Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

मंगळवार, ३० जुलै, २०१३

काही नि:शब्दकथा


  • ( कथा, प्रसंग आणि पात्रे काल्पनिक. परंतु तरीही कोण्या जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटनांशी साधर्म्य आढळल्यास लेखकाला ताबडतोब सूचना द्यावी. जेणेकरून त्या कल्पित-वास्तवाच्या तौलनिक अभ्यासासाठी शिष्यवृत्तीची मागणी नोंदवणारा अर्ज करता येईल. ) प्राचीन: https://steemit.com/ येथून साभार. एकदा एक लांडगा नदीवर पाणी पीत होता. पाणी पिता पिता त्याच्या लक्षात आले की प्रवाहाच्या खालच्या बाजूला एक लहानसे कोकरूही पाणी पीत होते. “तू माझ्या पाण्याला तोंड लावून ते उष्टे करत आहेस.” लांडगा कोकरावर खेकसला. “असं कसं होईल वृकराज. मी तर प्रवाहाच्या खालच्या बाजूला पाणी पीत आहे, इकडून पाणी उलट तुमच्या दिशेने कसे जाईल.” “तू तर भलताच उद्धट दिसतोस, वर्षभरापूर्वीही तू माझ्याशी असेच उद्धट वर्तन केले होतेस.” ला… पुढे वाचा »

रविवार, ७ जुलै, २०१३

आडाडता आयुष्य - गिरीश कार्नाड


  • आयुष्यात असा एखादा कालखंड येतो की अचानक बर्‍याचशा अनपेक्षित पण स्वागतार्ह (खरंतर इथे मला इंग्रजीतल्या most welcome – आनंदाने स्वीकाराव्यात अशा – ची छटा अपेक्षित आहे, पण काहीवेळा परभाषेपेक्षाही मातृभाषेत नेमकेपणा आणणे अवघड जाते ते हे असे) अशा बर्‍याचशा गोष्टी एकापाठोपाठ एक आपल्याकडे चालत येतात. आपल्या जगण्यातला तो एक तुकडा पूर्णपणे एखाद्या आवडत्या गोष्टीच्या नावेच होऊन जातो. गेल्या महिन्याभरात असाच काहीसा अनुभव आला तो नाटकांबाबत. अचानक दोन चार सुरेख नाटके पहायला मिळाली. त्याच वेळी रंगभूमीशी, रंगकर्मींशी संबंधित चार पाच पुस्तके एकदम हाती लागली. हाती घबाड गवसल्याचा किंवा भर उन्हाळ्यात कुणीतरी कलिंगडाच्या गराड्यात नेऊन बसवल्याचीच भावना झाली. सुदैवाने रमतगमत का होईना त्यातल्या दोन पुस्तकांची ‘नैया पार’ झाली. योगायोग असा की ही दोन्ही आत्मचरित… पुढे वाचा »