेत हा ’गरीब-रथ’ पुढे चालला होता. तेवढ्यात या ’श्रमपरिहार-यात्रे’त सहभागी होऊ न शकलेल्या विदर्भ नि मराठवाड्यातल्या एक-दोन नेत्यांचे, ’तुम्ही पुण्या-मुंबईवाल्यांचे नेहमी असेच असते. आम्हाला मुंबईला यायला लावता. आम्हाला डावलता.’ अशा तक्रारी क… पुढे वाचा »

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

अयोध्या-विवाद, निकाल आणि मी


  • * मी अयोध्या-विवादाला कधीच बारकाईने अभ्यासलेले नाही.* भारतीय प्रसारमाध्यमे ही माध्यमे म्हणून केव्हाच निरुपयोगी झालेली आहेत. बातम्या हाच प्रपोगंडा, नाटक, चित्रपट आणि प्रवचन असलेल्या माध्यमांतून मिळालेल्या माहितीच्या आधारे मत व्यक्त करणॆ हा मूर्खपणा आहे असे माझे मत आहे. * त्यामुळे झाल्या निर्णयावर माझी प्रतिक्रिया आनंद वा दु:ख दोन्हीची असू शकत नाही. * मी टोळीच्या मानसिकतेचा नसल्याने विचारशून्य होत जन्मदत्त जातीय, धार्मिक, वांशिक, प्रादेशिक गटाची बाजू घ्यायला हवी असे मला वाटत नाही. * सोयीचा निकाल आला की ’न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो. तो मानायला हवा.’ आणि गैरसोयीचा आला तर, ’हा आमच्या श्रद्धेचा प… पुढे वाचा »

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१९

पुलं जन्मशताब्दी


  • ज्यांचे नाव न घेता फक्त ’भाई’ म्हणून कानाच्या पाळीला हात लावणार्‍यांपासून, नाव उच्चारताच पोटशूळापासून मस्तकशूळापर्यंत सारे आजार उसळून येणार्‍यांपर्यंत सर्वांच्या आयुष्याचा भाग झालेला 'हशिवनारा बाबा’ आज शंभरीत पोचला. विदूषक, नाटक्या, लेखक, परफॉर्मर, गायक; भीमण्णा, मन्सूरअण्णा, कुमार, वसंतखाँ पासून आरती प्रभू, बोरकरांपर्यंत अनेक ’उत्तम गुणांची मंडळी’ जमवून जगण्याचा उत्सव करणारा, हसता हसवता जगण्यातील विरुपतेवर बोट ठेवणारा, दांभिकतेची यथेच्छ खेचणारा आणि गाता, हसवता अचानक अंतर्मुखही करणार्‍या आजोबाला सेंचुरीच्या शुभेच्छा.
    --- भारतीय इतिहासात हे सदैव असेच चालत आले आहे का? आत्मवंचना करत जगत राह… पुढे वाचा »

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९

देवळे आणि दांभिकता


  • गोव्यातील प्रसिद्ध शांतादुर्गा मंदिराबाहेरील हा फलक काल कुणीतरी शेअर केला त्यावरुन हा जुना अनुभव आठवला. काही वर्षांपूर्वी एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने तिरुनेलवेलीला गेलो होतो. आमचे चार प्राध्यापक आणि मी नव-प्राध्यापक अशी टीम होती. आता आलोच आहे तर कन्याकुमारी, शुचीन्द्रम मंदिर वगैरे करावे असा बूट निघाला. मी भाविक वगैरे नसलो तरी इतरांबरोबर मंदिरात जाण्यास माझी ना नव्हती... आजही नसते. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उत्तरीय पांघरून मंदिरात प्रवेश करु नये वगैरे सूचना होत्या. (आमच्या एका चावट प्राध्यापकाने, ’हा नियम स्त्रियांनाही लागू आहे का?’ असा प्रश्न विचारला. प्रश्न चावटपणे विचारला असला तरी माझ्या… पुढे वाचा »

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

पुलं, पुरस्कार आणि पोंक्षे


  • (’अक्षरनामा’ या पोर्टलवर जयवंत डोळे यांनी लिहिलेल्या ’गांधीवादी पुलंच्या नावचा पुरस्कार ’नथुराम’ पोंक्षे यांना?’ या लेखावरील प्रतिक्रिया.)
    --- पहिला महत्वाचा हरकतीचा मुद्दा हा की पुलंना ’गांधीवादी’ हे लेबल लावणे चुकीचे आहे. माझ्या मते पोंक्षे नामक महाभागाची विचारधारा आणि पुलंची विचारधारा यात टोकाचा फरक आहे इतके नोंदवून थांबता आले असते. एक पुलंप्रेमी म्हणून आणि पुलंनी विविध व्यासपीठांवरुन, लेखनातून मांडलेल्या विचारांशी बव्हंशी सहमत असलेली एक व्यक्ती म्हणून मला डोळे यांचा आक्षेप पटला आहे हे नमूद करतो. पण... पुलंच्या नावाचा पुरस्कार पुलं परिवार, आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन या तिघांतर्फे द… पुढे वाचा »

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

त्राता तेरे कई नाम


  • अलिकडेच ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ नावाची एक इंग्रजी दूरदर्शन मालिका अतिशय गाजली. पक्षप्रतोद ते अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असा एका महत्त्वाकांक्षी राजकारण्याचा प्रवास, त्या निमित्ताने राजकारणाचे अनेक ताणेबाणे, त्यात गुंतलेल्या अर्थसत्तेची भूमिका, त्या सापटीत पत्रकारांची होणारी फरफट आणि त्या वावटळीत सापडलेल्यांचे पडलेले बळी, असा विस्तृत पट त्यात मांडला होता. या राष्ट्राध्यक्षाचे व्यक्तिमत्व उजळण्यासाठी प्रॉपगंडा तयार करण्यासाठी नेमल्या गेलेल्या, पण स्वतंत्र बाण्याच्या टॉम येट्स या लेखकाचे त्यात एक मार्मिक वाक्य आहे. Nobody cares about an idea. They might care about a man with an idea. I only care about … पुढे वाचा »