Vechit Marquee

सूची: अनुक्रमे  ▶ वर्गीकरण  ▶ लेखमाला  ▶ लक्षवेधी  ◼

रविवार, २३ डिसेंबर, २०१२

‘कट्टा... On The Rocks’: संक्रमणावस्थेतील पिढीचा आत्मशोध


  • ‘कट्टा’ हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर येतो, तो कॉलेजजवळील चहाच्या टपरीवर जमलेला विद्यार्थ्यांचा घोळका. चहाची टपरी नसेल तर कधी कॉलेजच्या आवारातील एखाद्या वृक्षाचा पार असेल, कॉलेजच्या दाराजवळील कुंपणाचा पट्टा असेल. जिथे जिथे चार टाळकी बसतात, नि कुटाळक्या करतात तो कट्टा. कटिंग चहा नि क्रीमरोलच्या साथीने मॅथ्स-थ्री मधे झालेल्या काशीपासून अमीर खानच्या टूथब्रश मिशीपर्यंत, कुठल्याशा चित्रपटातील गाजलेल्या किस् पासून आपापल्या आवडत्या मिस पर्यंत वाट्टेल त्या विषयावर तासन् तास काथ्याकूट करत बसण्याची जागा. त्यात मग एखाद्या उदयोन्मुख कवीच्या कवितांबद्दल चर्चा होईल, क्वचित ‘या वेळी पुरुषोत्तमला कोणतं नाटक घ्यायचं’ याच्यावर उहापोह होईल पण बहुतेक वेळ निव्वळ टैमपास. तेव्हा ‘कट्टा ऑन द रॉक्स’ असे शीर्षक घेऊन आलेला हा कार्यक्रम अशाच साध्यासरळ उद्देशाने आला असेल असा माझा समज झाला. कट्टा जमवण्याचे वय केव्हाच मागे सरलेल्या माझ्यासारख्याला, नावावरूनच निव्वळ तरुणाईसाठी आहे असे भासवणार्‍या या कार्यक्रमाबाबत उत्सुकता असण्याचे काही कारण नव्हते. (वयाला न शोभणारे भड...

    पुढे वाचा »