-
खटले आणि निकालांची बारी << मागील भाग रोशच्या व्यावसायिक नीतीला उघडं पाडणारी आणखी एक घटना याच सुमारास घडली (१० जुलै १९७६). उत्तर इटलीमधे ‘सेवेसो’ नावाच्या छोट्या गावात असलेल्या ‘इक्मेसा’(Industrie Chimiche Meda Società Azionaria) नावाच्या कॉस्मेटिक्स उत्पादक कंपनीत एक भीषण स्फोट झाला. काही क्षणापूर्वी नितळ निळं असलेलं आकाश पांढर्या धुराच्या ढगांनी भरून गेलं. या ढगात ‘डायॉक्सिन’ नावाच्या विषारी द्रव्याचं प्रमाण अतिशय जास्त होतं. हे डायॉक्सिन सायनाईडपेक्षा सुमारे १०,००० पट अधिक विषारी द्रव्य आहे [10] . (हे प्रमाण अॅडम्सचा दाव्यानुसार ७०००० पट एवढे होते.) सेवेसोच्या परिसरातील वनस्पती कोमेजून, कोळपून गेल्या; ढगाच्या संपर्कात आलेले पक्षी उडता उडता बाण लागल्यागत टपकन पडून मेले. कित्येक घरट्यांखाली असे मेलेले पक्षी पडलेले दिसून आले… पुढे वाचा »
Vechit Marquee_Both
सोन्याची लंका, रामराज्य आणि समाज       उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...      
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१२
‘रोश विरुद्ध अॅडम्स’च्या निमित्ताने - ८: सुपर पॉयजन
शनिवार, २२ सप्टेंबर, २०१२
‘रोश विरुद्ध अॅडम्स’च्या निमित्ताने - ७: खटले आणि निकालांची बारी
-
(दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मालिकेचा पुढील भाग ) काही टिपणे << मागील भाग अॅडम्सला अटक झाल्याचे ई.ई.सी.ला समजणे शक्यच नव्हते. मेरिलिन जिवंत असती तर तिने कदाचित त्यांना कळवलेही असते. तुरूंगाच्या आतून काहीही हालचाल करणे अॅडम्सला शक्यच नव्हते. यासाठी अॅडम्सने तुरुंगातील आपल्या सेलमधे असलेल्या इतर गुन्हेगारांचा वापर करून घेतला. त्या सर्वांना किरकोळ गुन्ह्याखाली तुरूंगवासाची शिक्षा झालेली असल्याने ते लवकरच बाहेर पडणार होते. त्यांच्याकरवी ई.ई.सी.पर्यंत ही बातमी अॅडम्सने पोचवली. ‘ला स्टांपा’ तुरूंगात अॅडम्सची नव्याने चौकशी सुरू झाली. ही चौकशी करणारे पोलिस आयुक्त वर्नर विर्क अॅडम्सला जवळजवळ रोजच विविध प्रश्न विचारत, त्याची अॅडम्स उत्तरे देई. त्या उत्तरांवरून आणखी खोलवर माहिती काढण्याच्या दृष्टीने आवश्यक असे प्रश्न विर्क दुसर्या दिव… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)