-
बाबा : मी आदि शंकराचार्यांचा खापरपणतू आहे.
भक्त कोरस (भ.को.) : बोला अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री श्री अग्गोबाबा की जय.
एक उपस्थित (ए.उ.) : पण शंकराचार्य तर...
सदर meme आंतरजालावरुन कायप्पामार्गे (WhatsApp) प्राप्त झाले आहे.बाबा: (त्याचे बोलणे तोडून) मी आईन्स्टाईनचा तिसरा अवतार आहे.
भ.को.: बोला तिसरे आईन्स्टाईन अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री श्री अग्गोबाबा की जय.
ए.उ.: पण आईन्स्टाईन तर मागच्या श...
बाबा: (त्याचे बोलणे तोडून) माझ्या तिसर्या अवतारात मी आर्यभटाकडून आर्यभटीय लिहून घेतले.
(भक्त बावचळून आर्यभट कोण हा प्रश्न चेहर्यावर आणून एकमेकांच्या तोंडाकडे पाहतात.)
बाबा: (जोरात खाकरतात.)
भ.को.: (भानावर येऊन) बोला आर्यभट-गुरु अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री श्री अग्गोबाबा की जय.
ए.उ.: अहो पण गणित चु...
बाबा: (त्याचे बोलणे तोडून) मी कलिंगविजयी सम्राट अशोकाचा पणतू आहे.
भ.को.: (जोरात) बोला कलिंगसम्राट अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री श्री अग्गोबाबा की जय.
ए.उ.: अहो पण अशोकाने तर...बाबा: (रागाने त्याच्याकडे पाहात, त्याचे बोलणे तोडून जोराने) मी सहाव्या अवतारात चरकसंहिता लिहिली.
भ.को.: (जोरात) बोला चरकसंहितालेखक अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री श्री अग्गोबाबा की जय.
ए.उ.: अहो पण चरक तर...
बाबा: (संतापाने रागाने त्याच्याकडे पाहात, त्याच्याकडे बोट दाखवून दम देत) प्रश्न विचारुन तू शंकराचार्य, आईन्स्टाईन, आर्यभट, सम्राट अशोक, चरक यांचा अपमान करु पाहात आहेस.
भ.को.: होय, होय. तू शंकराचार्य, आईन्स्टाईन, आर्यभट, सम्राट अशोक, चरक यांचा अपमान करतो आहेस.
(ए.उ. ’लेकिन कनेक्सन क्या है भाई?’ विचारु पाहात असतो, भकोभाई 'अग्गोबाबा की जय’च्या गजरात तो प्रश्न दाबून टाकतात नि नंतर त्याला उचलून बाहेर फेकून देतात.)
- oOo -
(’पुरावे मागू नका’ या आगामी नाटकातून)
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
रविवार, ३ मार्च, २०१९
अग्गोभाई आणि भकोभाई
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा